×

योजना बनवून सोशल मीडियावर शासक वर्गाकडून कब्जा

Published On :    5 Apr 2021  By : MN Staff
शेयर करा:


संघटितपणे मुकाबला करायला हवा-वामन मेश्राम यांचे स्पष्टीकरण





नवी दिल्ली: योजनाबद्ध कायदा बनवून सोशल मीडियावर शासक वर्गाकडून कब्जा करण्यात आला आहे. संघटितपणे त्याचा मुकाबला करायला हवा. एखादी इंडस्ट्री सुरू करायची असेल तर लायसन्स घेऊन ती सुरू करता येते. मात्र मीडिया व पत्रकारिता लायसन्स घेऊन सुरू करण्याची घटना नाही. त्यासाठी संविधान कलम क्र.१९ नुसार वेगळी परवानगी घ्यावी लागते. कलम क्र. १९ फ्रीडम ऑफ स्पीच ऍन्ड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा अधिकार आहे. त्या माध्यमातून पत्रिका काढू शकतो असे वक्तव्य बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. सोशल मीडियावर सरकारच्या माध्यमातून लादण्यात आलेल्या बंदीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


मेश्राम म्हणाले, भारतात मीडियावर कब्जा करणारे लोक आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करतात. परंतु बंधने स्विकार करत नाहीत. दुसरीकडे बंधने लादली जातात. दुसर्‍याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. काही थोडी आवाज उठते ते सोशल मीडियामुळे.  सोशल मीडियामुळे फारच बदल झाला आहे. आम्ही जो सोशल मीडिया उभारला आहे त्यामुळे जानेवारी महिन्यात ७२ लाख लोकांपर्यंत आमचा आवाज पोहचला होता. २९ लाख लोकांनी शेअर केले. आम्ही केवळ १ हजाराचा आकडा पकडला तरी २ कोटी ९० लाख लोकांपर्यंत आमचा आवाज पोहचला. सोशल मीडियामुळे आमचा आवाज एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी लोकांपर्यंत पोहचत आहे.


सोशल मीडिया केवळ ग्लोबल मीडिया आहे. तोच मीडिया फ्री आहे. कारण त्यामध्ये विचारधारेची बंदी नाही. यावर ब्राम्हणवाद, मनुवादाची चर्चा करू शकतो. सोशल मीडियाच्या कंपनीला काय पाहिजे? तुम्हांला प्रचार करायचा आहे, तुम्ही करू शकता. आम्हांला केवळ युजर पाहिजे. आमची संख्या वाढते तर आमच्या संख्येच्या आधारावर व्यवसाय वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी विचारधारेची कुठली बंदी लादलेली नाही. त्यामुळे वंचित लोकांसाठी सोशल मीडियाचा फायदा होत आहे. त्यासाठी शासक वर्ग त्यालाही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून याचा मुकाबला संघटित रूपाने करायला पाहिजे असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


सोशल मीडिया बंद केला जाईल असे सांगितले जात असले तरी तो बंद केला जाऊ शकत नाही असा माझा दावा आहे. परंतु त्यावर कंट्रोल करण्यासाठी कायदा आणण्याचा घाट घालण्यात आला आहे. मौलिक अधिकार असल्याने केवळ कंट्रोल करू शकतात परंतु बंद करू शकत नाहीत. मीडिया लोकतंत्राचे मोठे साधन आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. परंतु हे शक्तीशाली साधन शासक वर्गाच्या नियंत्रणात होता तो आता सोशल मीडियामुळे काही हद्दीपर्यंत बहुजनांच्या नियंत्रणात आले असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.


ते म्हणाले, व्यक्तीगत पातळीवर पत्रकारिता करणार्‍यांनी जेवढे लवकर होईल तेवढे संघटित व्हायला पाहिजे. एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीच्या लोकांनी सोशल मीडियाचे वेगळे संघटन बनवायला हवे. संघटित होऊन मुकाबला करायला पाहिजे. त्यासाठी आम्हीदेखील मदत करायला तयार आहोत. त्यामध्ये आम्हीदेखील सहभागी होऊ. सोशल मीडियार अंकुश लावण्याचे प्रयत्न केला जात आहे याची चर्चा सुरू आहे. परंतु अंकुश लावण्यात आलेला आहे. कायदा मंत्र्यांच्या वक्तव्यावरून याचा अंदाज येऊ शकतो. सोशल मीडिया कंपनीला भारतात व्यवसाय करण्यास पूर्ण मुभा आहे. मात्र त्यांना भारताच्या संविधानाला व कायद्याला मानावे लागेल.


मेश्राम म्हणाले, एक आहे कायदा आणि दुसरे आहे कायद्याची व्याख्या. या दोन बाबी आहेत. कायदा काय आहे? सोशल मीडिया चालवणार्‍यांविरोधात कायदा नाही. मात्र त्याचा इंटरप्रिटेशन आपल्या पद्धतीने करता येऊ शकते. आम्ही कायदा बनवणार नाही असे कंपनीच्या लोकांना ते ऑफ द रेकॉर्ड बोलत असावेत. कारण भारताच्या संविधानात फ्रीडम ऑफ स्पिच ऍन्ड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे.  हा मौलिक अधिकार आहे. म्हणून आम्ही कायदा बनवू शकत नाही. परंतु आमच्या हिताचे रक्षण तुम्हांला करावे लागेल यावर लक्ष ठेवायला हवे. आम्ही तुमच्या हिताकडे लक्ष देऊ. ही बाब ऑफ द रेकॉर्ड समझोता होऊ शकतो. कारण अमेरिका, युरोपमधील कंपन्यांना व्यवसाय करायचा आहे, तसेच व्यवसाय करायला आमची कुठलीही ना नाही असे सरकारही सांगत आहे. असे चालू असेल असे मला वाटत आहे. त्यावर उपाय म्हणून संघटितपणे मुकाबला करायला हवा.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार बँकांच्या खासगीकरणाची लगबग
अनिल देशमुख यांच्या सचिवाची कसून चौकशी
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष
शेतकर्‍यांच्या जीवावर ‘नाफेड’कमावते नफा
राफेल डीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० लाख य
लॉकडाऊनच्या भीतीने कांद्याचे दर कोसळले
ज्या राज्यात निवडणुका आहेत तेथे नाही फक्त महाराष्ट्रात
शेतकरी आंदोलनाला कव्हरेज देणार्‍या व डॉ.आंबेडकर जयंतील
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले असताना
उद्योगपती, एमडी ते सामाजिक क्रांतीचे जनक
क्रांतीसूर्य जोतिबा
आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्य
परिवर्तन पेरणारे महात्मा
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीरा
पर्यायी साहित्याचे प्रणेते
महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक
महिलांचे मार्गदाते
आज सर्वात जास्त शंका निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर
महात्मा फुलेंच्या साहित्याचे नवे खंड आता हिंदी, इंग्रजी
परमबीर सिंह यांच्या प्राथमिक चौकशीचे गृहविभागाचे आदेश
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper