×

भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर होणार परिणाम

Published On :    6 Apr 2021  By : MN Staff
शेयर करा:


सौदी अरेबियाने क्रूड ऑईलच्या किंमती वाढवल्याने बसणार फटका





नवी दिल्ली:  सौदी अरेबियाने क्रूड ऑईलच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही भाववाढ फक्त आशिया खंडातील देशांसाठी असणार आहे. युरोपमधील राष्ट्रांवर याचा कोणताच परिणाम होणार नाही. असे असले तरी सौदी अरेबियाकडून तेल आयात कमी करण्याच्या भारताच्या योजनेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे संकेत मिळाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने अधिकृत विक्री किंमत म्हणजे ओएसपीमध्ये २० ते ५० सेंट प्रति बॅरल वाढ केली आहे. क्रूड ऑईलच्या वेगवेगळ्या ग्रेडनुसार ही वाढ करण्यात आली आहे. सौदी अरेबिया दर महिन्याला ओएसपीमध्ये बदल करतो. या पार्श्‍वभूमीवर पश्चिम आशियाई देशांनी क्रूड ऑईलच्या किंमतीत कपात करण्याचे संकेत दिले आहेत.


सौदी अरेबियातून क्रूड ऑईलची कमी आयात करावी, अशा सूचना भारत सरकारने सरकारी तेल कंपन्यांना दिल्या आहेत. क्रूड ऑईलच्या भाववाढीमुळे भारत आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांत तणाव निर्माण होऊ लागला आहे. तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी क्रूड ऑईल उत्पादक देशांनी उत्पादनावरील बंदी उठवावी अशी भूमिका भारताने घेतली होती, परंतु ओपेक प्लस देशांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. भारताने स्वस्त दरात खरेदी केलेल्या क्रूड ऑईलचा वापर करावा, असे सौदी अरेबियाचे तेलमंत्री अब्दुल एजाज बिन यांनी म्हटले होते.


आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (चलन आणि ऊर्जा संशोधन) अनुज गुप्ता म्हणाले की, सौदी अरेबियाच्या या निर्णयाचा भारतावर नकारात्मक परिणाम होईल. भारत जवळपास ८५ टक्के क्रूड ऑईल इतर देशांकडून आयात करतो. त्यातील बराच मोठा वाटा सौदी अरेबियाचा आहे. सौदीने किंमती वाढवल्यामुळे आता जास्त पैसे देऊन क्रूड ऑईल खरेदी करावे लागणार आहे. साहजिकच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. सौदीकडून भारत क्रूड ऑईलची कमी खरेदी करण्याच्यादृष्टीने काम करत आहे.


केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, लवकरच पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किंमती कमी होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यास आम्ही ग्राहकांना त्याचा पूर्ण लाभ देऊ. सध्या क्रूड ऑईलच्या किंमती ६३ डॉलर प्रति बॅरल एवढ्या आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार बँकांच्या खासगीकरणाची लगबग
अनिल देशमुख यांच्या सचिवाची कसून चौकशी
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष
शेतकर्‍यांच्या जीवावर ‘नाफेड’कमावते नफा
राफेल डीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० लाख य
लॉकडाऊनच्या भीतीने कांद्याचे दर कोसळले
ज्या राज्यात निवडणुका आहेत तेथे नाही फक्त महाराष्ट्रात
उद्योगपती, एमडी ते सामाजिक क्रांतीचे जनक
क्रांतीसूर्य जोतिबा
आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्य
परिवर्तन पेरणारे महात्मा
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीरा
पर्यायी साहित्याचे प्रणेते
महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक
महिलांचे मार्गदाते
आज सर्वात जास्त शंका निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर
महात्मा फुलेंच्या साहित्याचे नवे खंड आता हिंदी, इंग्रजी
परमबीर सिंह यांच्या प्राथमिक चौकशीचे गृहविभागाचे आदेश
अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना सीबीआयचे समन्स
अकोला मनपा आयुक्त अरोरा यांची अरेरावी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper