×

वैद्यकीय क्षेत्र व्यावसायिक पिळवणुकीसाठी नाही! -सुप्रीम कोर्ट

Published On :    12 Jul 2018  By : MN Staff
शेयर करा:


या आदेशाला काही धर्मादाय रुग्णालयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने ते परिपत्रक रद्द ठरविले.





नवी दिल्ली :  बहुतांश रुग्णालये व्यावसायिक लूट करत आहेत, बिल न दिल्यामुळे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना न सापिविणे हे वैद्यकीय नियम व लोकांच्या अधिकारांच्या विरोधात आहे, वैद्यकीय क्षेत्र हे व्यावसायिक पिळवणुकीसाठी नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय क्षेत्रावर ताशेरे ओढले.


सवलतीत जमिनी मिळालेल्या रुग्णालयांनी गरजू रुग्णांना मोफत सेवा द्यावी. हा आदेश दिल्लीपुरता असला तरी तो सर्वोच्च न्यायालयाचा आहे. त्याची अंमलबजावणी इतर राज्यांत शक्य आहे. सवलतीत जमिनी मिळालेल्या रुग्णालयांनी १० टक्के इनडोअर व २५ टक्के आऊटडोअर रुग्णांना मोफत उपचार देण्याचे आदेश त्यात आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील वाईट प्रवृत्तींवर खरमरीत टिप्पणी यात आहे.


बील न दिल्यामुळे मृतदेह अडकवून ठेवणार्‍या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत. तसेच डॉक्टर बनविण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात सार्वजनिक रक्कम खर्च करते. त्यामुळे डॉक्टरांनीही पैशांचा विचार न करता गरजूंना उपचार द्यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.


विनाकारण तपासण्या नकोत, अनावश्यक तपासण्या करणार्‍या डॉक्टरांनीही आत्मपरीक्षण करावे. वैद्यकीय क्षेत्रास लागलेली कीड घालवण्याची वेळ आली आहे. हे क्षेत्र व्यावसायिक पिळवणुकीसाठी कधीच नाही. डॉक्टर रुग्णांसाठी देव असतात, त्यांनी तसाच व्यवहार ठेवावा, असेही न्यायलयाने सुनावले आहे.


दिल्लीच्या जमीन आणि विकास अधिकार्‍यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या २००७ सालाच्या निर्णयाचा हवाला देऊन सवलतीच्या दरात जमीन घेतलेल्या रुग्णालयांनी गरजू रुग्णांवर मोफत औषधोपचार करावेत, असे आदेश २ फेब्रुवारी २०१२ रोजी दिले होते. 


या आदेशाला काही धर्मादाय रुग्णालयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने ते परिपत्रक रद्द ठरविले. उच्च न्यायालयाच्या या आदेशास केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करून आव्हान दिले होते.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
नोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब
संशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे
सकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श
लाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्
मोहन भागवत हाजिर हो! स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या
राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल
देशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब
दिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ
१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच
जेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच
मोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्
राफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र
भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच
राफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍
स्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण
राष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा! शरद पवार यां
कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे
गडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper