×

...तर ‘तेल का खेल’ महागात पडेल... इराणचा भारताला कडक शब्दात इशारा.

Published On :    12 Jul 2018  By : MN Staff
शेयर करा:


भारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी युरोपियन बँकामार्फत युरोचा वापर करत आहे, जोपर्यंत ते थांबवले जात नाही तोपर्यंत इराणकडून मिळणार्‍या तेल आयातीत अडथळा येणार नाही.





तेहरान: गेल्या काही दिवसांपासून इराणकडून इतर देशांनी तेल आयात करू नये, त्यासाठी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे भारतही इराणकडून तेल आयातीमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. 


परंतु आता तेल आयातीवरून इराणने भारताला गंभीर इशारा दिला आहे. सामरिकदृष्ट्या चाबदार बंदर हे दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहे. चाबहार बंदर विकासातील गुंतवणूक भारताने कमी केल्यास त्याचा दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम होणार असल्याचे इराणने म्हटले आहे.


भारताने चाबहार बंदर विकासातील गुंतवणूक कमी केली आणि आमच्याकडून घेण्यात येणा-या तेल आयातीत भारताने कपात केल्यास त्यांना दिलेले विशेष अधिकार काढून घेऊ, अशी धमकीही इराणने भारताला दिली आहे. 


इराणचे उपराजदूत मसूद रेजवानियन राहागी म्हणाले, जर भारताने इराणकडून तेल आयात कमी करून सौदी अरेबिया, रशिया, इराक, अमेरिका आणि इतर देशांकडून तेल आयात वाढवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना दिलेले विशेषाधिकार काढून घेऊ. 


ग्लोबल डिप्लोमसीतील आव्हाने आणि भारतासोबतचे द्विपक्षीय संबंधांवर प्रभाव या कार्यक्रमात राहागी बोलत होते. भारताने चाबहार बंदर विकास आणि त्यांच्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याच्या दिशेने अद्यापही योग्य पावले टाकलेली नाहीत. चाबहार बंदरावरून भारत धोरणात्मक भागीदारी करू इच्छित असल्यास त्यांनी तात्काळ त्यावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी भारताला दिला आहे.


चाबहार बंदर हे भारत, इराण आणि अफगाणिस्तानसाठी सामरिकदृष्टया महत्त्वाचे आहे. अशातच इराणकडून भारताला असा इशारा देण्यात आल्याने भारताच्या चिंता वाढल्या आहेत. भारतासाठीही चाबहार बंदर महत्त्वाचे आहे. 


कारण पाकिस्तानने स्वतःच्या भागातून भारताला पश्‍चिम आणि मध्य आशियात व्यापार करण्यास बंदी केली आहे. भारताने चाबहार बंदराच्या विकासासाठी ५० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे निश्‍चित केले आहे. चाबहार हे मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. तसेच भारताला व्यापारामध्ये या बंदरामुळे मोठा फायदा होणार आहे.


चाबहारमधील गुंतवणूक अमेरिकेचे लक्ष वेधून घेऊ शकते. चाबहारप्रमाणे दुसरा सर्वात काळजीचा मुद्दा आहे तो तेलाचा. भारत हा तेलाचा वापर करणारा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. तर सौदी अरेबिया आणि इराक यांच्यानंतर भारताला कच्चे तेल पुरवणार्‍या देशांमध्ये इराण आघाडीवर आहे. 


भारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी युरोपियन बँकामार्फत युरोचा वापर करत आहे, जोपर्यंत ते थांबवले जात नाही तोपर्यंत इराणकडून मिळणार्‍या तेल आयातीत अडथळा येणार नाही.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ईव्हिएम विरोधी चळवळ आता धरत आहे लोकचळवळीचे रूप
शिवरायांबद्दल ‘भलता’ शब्द विरोधकांनी भाजपला घेरले
२५ वर्षानंतरही आदिवासी विद्यार्थिनींना मिळतो फक्त १ रु
तेढ पसरविण्यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर, तर गुजरात दुसर
‘नीट’ परीक्षेत शून्य गुण, तरीही मेडिकलला प्रवेश!
इंटरनेट स्पीडमध्ये भारत पाकिस्तान, श्रीलंकेच्याही मागे
मेहुल चोकसी अमेरिकेतून पसार, इंटरपोलची माहिती
महिला आरक्षणाला कॉंग्रेसचा भाजपला पाठिंबा
‘मनू हा जगातला पहिला कायदेपंडित’
आदिवासी हलबांच्या संघर्ष यात्रेने दाखविले उग्र रूप
झुंडशाहीला रोखण्यासाठी संसदेने कायदा बनवावा
वर्षभरात १३ हजार बालकांचा मृत्यू
धर्म आणि जात परिवर्तन करणार्‍यांना आरक्षण देऊ नये
‘पुढील २० वर्षे भाजपाचीच सत्ता’
डिझेल चोरीच्या संशयातून तिघांना नग्न करून मारहाण
स्विस बँकांमध्ये ३०० कोटी बेवारस
भाजपाचे नवे ‘ब्रँड ऍम्बेसिडर’ विजय माल्ल्या
राज्यात दूध आंदोलनाने घेतला भडका
विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यास विरोध
मंदिरांवर चर्चा करुन रोजगार निर्मिती होणार नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper