×

‘शिवसेना कोकणवासियांची दिशाभूल करतेय’

Published On :    12 Jul 2018  By : MN Staff
शेयर करा:


नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-कॉंग्रेसमध्ये खडाजंगी





नागपूर :   नाणार प्रकल्प मुद्यावरून विधानसभेत शिवसेना पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ शिवसेनाच नाहीतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसननेही नाणार प्रकल्प मुद्यावरुन रिंगणात उडी घेतली आहे. 


नाणार मुद्यावर चर्चा करण्याची आमदारांकडून मागणी केली जात आहे. यावेळी सभागृहात विरोधकांसह शिवसेनेच्या आमदारांनीही वेलमध्ये उतरुन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. 


तर दुसरीकडे नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि कॉंग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केले.



‘नाणार’वरुन शिवसेना-कॉंग्रेसमध्ये वादंगशिवसेना नाणारवासियांची दिशाभूल करत असल्याचे राधाकृष्ण विखे- पाटील यांनी म्हणताच, शिवसेनेच्या आमदारांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.



‘विखे-पाटील यांनी शिवसेनेला शिकवू नये’नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कॉंग्रेस आणि काही लोकांना हे बोचले, अशी टीका शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे यांनी केली आहे. 


यातूनच शिवसेनेविरुद्ध जहरी भाषा बोलण्याचे त्यांनी काम केले. शेतकर्‍यांचा संप मोडण्यात पुढाकार घेणार्‍या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेला शिकवू नये, असेही नीलम गोर्‍हे यांनी यावेळी म्हटले.



नाणार प्रकल्प धोकादायक - भास्कर जाधवग्रीन रिफायनरी आणि न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट एकत्र आल्यास मोठा धोका होऊ शकतो, असे विधान अनिल काकोडकर यांनी वक्तव्य केले होते. 


याचा गांभीर्याने विचार करावा. जगात कुठेही न्यूक्लिअर पॉवर आणि ग्रीन रिफायनरी प्रकल्प एकत्र नाहीत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले. 


एकीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. दुसर्‍या बाजूला ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पात एरिअल अंतर २.५ किलोमीटरचा आहे. 


त्यामुळे हा प्रकल्प धोकादायक आहे. हा १७ गावांचा प्रश्‍न नाही हा संपूर्ण कोकणाचा प्रश्‍न आहे. कोकणाच्या आजूबाजूला सांगली आणि कोल्हापूर जिल्हेदेखील आहेत. या जिल्ह्यांनाही धोका आहे. 


सरकारने हट्ट सोडावा. आम्ही कोकणातील लोक जिवंत राहिलो तरच आम्हाला रोजगार मिळेल. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून विरोधी पक्षनेते यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर तात्काळ यावर चर्चा करा.


PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा! शरद पवार यां
कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे
गडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे
पुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्
शिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का ? राजू शेट्टी
वर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष
नोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे? पृथ्वी
राष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’
सुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा
फेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली
‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख
राज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि
‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह
६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड
जिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब
यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू!
मोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर
शिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.
सव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper