×

‘आधार’कार्डविना उपचार करण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू

Published On :    12 Sep 2018  By : MN Staff
शेयर करा:


उत्तरप्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील धक्कादायक घटना





उत्तरप्रदेश:  आधारकार्ड नसल्याचे कारण सांगत एका सामुदायिक स्वास्थ केंद्राने गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना हरदोई जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.


 

फरूखाबादमधील मऊ दरवाजा ठाणे क्षेत्रातील ऊगरपुर गांवातील तोताराम यांची २१ वर्षीय पत्नी संता आपल्या आईच्या घरी हरदोई जिल्ह्यातील बरसोहिया गांवात आली होती. तिला प्रसुती वेदना सुरू झाल्याने तिच्या वडीलांनी हरदयालपूर येथे असलेल्या सामुदायिक स्वास्थ केंद्रात दाखल केली. तिला स्वास्थ केंद्रात घेऊन गेल्यानंतर तेथील कर्मचार्‍यांनी तिचा आधार कार्ड मागितला. 



आधार कार्ड नसल्याने तेथील कर्मचार्‍यांनी तिला भरती करण्यास नकार दिला. माझी मुलगी रात्री दोन वाजेपर्यंत त्या स्वास्थ केंद्रात तशीच पडून होती. तिला त्यानंतर घरी घेऊन आलो, परंतु आर्थिक जुळवणी करताना वेळ गेल्याने अखेर तिचा मृत्यू झाल्याचे वडील संतपाल कश्यप यांनी सांगितले. जर का त्या स्वास्थ केंद्रात वेळीच उपचार मिळाले असते तर ती वाचली असती असेही त्यांनी स्पष्ट केले.



याबाबत त्या स्वास्थ केंद्राचे अधिक्षक डॉ.आनंद पांडे म्हणाले की, संता नावाची महिला रूग्ण आमच्या केंद्रात उपचारासाठी दाखल झाली नव्हती. तर मुख्य वैद्यकीय अधिकारी एस.के.रावत म्हणाले, अशी घटना घडली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गंभीर आजारांवर मोफत उपचार केवळ बीपीएलधारक कुटुंबीयांना
अमित शहांना पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य गमावण्य
आजपासून विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी पुकारला संप
राफेल डील प्रकरणी कागदपत्रे जप्त करुन गुन्हा दाखल करा
‘आरएसएस’कडील अवैध शस्त्रे जप्त करा-भारीप बहुुजन महासंघ
आधी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवा नंतर निधी देऊ
स्वच्छ आणि समजेल अशा अक्षरात प्रिस्क्रीप्शन लिहा
विरोध मोडून प्रकल्प उभारण्याच्या हालचाली-‘नाणार’साठी उ
पेट्रोल, डिझेल आणखी महागणार
धर्मामुळे पारसी प्राध्यापकाला एचओडी बनविण्यास नकार
प्रधानमंत्र्यांच्या रॅलीपूर्वी भोपाळात नरेंद्र मोदी, अ
रावणाचा जन्म नोएडात-सुब्रमण्यम स्वामींचा दावा
‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’
दप्तराचे ओझे कमी होईना
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ ५० कोटी लोकांना मिळणार?
पुणे कराराचा धिक्कार व इतर मागण्यांसाठी
देशाचे आर्थिक मॉडेल बदलण्याची गरज, डॉॅ. एस.एस. मंठा यांचे
राफेल खरेदी प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी करा
आयुष्यमान भारत योजना खाजगी विमा कंपन्यांच्या फायद्यासा
मोदींसाठी देश नाही, सत्ता महत्त्वाची-जितेंद्र आव्हाड बर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper