×

सिध्दांताशी आम्ही कॉम्प्रमाईज करू शकत नाही

Published On :    14 Sep 2018  By : MN Staff
शेयर करा:


बहुजन मुक्ती पार्टीचे एलजेडीशी केलेले विलीनीकरण मागे , व्ही.एल.मातंग यांचे स्पष्टीकरण





नवी दिल्ली: आपले संपूर्ण जीवन फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेशी समर्पित केल्यानंतर आम्ही कॉंग्रेसला कसे काय सपोर्ट करू शकतो असा सवाल करतानाच सिध्दांताशी आम्ही कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रमाईज करू शकत नाही. त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीचा एलजेडीत करण्यात आलेले विलीनीकरण आम्ही मागे घेत आहोत. एकंदरीत कॉंग्रेसला सपोर्ट करण्याच्या मुद्यावरून बहुजन मुक्ती पार्टी एलजेडीशी फारकत घेत आहे, असे व्ही.एल.मातंग यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.




बिहारमध्ये परिवर्तन यात्रा रॅली काढण्यात आली. त्यावेळी समारोपीय कार्यक्रमात औपचारिक पध्दतीने बहुजन मुक्ती पार्टीचा एलजेडीत विलीनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी ३० तारखेला जनरल कमिटीची सभा बोलावण्यात आली. आपल्या सिध्दांताची पूर्ती होत असेल तर बीएमपीचे एलजेडीत विलीनीकरण करायला हवे या निर्णयापर्यंत आम्ही आलो. तसे विलीनीकरण केले. यामागे आमचे मोठे विचार होते. ज्यावेळी मान्यवर कांशीराम व मुलायमसिंग यांनी गंठबंधन करून सामाजिक धु्रवीकरण केले होते. 



तसेच बीएमपीचे एलजेडीत विलीनीकरण करून या देशातील एससी, एसटी, ओबीसींचे ध्रुवीकरण करून एक मोठी तिसरी शक्ती म्हणून आम्हांला भूमिका निभवायची होती. एका वेगळ्या सिध्दांतावर हे विलीनीकरण करण्यात आले होते. आखण्यात आलेली रणनीती ही ब्राम्हणी व्यवस्थेच्याविरोधात होती. परंतु विलीनीकरणानंतर काही बेसिक समस्या निर्माण झाल्या असे मातंग यांनी सांगितले.



विलीनीकरण होऊन दीड महिना झाल्यानंतरही राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कमिटी गठीत करण्यात आली नाही. त्यामुळेही निराशा झाली. आम्ही बिहारमध्ये काढलेल्या परिवर्तन यात्रेत किमान ४० लाख रूपये खर्च केले. त्यासाठी एक माहोल बनविला. प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक कार्यक्रम दिला. सर्व काही नियोजनानुसार केले. ज्या उद्देशाने आम्ही गेलो होतो त्या उद्देशाचा कुठेतरी गळा घोटला जात आहे हे आमच्या लक्षात आले. 



मान्यवर कांशीराम यांनी कॉंग्रेसबरोबरच भाजपासोबतही गठबंधन केले होते. या गठबंधनच्या माध्यमातून त्यांनी राजनीती करत दोन्ही पक्षांना नामोहरम करत स्वत:ची छाप पाडली. भाजपाला जरूर हरवले पाहिजे, याचा अर्थ कॉंग्रेसला डोक्यावर बसवून घ्यायचे असा होत नाही. एलजेडीच्या रूपातून देशात एक तिसरी शक्ती निर्माण करून देशाचे राजकारणात महत्वपूर्ण भूमिका निभावून देशाला वाचविण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी शरद यादव यांचे नेतृत्व आम्ही मान्य केले होते. 



विविध राज्यात व लोकसभा निवडणुका लढवून किमान ४० जागा खेचून आणायच्या आणि त्या माध्यमातून कॉंग्रेसशी बार्गेनिंग करायचे अशी आमची योजना होती. तर आम्ही विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढवणार नाही तर आपल्याला कॉंग्रेसला सपोर्ट केला पाहिजे, कॉंग्रेससाठी काम केले पाहिजे असे शरद यादव यांनी आम्हांला सांगितले. ज्या विचारांसाठी आम्ही?संपूर्ण जीवन व्यतीत केले त्या विचारांशी फारकत घेत कॉंग्रेसला मजबूत करणे व त्यांना सपोर्ट करणे आमच्या सिध्दांताच्या बाहेर होते. सिध्दांताशी आम्ही कदापि फारकत घेणार नाही. 



आम्ही काम कमी करायला गेलो नव्हतो तर काम वाढवायला गेलो होतो. त्यासाठीच विलीनीकरण करण्यात आले होते. जर का कुठलाही ठोस निर्णय हाती लागत नसल्याने आम्ही आमचा वेळ वाया घालवत आहोत हे लक्षात आले. त्यामुळे आमचा जो उद्देश आहे त्यासाठीच काम करत राहणार आहोत. सिध्दांताशी कधीच कॉम्प्रमाईज करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही बीएपीचे एलजेडीत करण्यात आलेले विलीनीकरण मागे घेत आहोत असे मातंग यांनी सांगितले.



२४ सप्टेंबरला देशातील ५५० जिल्ह्यात पुणे कराराचा धिक्कार 

देशाचे सर्वोच्च असे संविधान जाळण्यात आले. ऍट्रोसिटी कायद्याविरोधात निर्णय दिला जात आहे. १ लाख १० हजार २१३ महिलांवर बलात्कार झाले, शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत, संविधान संपविण्यात आले आहेे, एवढे मुद्दे असूनही लोकसभेत एससी, एसटीचे असलेले १३१ खासदार कुठल्याही प्रकारे आवाज उठविताना दिसत नाहीत. सर्वच मूग गिळून गप्प आहेत. त्यांची एवढी कसली मजबुरी आहे तर त्याला कारण पुणे करार आहे. त्यामुळे येत्या २४ सप्टेंबरला देशातील ५५० जिल्ह्यात पुणे कराराचा धिक्कार केला जाणार आहे. त्यामुळे बीएमपीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी पूर्ववत कमिट्या कायम राखत या धिक्कार कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मातंग यांनी केले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गंभीर आजारांवर मोफत उपचार केवळ बीपीएलधारक कुटुंबीयांना
अमित शहांना पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य गमावण्य
आजपासून विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी पुकारला संप
राफेल डील प्रकरणी कागदपत्रे जप्त करुन गुन्हा दाखल करा
‘आरएसएस’कडील अवैध शस्त्रे जप्त करा-भारीप बहुुजन महासंघ
आधी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवा नंतर निधी देऊ
स्वच्छ आणि समजेल अशा अक्षरात प्रिस्क्रीप्शन लिहा
विरोध मोडून प्रकल्प उभारण्याच्या हालचाली-‘नाणार’साठी उ
पेट्रोल, डिझेल आणखी महागणार
धर्मामुळे पारसी प्राध्यापकाला एचओडी बनविण्यास नकार
प्रधानमंत्र्यांच्या रॅलीपूर्वी भोपाळात नरेंद्र मोदी, अ
रावणाचा जन्म नोएडात-सुब्रमण्यम स्वामींचा दावा
‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’
दप्तराचे ओझे कमी होईना
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ ५० कोटी लोकांना मिळणार?
पुणे कराराचा धिक्कार व इतर मागण्यांसाठी
देशाचे आर्थिक मॉडेल बदलण्याची गरज, डॉॅ. एस.एस. मंठा यांचे
राफेल खरेदी प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी करा
आयुष्यमान भारत योजना खाजगी विमा कंपन्यांच्या फायद्यासा
मोदींसाठी देश नाही, सत्ता महत्त्वाची-जितेंद्र आव्हाड बर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper