×

बामसेफ आणि वामन मेश्राम यांच्याविरोधात आरएसएसचे राष्ट्रीय स्तरावर गुप्त अभियान

Published On :    23 Sep 2018  By : MN Staff
शेयर करा:


बामसेफ?आणि वामन मेश्राम यांच्याविरोधात आरएसएसने राष्ट्रीय स्तरावर गुप्त अभियान सुरू केले आहे. हे अभियान सार्वजनिक नाही.





नवी दिल्ली: बामसेफ?आणि वामन मेश्राम यांच्याविरोधात आरएसएसने राष्ट्रीय स्तरावर गुप्त अभियान सुरू केले आहे. हे अभियान सार्वजनिक नाही. आपल्या कार्यकर्त्यांना अंतर्गत भडकावून बामसेफ अणि वामन मेश्राम यांच्याविरोधात बोलायला लावले जाते. 


सार्वजनिकरित्या जर का वामन मेश्राम यांना विरोध केल्यास आरएसएसविरोधी लोक बामसेफ आणि वामन मेश्राम यांना जोडले जातील ही भीती त्यांना असल्याने त्यांनी गुप्त अभियान सुरू केले आहे. त्यामुळे आरएसएसपासून बामसेफच्या कार्यकर्त्यांनी सावध रहा असा सल्ला देण्यात येत आहे. 


दुसरी महत्वपूर्ण माहिती अशी आहे की, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात यांच्यासह काही प्रदेशात आरएसएस गुप्त पध्दतीने अभियान राबवत आहे. बामसेफ व वामन मेश्राम यांची खासीयत आहे की, शत्रूच्या प्रत्येक चालीला त्यांच्याकडे प्रत्युत्तर असते. 


त्यांच्या कुलंगड्या बाहेर काढल्या जातात, त्यामुळे शत्रूच्या योजना विफल होताना दिसत आहेत. फेब्रुवारी २०१२ मध्ये मध्यप्रदेश झाबुआ जिल्ह्यात आरएसएसने वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेवर हल्ला केला होता. 


वामन मेश्राम व त्यांच्या माध्यमातून चालवण्यात येणार्‍या सर्व संघटना या संविधानाच्या कक्षेत राहून काम करतात.त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्याने अनुचित काम केलेले नाही. मग आरएसएसने मेश्राम यांच्यावर हल्ला का केला? त्याचबरोबर ते कुठल्याही टीव्हीवर अथवा वर्तमान पत्रांमध्ये आरएसएसविरोधात बोलत नाहीत. 


तर जे लोक आरएसएसविरोधात टीव्हीवर अथवा वर्तमानपत्रात लिहतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे हल्ला करताना दिसत नाहीत. तर मग बामसेफ व वामन मेश्राम आरएसएसचे दुश्मन का आहेत यामागची कारणमीमांसा करण्यात आली आहे. 


आज कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट आरएसएस व भाजपाची जरूर खिल्ली उडवत असतील परंतु विचारधारेबाबत हे तिघेही भाऊ आहेत. आरएसएस जी ब्राम्हणवादी विचारधारा घेऊन चालत आहे त्याच विचारधारेचे कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पाईक आहेत. त्यांची नीतीच तशी सांगत आहे. 


‘कांग्रेस आरएसएस की मॉं’ या पुस्तकाने सप्रमाण सिध्द केले आहे की, कॉंग्रेसनेही आरएसएसला जन्म दिला आहे. कॉंग्रेसच आरएसएसचे पालन-पोषण करत आहे. कॉंग्रेस, कम्युनिस्ट केवळ धर्मनिरपेक्ष आणि साम्यवादाची नौटंकी करत आहेत. ब्राम्हणवादी विचारधारेला टक्कर देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटितपणे बामसेफ व वामन मेश्राम यांच्या माध्यमातून बहुजनवादी विचारधारेचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. 


६ हजार जातीत विभागलेल्या लोकांना जोडून एक समतामूलक समाज निर्मितीसाठी बामसेफची स्थापना करण्यात आली आहे. या तुकड्यांना जोडण्यासाठी बामसेफजवळ मूलनिवासीसारखी मजबूत संकल्पना व त्याचा प्रचार मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली जोमाने सुरू आहे. 


या संकल्पनेचे निर्माते मेश्राम नाहीत तर ही राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची संकल्पना आहे. त्याचा प्रचार व प्रसार करण्यात मेश्राम यांना यश आले आहे. त्यामुळे ही संकल्पनाच ब्राम्हणवादाला गाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळचे अंतर्गत स्वरूपात आरएसएसने बामसेफ व मेश्राम यांच्याविरोधात राष्ट्रीय स्तरावर गुप्त अभियान चालवले आहे. 


२०१२ मध्ये मध्यप्रदेश झाबुआ जिल्ह्यात आरएसएसने वामन मेश्राम यांच्यावर प्राणांतिक हल्ला केला होता. त्याशिवाय मोठा हल्ला १ जानेवारी २०१८ ला पुण्यात भीमा-कोरेगाव याठिकाणी करण्याची आरएसएसची योजना होती.त्यासाठी त्यांनी मनोहर कुलकर्णी(भिडे), मिलींद एकबोटे आणि आनंद दवे यांना कामाला लावले होते. १ जानेवारीला दरवर्षी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक येतात. 


१ जानेवारी २०१७ पासून मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर विशाल कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमात मेश्राम यांनी घोषित केले होते की, या वर्षात पूर्ण भीमा-कोरेगाव महान युध्दाची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहचवली जाईल व त्यांच्यामध्ये क्रांतीकारी भाव निर्माण करण्यासाठी देशभरात ५१ हजार कार्यक्रम घेण्यात येतील.


त्या योजनेवर शत-प्रतिशत अंमलबजावणी करून भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर जागृती अभियान चालवण्यात आले. आपल्या महान लोकांची व शूरवीरांची काय परंपरा आहे याची माहिती देण्यात आली. त्याचा परिणाम असा झाला की १ जानेवारी २०१८ ला जवळजवळ ८ ते १० लाख लोक एकत्र आले होते. भीमा-कोरेगावच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाली होती. 


आलेल्या लाखो लोकांचे नरसंहार करण्याची योजना आरएसएसची होती. परंतु मेश्राम यांचे कुशल नेतृत्वगुण व संयमामुळे आरएसएसची ही योजना असफल ठरली. यावरून लक्षात यायला हवे की, आरएसएस मेश्राम यांना का शत्रू मानत आहे. पुणे जिल्ह्यात एक मराठा युवक आपल्या खाजगी कामासाठी बँकेत गेला होता. तेथील देशपांडे नावाचा ब्राम्हण त्या बँकेचा व्यवस्थापक व आरएसएसचा कार्यकर्ता होता. 


आरएसएसचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू कोण आहे आपल्याला माहित आहे का? असे देशपांडेने त्या युवकाला विचारले. मला माहित नाही असे उत्तर त्या युवकाने देशपांडेला दिले. त्यावर वामन मेश्राम आरएसएसचा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे त्याने सांगितले. त्या मराठा युवकाला मेश्राम यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तो विचारात पडला आणि मेश्राम कोण आहेत जी आरएसएस त्यांना क्रमांक एकचा शत्रू मानते. 


त्याने माहिती घ्यायला सुरूवात केली आणि तो युवक भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे यांना भेटला. त्यावेळी हा सारा किस्सा समजला. मध्यप्रदेश दमोह जिल्ह्यात ५० वर्षापेक्षा जास्त असलेला आरएसएसचा एक कार्यकर्ता बहुजन क्रांती मोर्चाच्या परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला आला होता. 


रहेली तहसील व सागर जिल्ह्यात येऊन त्याने सांगितले की, वामन मेश्राम फार मोठे बदमाश आहेत. त्यांच्यापासून दूर रहा, त्याच्या भाषणाचे व्हिडीओ रेकॉर्ड आपल्याजवळ आहे. त्यावेळी त्याने बामसेफ व वामन मेश्राम यांच्याबाबत  माहिती घ्यायला सुरूवात केली तेव्हा त्याला कळले की, मेश्राम समाजाच्या उत्थानासाठी व बहुजनांच्या उध्दारासाठी लढत आहेत. तेव्हापासून त्याने आरएसएसपासून फारकत घेतली ती कायमची. 


महाराष्ट्र नवी मुंबईत बामसेफच्या माध्यमातून मराठा-ओबीसी जागृती परिषद १७ सप्टेंबर २०१८ ला घेण्यात आली. या परिषदेला विफल करण्यासाठी आरएसएसचा प्रचारक अभय जगतापने काही दिवस अगोदर रबाळे, नवी मुंबई येथे आरएसएस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मिटींग बोलावली. 


त्या मिटींगमध्ये कुठल्याही परिस्थितीत बामसेफ व मराठा-ओबीसी परिषदेला रोखण्याचा प्रयत्न करण्याच्या निर्णय घेण्यात आला. ज्याठिकाणी ही परिषद होणार होती त्याठिकाणी शेतकरी समाज मंदिर हॉलमध्ये गेले. त्या हॉलमध्ये बामसेफचा पहिलाच कार्यक्रम नव्हता. 


गेल्या १० वर्षापासून बामसेफचे कार्यक्रम व मिटींग त्याच हॉलमध्ये होत आहे. त्या हॉललाही लोक चांगले ओळखतात. त्याचबरोबर मेश्राम यांनाही ओळखतात व मानतात. त्यामुळे त्या हॉलच्या व्यवस्थापनाने आरएसएसच्या जगताप यांच्याकडे लक्ष न देता बामसेफच्या कार्यक्रमाला विनाशर्त परवानगी दिली.


या दोन्ही बाबींला पुष्टी देणारा लिखित दस्तवेज काही दिवस पहिले आम्हांला मिळाला. आरएसएसने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकात लिहण्यात आले आहे की, बामसेफ व वामन मेश्राम यांच्यावर नजर ठेवा, मेश्राम आमचा क्रमांक एकचा शत्रू आहे. हे सर्व तथ्य व दस्तावेज लक्षात घेता आरएसएसला केवळ बामसेफ व मेश्राम यांच्यापासून धोका आहे. बाकी सर्व आरएसएसला विरोध करण्याचे नाटक वठवतात.




PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सरकारने ‘चमकोगिरी’वर खर्च केले ५ हजार २०० कोटी
...तर शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतात, शिवसेनेने उप
१९८४ च्या शिखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचा हात
धनगरांचा मुख्यमंत्र्यांविरोधात उद्रेक होणार, निदर्शने
योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगीतली तर आमचे काम सोप
घाना विद्यापीठाने वर्णद्वेषी मोहनदास गांधींना जागा दाख
‘जिजाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी’
राफेल प्रकरणाचा निकाल चुकीचा, याचिकाकर्ते प्रशांत भूषण
श्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दा
फुकट्या भाजप खासदाराविरूध्द अटक वॉरंट, तिकीटाशिवाय रेल
ईडीसमोर मल्ल्याच्या वकीलाची बोलती बंद
हा पराभव प्रधानमंत्र्यांचाच, उध्दव ठाकरेंनी डिवचले
नोटाबंदीची कल्पना त्यांच्या अर्थमंत्र्यांनाही नव्हती
‘हिंदू राष्ट्र’ तेव्हाच व्हायला हवे होते, मेघालय हायकोर
अर्थतज्ज्ञ नाहीत गव्हर्नर शक्तिकांत दास, एमएचा विषय होत
देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, निवडणूक प्
केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले
महार बटालियनची शौर्यगाथा जागवणार
चौथे अनु.जाती-आदिवासी भटके ओबीसी साहित्य संमेलन, पिंपळगा
भाजपला चिंतेने ग्रासले, २०१९ ला काय होणार?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper