×

खंडणी मागणार्‍या वृत्तवाहिनीच्या संपादकाला अटक

Published On :    12 Oct 2018  By : MN Staff
शेयर करा:


वृत्तवाहिनीचा व्यवसाय वाढवण्यासाठी कपडे व्यापार्‍यांकडे खंडणी मागणार्‍या संपादकाला अटक झाल्याने वृत्तविश्‍वात खळबळ उडाली आहे.





बंगळुरू: वृत्तवाहिनीचा व्यवसाय वाढवण्यासाठी कपडे व्यापार्‍यांकडे खंडणी मागणार्‍या संपादकाला अटक झाल्याने वृत्तविश्‍वात खळबळ उडाली आहे. या संपादकासोबत त्याच्या वृत्तवाहिनीमध्ये काम करणार्‍या ५ पत्रकारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 


या सगळ्यांच्या विरोधात खंडणी मागितल्याबद्दल इतर चार पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बड्या कंपन्यांचे स्टीकर लावून कपडे विकणार्‍या दुकानांचा ही टोळी सातत्याने शोध घेत होती आणि त्यांना लुटण्याचे काम करत होती असेही पोलिसांनी सांगितले आहे.


संतोष सिम्हा असे या संपादकाचे नाव असून तो कर्नाटकातील प्रजाप्रतिनिधी या वृत्तवाहिनीचा संपादक आहे. अशोक कुमार, व्ही.के.महादेव, नवीन, राकेश गौडा आणि ए.आनंद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सगळेजण ‘प्रेस’ चा स्टीकर लावून शहरभर गाडीतून फिरायचे. 


सावज दिसले की त्याच्या दुकानात घुसायचे आणि खंडणी दिली नाही तर मोठ्या ब्रँडचे स्टीकर लावून कपडे विकतो अशी बातमी तयार करून चॅनेलवर दाखवेन अशी धमकी द्यायचे. संतोषचा आधी प्रजाप्रतिनिधी नावाचे वृत्तपत्र होते, ते बंद करून वृत्तवाहिनी राज्यभर सुरू करण्याचा संतोषचा इरादा होता. यासाठीच त्याला पैशांची गरज होती, जी त्याने खंडणी मागून जमा करण्यास सुरूवात केली होती.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या-प्रकाश आंबे
मराठा आरक्षणामुळे नोकर्‍या मिळतील असे समजणे चुकीचे
कार्यक्रम आयोजकाच्या घरावर दगडफेक
पोलीस प्रशासनाच्या आडून आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज
उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मोदींविरोधी लाट
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्या देशभरात जेलभरो
वैद्यकीय महाविद्यालयांतील औषधांचाही साठा संपला!
राम मंदिरासाठी कायदा अशक्य-मोहन भागवत
भारतातील ९२ टक्के महिलांचे वेतन १० हजारांहून कमी
केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्या
साध्वी प्रज्ञा, पुरोहित विरुद्ध ‘यूएपीए’खाली चालणार खट
डोंबिवलीत फेरीवाल्यांचा रोजगार हक्क मोर्चा
मुसलमानांनी कॉंग्रेसला अजिबात मत देऊ नये-असदुद्दिन ओवे
बुध्दिमत्ता आहे, पण पैसा आणि यंत्रणा नाही
‘नोटा’चा वापर केल्यास तोटा होईल-मोहन भागवत
अशोका विजया दशमीचे महत्व संपवण्यासाठीच ब्राम्हणांनी आण
संविधान संपवणारेच बोलतात ‘संविधान खतरे में है’
गोंदिया जिल्ह्यात १०३८ बालेक कुपोषणाच्या श्रेणीत तर २२
निवडणूक आयोगाशी भिडणार -वामन मेश्राम
रामाणींवरील खटल्याची सुनावणी ३१ ला-एम. जे. अकबर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper