×

आरबीआय हा सरकारचा सीट बेल्ट, नाही लावला तर अपघात होणारच-माजी गर्व्हनर रघुराम राजन

Published On :    7 Nov 2018  By : MN Staff
शेयर करा:


रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमधील वाद विकोपाला गेला आहे. या वादात बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आता उडी घेतली आहे.





नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमधील वाद विकोपाला गेला आहे. या वादात बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आता उडी घेतली आहे. आरबीआयची भूमिका ही सध्या कारच्या सीट बेल्टप्रमाणे असून आरबीआय हा सध्या सरकारचा सीट बेल्ट आहे. 


लावणे किंवा न लावणे ही सर्वस्वी सरकारची मर्जी आहे, परंतु सीट बेल्ट लावला तर अपघात होणार नाही. तसेच दुर्घटना रोखण्याची सर्वस्वी जबाबदारी आरबीआयची आहे, असे राजन यांनी म्हटले आहे.


सध्याच्या परिस्थितीत आरबीआयने नवज्योतसिंग सिध्दूूसारखी पोपटपंची न करता राहुल द्रविडसारखे अत्यंत जबाबदारीने निर्णय घ्यायला हवेत, असेही राजन यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.


काय म्हणाले राजन-

खरे तर फोकस रुपयाच्या मूल्यावर नाही तर रुपयाचे अवमूल्यन होऊ नये म्हणून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांवर असावा. आरबीआय ही सरकारची संस्था आहे याच्याशी सहमत आहे, पण बोलणी सन्मानाच्या आधारावर होतात. दोघांनीही एकमेकांच्या अधिकारक्षेत्राचा आदर करायला हवा. दोघांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ केली तर अडचणी उभ्या राहणारच.


आरबीआयकडे नाही बोलण्याचा अधिकार आहे. कारण स्थिरता कायम ठेवण्यासाठी आरबीआयच जबाबदार असते. खरे तर हे राजनैतिक किंवा स्वार्थ साधण्याचे ठिकाण नाही. केंद्र आणि आरबीआयला एकमेकांचा विचार करायला हवा, असेही राजन म्हणाले.


पटेल यांना जाण्यास सरकार सांगणार नाही-

गर्व्हनर उर्जित पटेल यांना राजीनामा देऊन कार्यकाळ संपण्यापूर्वीच पद सोडावे असे सरकार सांगणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पटेल यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१९ ला संपत आहे. पण पटेल यांच्याशी मतभेद असले तरी त्यांनी पद सोडावे अशी सरकारची भूमिका नसल्याचे वृत्त आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा! शरद पवार यां
कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे
गडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे
पुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्
शिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का ? राजू शेट्टी
वर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष
नोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे? पृथ्वी
राष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’
सुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा
फेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली
‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख
राज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि
‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह
६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड
जिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब
यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू!
मोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर
शिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.
सव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper