×

विजय मिळेपर्यंत लढत राहणार,

Published On :    2 Jan 2019  By : MN Staff
शेयर करा:


भीमा-कोरेगाव दंगलीची निष्पक्ष चौकशी न झाल्यास, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा वामन मेश्राम यांचा इशारा, भीमा-कोरेगाव शौयदिन उत्साहात





पुणे: जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार असे सांगतानाच भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी निष्पक्षपातीपणे चौकशी न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या इशारा बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिला. 


भीमा-कोरेगाव शौर्यदिनानिमित्त भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी विचारमंचावर बामसेफचे प्रधान महासचिव डी.आर.ओहोळ, महासचिव (प्रशिक्षण) कुमार काळे, भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव प्रा. विलास खरात, मौलाना अझहरी, प्रा. बी.एस.हस्ते, मौर्य क्रांती संघाचे प्रा. संजय तरडे, बीएमपीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, दादामहाराज पनवेलकर, सीताराम बाजारे, डॉ.सुभाष राठोड, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुजाता काळे, बीएमपीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ-पाटील, इम्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मगन ससाणे, ऍड. राहुल मखरे, ऍड. वासंती नलावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



यावेळी मेश्राम यांनी भीमा-कोरेगाव दंगल कशी घडली यावर विश्‍लेषण करत अभ्यासपूर्ण मांडणी केली. १ जानेवारी २०१७ ला आम्ही मोठा कार्यक्रम केला. कारण भीमा-कोरेगावच्या इतिहासाला २०० वर्षे पूर्ण होणार होते. त्यासाठी देशभरात ५१ हजार कार्यक्रम घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्याची तयारीही करण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात फार मोठे राष्ट्रीय नेते आहेत. 


महाराष्ट्रालाच राष्ट्र मानणारे ते आहेत. बाहेर कोणी विचारत नाही असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला. काही लोकांनी योजना आखून ३१ डिसेंबरला पुण्यात कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाविषयी कुणाच्या मनात जिज्ञासा नव्हती. परंतु आनंद दवे नावाच्या पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षाने ३१ डिसेंबरच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. त्यावेळी माहित झाले की असा कार्यक्रम होणार आहे. 


त्यामुळे लोकांना या कार्यक्रमाची माहिती मिळाली. ब्राम्हणांनी योजना आखून विरोधाच्या नावाखाली त्या कार्यक्रमाचा प्रचार केला. कारण भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यक्रमात कोणी फिरकू नये यासाठी सर्व आटापिटा सुरू होता. दवेने प्रकाश आंबेडकरांबरोबर सोबत येत एक व्हिडीओ जारी केला आणि त्या कार्यक्रमाला परवानगी देत असल्याचे सांगितले. ब्राम्हण महासभा व प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर कसा समझोता झाला याची पोलखोल मेश्राम यांनी केली. 



१ जानेवारीला दंगल झाली. त्याची इत्यंभूत माहिती मिनिटा-मिनिटाला मिळत होती. या दंगलीनंतर सार्‍या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाले आणि त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. संध्याकाळी महाराष्ट्र बंदची त्यांनी हाक दिली. पोलीसांनी कोम्बींग ऑपरेशन केले आणि ३० हजार लोकांना अटक केली. योजनाबध्द पध्दतीने दंगल घडवण्यात आली. आता चौकशी आयोगासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. 


आम्ही दलित पँथर बनून लढत नाही तर विचार करून लढाई लढतो असा टोला मेश्राम यांनी लगावला. महाराष्ट्रात परिवर्तन यात्रा काढल्यानंतर मे २०१८ ला सरकारने चौकशी आयोग नेमला. परिवर्तन यात्रा काढली नसती तर चौकशी आयोग नेमला गेला नसता. भीमा-कोरेगावला मोठी दंगल घडवण्याची योजना आखण्यात आली होती. काही लाख लोकांना या दंगलीत फसवण्याचा कट होता. त्यासाठी भिडे-एकबोटे यांचा फडणवीसांनी वापर केला असा आरोप मेश्राम यांनी केला.


पेशवा ब्राम्हणांनी शाक्तवीर संभाजी महाराजांना पकडून दिले. संभाजी महाराजांची मनुस्मृतीच्या कायद्यानुसार हत्या करण्यात आली. संभाजी राज्यांच्या हत्येनंतर मुगलांचे राज्य येण्याऐवजी पेशव्यांचे राज्य कसे काय आले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचा अर्थ पेशवा ब्राम्हणांनी त्यांची हत्या घडवून आणली होती. ब्राम्हणांनी पेशवाई स्थापन केल्यानंतर त्यांच्यासमोर सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी बापू गोखले या ब्राम्हणाला संरक्षण खात्याचा सेनापती बनवले. परंतु ब्राम्हणांचे लढणे हे काम नव्हे असा टोलाही मेश्राम यांनी लगावला.


भीमा-कोरेगावच्या दंगलीप्रकरणी चौकशी आयोग नेमण्यात आले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी चांगली होत नाही. सुमित मलिक या आयोगाचे सदस्य आहेत. प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांबरोबर समझोता करत या चौकशीला विलंब करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे षड्यंत्रही आम्ही हाणून पाडले आहे. तर केंद्र व राज्य सरकारने एक नवीन योजना बनवून भीमा-कोरेगावची दंगल ही शहरी नक्षलवादी व माओवाद्यांनी केल्याचे सांगितले. 


मग नक्षलवादी व माओवाद्यांनी दंगल घडवली असा तुमचा अहवाल आहे तर पोलीस यंत्रणा काय त्यावेळी झोपा काढत होती,  त्या दंगलीला रोखण्याचे काम का करण्यात आले नाही असा सवाल मेश्राम यांनी केला. याचा अर्थ कायदा व सुव्यवस्था राखण्यात फडणवीस यांना अपयश आले. मला ज्यावेळी मुंबईत अटक करण्यात आली त्यावेळी पोलीसांनी मला तुरूंगात डांबले नाही. त्यावेळी मी म्हणालो, पोलीस हिजडे आहेत व फडणवीस हिजड्यांचे सरदार आहेत याचा पुनरूच्चार त्यांनी केला. 


दंगलीचे परिस्थितीजन्य पुरावे आहेत. हे सर्व पुरावे चौकशी आयोगाला देण्यात येतील. आता आम्ही ब्राम्हणांना जखडून ठेवले आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीपूर्वी या दंगलीचा अहवाल बाहेर येऊ नये यासाठी आटापिटा सुरू आहे. महाराष्ट्र सरकार जाणून-बूजून चौकशी करू इच्छित नाही. याचा अर्थ तेच लोक दंगलीत सहभागी असल्याचे सिध्द होते असा आरोप मेश्राम यांनी केला. 


महार सैनिक लढवय्ये आहेत त्यांच्या नावाने महार रेजीमेंट आहे. मराठा, जाट रेजीमेंटही आहे. परंतु महार रेजीमेंटमध्ये आता महार लोकांची भरती केली जात नाही. यशवंत चव्हाण संरक्षणमंत्री असताना त्यांचा चित्पावन ब्राम्हणांनी वापर करून घेतला. ब्राम्हण वापरून घेतात आणि वापर झाल्यानंतर फेकून देतात अशी त्यांची नीती असते. 


मिलीटरीचा ते हत्यारासारखा वापर करू शकतात. परंतु आम्ही त्यांना सोडणार नाही. एकदा का पकडली तर पुन्हा आम्ही सोडत नाही. कारण आमचे रक्त गरम आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लढाईला लढली असे त्यांनी स्पष्ट केले. 


भारतात महिलांची असुरक्षितता वाढली-सुजाता काळे

शिवशाहीत मान होता तर पेशवाईत महिलांचा अपमान होत आहे. महिलांच्या सन्मानाच्या गप्पा मारल्या जात आहेत. परंतु याच भारतात महिला असुरक्षित आहेत. बहुजन समजावण्याचे कमी डिवचण्याचे जास्त काम करतो असे प्रतिपादन राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुजाता काळे यांनी केले.

 


गृहमंत्री फडणवीसांचा थेट हात-प्रा. खरात

भीमा-कोरेगाव दंगलीमागे देवेंद्र फडणवीस यांचा थेट हात आहे असा आरोप राष्ट्रीय मायनॉरिटी मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी प्रा.विलास खरात यांनी केला. भिडे-एकबोटे यांच्यासह आनंद दवे देखील यामध्ये सहभागी आहे. फडणवीस यांनी भिडे व एकबोटेला क्लिनचीट दिली. चौकशी आयोग तत्काळ नियुक्त केला नाही. मेश्राम साहेबांनी परिवर्तन यात्रा काढली तेव्हा त्यांनी चौकशी आयोग नेमला असे त्यांनी सांगितले.  



केवळ लढायचे म्हणा ते पळून जातात-डी.आर.ओहोळ

सिध्दनाक महार लढणार आहे हे समजताच ३० हजार पेशवा ब्राम्हणांपैकी २ हजार त्यातील पळून गेले. केवळ लढायचे म्हणा ते पळून जातात. त्यामुळे आपल्याला एकट्याने न लढता एकीने लढायला हवे असे सांगतानाच आम्ही त्यांची झोप उडवणार असल्याचा इशारा प्रा. डी.आर.ओहोळ यांनी दिला.



लढेंगे तोही बचेंगे-कुमार काळे

भीमा-कोरेगाव दंगलीच्या चौकशी आयोगाची ‘चव-कशी’ आहे हे तुम्हांला सांगायलाच नको. दत्ताजी शिंदे यांनी ‘बचेंगे तो और भी लढेंगे’असा दाखला दिला होता. परंतु ‘लढेंगे तोही बचेंगे’ असा सिध्दांत आम्ही घेऊन आलो आहोत असे कुमार काळे यांनी सष्ट करताच लढणार असल्याचे संकेत दिले.





PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शिक्षणाचा ‘विनोद’ आणि बालभारतीची ‘बालबुध्दी’
चार वर्षांत राज्यभरात १२ हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या
रॅगिंगविरोधी कायदा अधिक कडक करणार
आरएसएस आणि मोहन भागवत दहशतवादी
गेल्या १२ वर्षात प्रथमच मान्सूनची धीम्या गतीने वाटचाल!
जेटकडे अडकले प्रवाशांचे ३ हजार २०० कोटी
मुंबई लोकलमधली गर्दी ‘जीवघेणी’
न्यायव्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप नको
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलास अटक
यूट्यूबची साफ-सफाई मोहीम... ९० लाख व्हिडिओ हटवले
शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला
स्विस बँकेने ५० भारतीय खातेदारांना बजावली नोटीस
देशभरात डॉक्टरांचा संप सुरुच, रुग्णांचे हाल कायम
राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा अहवाल पुढील आठवड्यात?
मंत्र्यांसमोरच शेतकर्‍याने घेतला विषाचा घोट
१३ टक्के व्याज आकारून शेतकर्‍यांची लुटमार
तापाचा कहर! बिहारमध्ये १०० बालकांचा मृत्यू
ओबीसी, अनुसूचित जाती, जमातींना औटघटकेचे मंत्रिपद देत विध
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर विरोधकांना संशय
देशाच्या विकासाची बस चुकली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper