×

फुले-शाहू-आंबेडकर चरित्र साधने समित्या अडकल्या संघ कार्यकर्त्यांचा विळख्यात

Published On :    3 Jan 2019  By : MN Staff
शेयर करा:


तावडेंचा आणखी एक ‘विनोद’, खरे-खुरे साहित्य प्रकाशित होण्याबाबत शंका





मुंबई: राज्य सरकारच्या राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समित्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. 


या समित्या संघ कार्यकर्त्यांच्या विळख्यात अडकल्याने महापुरूषांचे खरे-खुरे साहित्य प्रकाशित होईल का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. संघ कार्यकर्त्यांची नियुक्ती करून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे यांनी आणखी एक ‘विनोद’ केला आहे. 


राज्य सरकारच्या वतीने महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांचे प्रकाशित-अप्रकाशित साहित्य प्रकाशित केले जाते. त्यात या महापुरुषांची भाषणे व लेखनांचा समावेश आहे. त्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र तीन चरित्र साधने समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री हे पदसिध्द अध्यक्ष असतात.


फुले, शाहू महाराज व आंबेडकरांच्या साहित्याचा अभ्यास करणे, इंग्रजी भाषेतील साहित्याचे भाषांतर करणे, संपादन करणे ही जबाबदारी या समित्यांची आहे. त्यासाठी या महापुरुषांच्या साहित्याचे अभ्यासक असणार्‍यांची तज्ज्ञ समिती स्थापन केली जाते. समितीचे सदस्य सचिवपद महत्त्वाचे असते, त्यावर अभ्यासक-संशोधकाची नियुक्ती केली जाते. 


आंबेडकर चरित्र साधने समितीचे सदस्य सचिव म्हणून या पूर्वी वसंत मून, प्रा. हरि नरके, प्रा. दत्ता भगत व प्रा. अविनाश डोळस यांनी काम पाहिले. आंबेडकर ग्रंथ समितीच्या वतीने आतापर्यंत त्यांच्या लेखन व भाषणाचे २२ खंड प्रकाशित झाले आहेत.


उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अलीकडेच चरित्र साधने समित्यांची पुनर्रचना केली. आंबेडकर चरित्र साधने समितीवरून ज्यांच्याकडे बाबासाहेबांच्या साहित्याचे स्वामित्व अधिकार आहेत, ते ऍड. प्रकाश आंबेडकर तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. नितीन राऊत, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. जनार्दन वाघमारे, प्रा. दत्ता भगत, प्रा. रमेश जाधव यांना काढून टाकण्यात आले. 


त्यांच्या जागी संघाशी संबंधित आठ-नऊ कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. राजन गवस, शरणकुमार लिंबाळे, डॉ. पी.जी. जोगदंड, नामदेव कांबळे अशा काही साहित्यिकांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. हा अपवाद वगळला तर बहुसंख्य सदस्य संघाशी संबंधित आहेत. सदस्य सचिवपदावरही फुले-शाहू, आंबेडकरी साहित्याच्या अभ्यासकांऐवजी व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासकाची नियुक्ती करण्यात आल्याचा आक्षेप आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
२६ जूनपासून ईव्हीएम घोटाळ्याची राष्ट्रव्यापी ‘भंडाफोड
बिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने ३० जणांचा मृत्यू
देशातील आरोग्यसेवा ‘व्हेंटीलेटरवर’
तूरडाळीची शंभरी पार; सर्वच डाळींचे भाव गगनाला
साडेतीन हजार संशोधन नियतकालिके बनावट
उत्तर भारतात हजारो कोटींचा विद्यार्थी शिष्यवृत्ती घोटा
‘तो’ घोटाळा दडपण्यासाठी विखेंना कॅबिनेट मंत्रिपद
‘बेस्ट’च्या ताफ्यात ८० पर्यावरणस्नेही बस
मध्य प्रदेशातील १५ जिल्ह्यांमध्ये लोक पितात भेसळयुक्त
वाढदिवसानिमित्त ५१ किलोंचा ‘ईव्हीएम’ केक कापून राज ठाक
इस्त्रोची अंतराळ क्रांती
भुकेने व्याकूळ झालेले आदिवासी पोटच्या पोरांना सावकाराक
प्रकल्पबाधित ठरवून एसआरएच्या घरात कोंबले
चार आरोपींना जामीन मंजूर, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
तिहेरी तलाक विधेयकाचे समर्थन करणार नाही
दुष्काळामुळे राज्यातील पीक विमा कंपन्या मालामाल
कॉंग्रेसने पाठ्यपुस्तकातून हटवला सावरकरांचा ‘वीर’ हा उ
संगणक हॅक होऊ शकते मग ईव्हीएम का नाही?
भारत हा हिंदू राष्ट्र असल्याचे सीएसडीएसने बडवले ढोल
ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणे हे समाजासाठी घातक
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper