×

बँकेने केलेल्या चुकांची ३८ शेतकर्‍यांना शिक्षा

Published On :    5 Jan 2019  By : MN Staff
शेयर करा:


कुणाचे कर्ज दाखवले दुप्पट





नागपूर:  हिंगणा तालुक्यातील शेतकरी कर्जमाफी आणि पीक कर्जासाठी गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि बँकेचे खेटे घालत आहे. मात्र बँकेने केलेल्या चुकांची शिक्षा येथील शेतकर्‍यांना भोगावी लागत आहे.


हिंगणा तालुक्यातील खडकी या गावात तब्बल ३८ शेतकर्‍यांना बँक ऑफ इंडियाच्या चुकांचा  फटका बसला. बँकेने कोणाचे कर्ज दुप्पट दाखवले तर कुणाला कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम आधी भरा. त्यानंतर कर्जमाफी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी असताना काही शेतकर्‍यांना केवळ १६ हजार, २० हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.


खडकी येथील गंगाधर आनंद बुधबावरे  यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांनी बँक ऑफ इंडियामधून ऑक्टोबर २०१४ ला ८७ हजार (३३ हजारांचे वैयक्तिक कर्ज आणि ४५ हजारांचे तात्काळ कर्ज) रुपयांचे कर्ज घेतले. तसेच २०१३ ला नागपूर को-ऑप. डिस्ट्रिक बँकेतून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी योजना जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज केला, परंतु पहिल्या यादीत नाव आले नाही. 


दुसर्‍या यादीत आले, परंतु त्यात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचे दिसून आले. त्याचे दोन्ही बँकेचे कर्ज एकूण एक लाख ३७ हजार रुपये आहे. बँक ऑफ इंडियाने ३३ हजार रुपयाची नोंद दोन वेळा केल्याचे स्पष्ट झाले. बँकेने आणि जिल्हा उपनिबंधकाने ही चूक मान्य देखील केली आहे, परंतु शेतकर्‍यांना कर्ज माफ झालेले नाही आणि नवीन कर्ज देखील देण्यात आले नाही.


याच तालुक्यातील कान्होलीबारा येथील अनिल नानाजी लाड या शेतकर्‍याकडे दोघा भावांची मिळून दहा एकर शेती आहे. त्यांनी ९ जून २०१५ ला युनियन बँकेचे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला, परंतु दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी आधी एक लाख ४३ हजार ६२२ रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे एक लाखाच्या कर्जावर एक लाख  ४३ हजार रुपये भरून वन टाईम सेटलमेंट करण्याची सूचना करण्यात आली आहे.


‘बँक ऑफ इंडिया, शाखा हिंगणा यांनी दिलेल्या अहवालानुसार गंगाधर आनंद बुधबावरे यांचे नाव कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमध्ये आले होते. परंतु चुकीची रक्कम दर्शवण्यात आलेली होती. त्यानंतर टी.एल.सी. डाटा अपलोडमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. 


दुरुस्तीनंतर पुढे येणार्‍या ग्रीनलिस्टमध्ये नाव आल्यानंतर कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच  नवीन कर्ज वाटप करण्यात येईल. बँकेने चूक केली आहे. परंतु त्यांच्यावर जिल्हा उपनिबंधकांचे नियंत्रण नाही.’

अजय कडू, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
२६ जूनपासून ईव्हीएम घोटाळ्याची राष्ट्रव्यापी ‘भंडाफोड
बिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने ३० जणांचा मृत्यू
देशातील आरोग्यसेवा ‘व्हेंटीलेटरवर’
तूरडाळीची शंभरी पार; सर्वच डाळींचे भाव गगनाला
साडेतीन हजार संशोधन नियतकालिके बनावट
उत्तर भारतात हजारो कोटींचा विद्यार्थी शिष्यवृत्ती घोटा
‘तो’ घोटाळा दडपण्यासाठी विखेंना कॅबिनेट मंत्रिपद
‘बेस्ट’च्या ताफ्यात ८० पर्यावरणस्नेही बस
मध्य प्रदेशातील १५ जिल्ह्यांमध्ये लोक पितात भेसळयुक्त
वाढदिवसानिमित्त ५१ किलोंचा ‘ईव्हीएम’ केक कापून राज ठाक
इस्त्रोची अंतराळ क्रांती
भुकेने व्याकूळ झालेले आदिवासी पोटच्या पोरांना सावकाराक
प्रकल्पबाधित ठरवून एसआरएच्या घरात कोंबले
चार आरोपींना जामीन मंजूर, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
तिहेरी तलाक विधेयकाचे समर्थन करणार नाही
दुष्काळामुळे राज्यातील पीक विमा कंपन्या मालामाल
कॉंग्रेसने पाठ्यपुस्तकातून हटवला सावरकरांचा ‘वीर’ हा उ
संगणक हॅक होऊ शकते मग ईव्हीएम का नाही?
भारत हा हिंदू राष्ट्र असल्याचे सीएसडीएसने बडवले ढोल
ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणे हे समाजासाठी घातक
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper