×

बेस्ट संपाचा शॉक मुंबईला अन् शिवसेनेलाही

Published On :    10 Jan 2019  By : MN Staff
शेयर करा:


मुंबईकरांच्या हालाला पारावार उरला नाही





मुंबई : बेस्ट बेमुदत संप दुसर्‍याच दिवसापासून चिघळण्यास सुरुवात झाली असून, या संपाचा झटका मुंबईकरांप्रमाणेच शिवसेनेलाही बसला. शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेतल्यानंतर मुंबईत किमान ३० ते ४० टक्के बस धावू लागतील, हा अंदाज चुकीचा ठरला. शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेल्या चालक व वाहकांनीच सेनेला साथ न दिल्यामुळे दिवसभरात जेमतेम १२ ते १३ बस आगाराबाहेर पडल्या. परिणामी, बुधवारीही बसवर अवलंबून असलेल्या सामान्य मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. 


सुमारे ११ हजार सदस्य असलेल्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी संपातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. बुधवारी ५०० हून जास्त बस रस्त्यावर धावतील, असा दावाही त्यांनी केला होता. पण शिवसेनेच्या या निर्णयाला कट्टर शिवसैनिक असलेल्या त्यांच्या सदस्यांनीच विरोध करीत संपाला पाठिंबा कायम ठेवला. परिणामी, प्रत्यक्षात तीन बसदेखील रस्त्यावर आल्या नाहीत.  त्यामुळे आमच्यामुळे संप यशस्वी होतो, असे छातीठोकपणे सांगणार्‍या शिवसेनेची नाचक्की झाली. 


एवढेच नाही तर या संपामुळे बेस्टमध्ये गेल्या ४० वषार्ंपासून असलेल्या शिवसेनेच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे.  बेस्टचा हा संप शिवसेनेच्या हातातून निसटला असून, एवढेच नाही तर, बेस्टमधील अस्तित्वही धोक्यात आले. सकाळी एसटी व खाजगी बस उपनगरांतील काही भागात सुरू होत्या. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. शेअर रिक्षा व टॅक्सी चालकांची लुटमारी बुधवारीही सुरूच होती. ओला व उबर टॅक्सीही वेळेत उपलब्ध होत नव्हत्या. पश्‍चिम व मध्य रेल्वेने बुधवारीही विशेष लोकल चालवल्यामुळे प्रवाशांना काहीअंशी दिलासा मिळाला. 


निवासस्थाने खाली करा : बेस्टची नोटीस

संपामुळे बेस्टचे होणारे आर्थिक नुकसान तर दुसरीकडे मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेऊन, बेस्ट प्रशासनाने दबावतंत्राचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बुधवारी कर्मचार्‍यांना बेस्टचे निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीमुळे कर्मचार्‍यांचे कुटुंब रस्त्यावर आल्यामुळे भोईवाडा व परळ येथे काहीकाळ नोटीस बजावण्यात आलेल्या अधिकार्‍यांसमवेत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी वाद घातला. त्यामुळे पोलीसांना पाचारण करण्यात आले. 


बेस्टचा संप कोर्टाने बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुले संपावर जाणार्‍या कर्मचार्‍यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. यात कर्मचार्‍यांना निलंबित करण्यासह बडतर्फ करण्याचा विचारही प्रशासनाने केला आहे. तशसा नोटीसाही देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्याअगोदर जे कर्मचारी बेस्ट वसाहतीत राहत आहेत. अशा कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. अन्यथा आपले निवासस्थान खाली करा, अशी नोटीसच बजावली आहे. 


या नोटीसा सुमारे २ हजाराहून जास्त कामगारांच्या हाती पडल्याचे बोलले जात आहे. भोईवाडा व परळ येथील बेस्ट वसाहतीमधील कर्मचार्‍यांना बजावण्यात आलेल्या नोटीसनंतर येथील वातावरण चांगलेच तापले. कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी वसाहतीखाली उतरून प्रशासनाच्या या कृतीचा निषेध केला. 


आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारणे हा आमचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हाला बेघर करण्याची धमकी देऊन, संप हाणून पाडण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा यावेळी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी दिला. नागरिकांच्या विशेषत: महिलांच्या आक्रमक पावित्र्यामुळे अखेर पोलीसांना पाचारण करण्यात आले. 


त्यामुळे या वादावर पडला पडला असला तरी, नोटीस बजावण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या एका अधिकार्‍याने सांगितले. संप बेकायदेशीर असल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असून लवकर कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
२६ जूनपासून ईव्हीएम घोटाळ्याची राष्ट्रव्यापी ‘भंडाफोड
बिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने ३० जणांचा मृत्यू
देशातील आरोग्यसेवा ‘व्हेंटीलेटरवर’
तूरडाळीची शंभरी पार; सर्वच डाळींचे भाव गगनाला
साडेतीन हजार संशोधन नियतकालिके बनावट
उत्तर भारतात हजारो कोटींचा विद्यार्थी शिष्यवृत्ती घोटा
‘तो’ घोटाळा दडपण्यासाठी विखेंना कॅबिनेट मंत्रिपद
‘बेस्ट’च्या ताफ्यात ८० पर्यावरणस्नेही बस
मध्य प्रदेशातील १५ जिल्ह्यांमध्ये लोक पितात भेसळयुक्त
वाढदिवसानिमित्त ५१ किलोंचा ‘ईव्हीएम’ केक कापून राज ठाक
इस्त्रोची अंतराळ क्रांती
भुकेने व्याकूळ झालेले आदिवासी पोटच्या पोरांना सावकाराक
प्रकल्पबाधित ठरवून एसआरएच्या घरात कोंबले
चार आरोपींना जामीन मंजूर, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
तिहेरी तलाक विधेयकाचे समर्थन करणार नाही
दुष्काळामुळे राज्यातील पीक विमा कंपन्या मालामाल
कॉंग्रेसने पाठ्यपुस्तकातून हटवला सावरकरांचा ‘वीर’ हा उ
संगणक हॅक होऊ शकते मग ईव्हीएम का नाही?
भारत हा हिंदू राष्ट्र असल्याचे सीएसडीएसने बडवले ढोल
ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणे हे समाजासाठी घातक
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper