×

पॅनकार्ड क्लब घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाचा ‘सेबी’ला दणका

Published On :    10 Jan 2019  By : MN Staff
शेयर करा:


५२ लाख गुंतवणूकदारांचे पैसे अडकले





मुंबई : पंचतारांकित हॉटेलमधे निवासाचीही सोय आणि आकर्षक परतावा असे आमिष दाखवून देशातील लाखो ग्राहकांचे पैसे गुंतवणुकीच्या माध्यमातून गडप करणार्‍या पॅनकार्ड क्लब घोटाळयाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज ‘सेबी’ला चांगलाच दणका दिला. आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेची सविस्तर माहिती लपवणार्‍या ‘सेबी’ला हायकोर्टाने खडसावले. तसेच ही माहिती दोन आठवड्यात न्यायालयात सादर करा असे आदेश देत जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यासही बंदी घातली आहे.


गुंतवणुकीद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीने देशभरातल्या ५२ लाख ग्राहकांकडून पैसे उकळले. कंपनीच्या संचालकांनी विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केली, परंतु गुंतवणूकदारांचे पैसे परत न करताच कंपनीने हे पैसे गडप केले. सुमारे ७ हजार ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी ‘सेबी’कडे धाव घेतली व काहींनी ‘सॅट’कडे आपले गार्‍हाणे मांडले. 


‘सॅट’ने ‘सेबी’ला पॅनकार्ड क्लबची मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. ‘सेबी’नेही ‘सॅट’च्या आदेशानुसार मालमत्तेचा लिलाव सुरू केला. मात्र त्या लिलावादरम्यान ‘सेबी’ने जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव रेडीरेकनरपेक्षाही कमी दरात केला असल्याचे काही गुंतवणूकदारांच्या लक्षात येताच राघवेंद्र मोघावेरा व इतर गुंतवणूकदारांनी ‘सेबी’विरोधात ऍॅड. राघवेंद्र सारथी यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली.


न्यायाधीश भूषण धर्माधिकारी आणि न्यायाधीश रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर आज पार पडलेल्या सुनावणीवेळी ‘सेबी’ने आतापर्यंत जप्त केलेल्या १५ मालमत्तांचा लिलाव केला व ठाण्यातील आणि गोव्यातील मालमत्तेचा लिलाव रेडीरेकनरपेक्षाही कमी किमतीत केल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली.


परदेशातील मालमत्तेची ‘सेबी’ने माहिती लपवली

पॅनकार्ड क्लब लिमिटेडच्या एकूण ६८ मालमत्ता होत्या. त्यापैकी १५ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या परदेशातही काही मालमत्ता आहेत, मात्र या मालमत्तांची माहिती ‘सेबी’ लपवत आहे असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शिक्षणाचा ‘विनोद’ आणि बालभारतीची ‘बालबुध्दी’
चार वर्षांत राज्यभरात १२ हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या
रॅगिंगविरोधी कायदा अधिक कडक करणार
आरएसएस आणि मोहन भागवत दहशतवादी
गेल्या १२ वर्षात प्रथमच मान्सूनची धीम्या गतीने वाटचाल!
जेटकडे अडकले प्रवाशांचे ३ हजार २०० कोटी
मुंबई लोकलमधली गर्दी ‘जीवघेणी’
न्यायव्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप नको
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलास अटक
यूट्यूबची साफ-सफाई मोहीम... ९० लाख व्हिडिओ हटवले
शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला
स्विस बँकेने ५० भारतीय खातेदारांना बजावली नोटीस
देशभरात डॉक्टरांचा संप सुरुच, रुग्णांचे हाल कायम
राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा अहवाल पुढील आठवड्यात?
मंत्र्यांसमोरच शेतकर्‍याने घेतला विषाचा घोट
१३ टक्के व्याज आकारून शेतकर्‍यांची लुटमार
तापाचा कहर! बिहारमध्ये १०० बालकांचा मृत्यू
ओबीसी, अनुसूचित जाती, जमातींना औटघटकेचे मंत्रिपद देत विध
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर विरोधकांना संशय
देशाच्या विकासाची बस चुकली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper