×

अयोध्या-बाबरी वादप्रकरणी न्या. लळित यांची माघार

Published On :    10 Jan 2019  By : MN Staff
शेयर करा:


२९ जानेवारीला नवीन घटनापीठासमोर सुनावणी





नवी दिल्ली : अयोध्या येथील राम जन्मभूमी- बाबरी मशीद जमीन हक्काच्या वादासंबंधी सुप्रीम कोर्टात २९ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. न्या. यू. यू. लळित यांनी घटनापीठातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता नवीन घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल.


अयोध्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे घटनापीठाचे अध्यक्ष असून त्यात शरद बोबडे, एन. व्ही. रमण, उदय उमेश लळित आणि धनंजय चंद्रचूड या न्यायाधीशांचा समावेश होता. 


सकाळी साडे दहा वाजता सुनावणीला सुरुवात झाली. कामकाज सुरु होताच मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी वाद-प्रतिवादाला सुरुवात करुया, असे सांगितले. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले की, आपण सुनावणीच्या पुढच्या तारखांवर आणि कालमर्यादावर चर्चा करणार आहोत.


यानंतर राजीव धवन यांनी न्या. उदय उमेश लळित यांचा मुद्दा उपस्थित केला. लळित यांनी वकील असताना बाबरी मशीद प्रकरणातील एका आरोपीची बाजू मांडली होती. त्यामुळे या प्रकरणातील घटनापीठात लळित यांच्या समावेशावर धवन यांनी आक्षेप घेतला. यानंतर न्या. लळित यांनी देखील या प्रकरणातील सुनावणीपासून लांब राहण्याची इच्छा व्यक्त केली. 


शेवटी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी २९ जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय दिला. आता न्या. लळित यांच्या जागी नवीन न्यायाधीशाचा घटनापीठात समावेश केला जाणार आहे. २९ जानेवारीला नवीन घटनापीठासमोर नियमित सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे.


काय आहे सुप्रीम कोर्टातील प्रकरण ?

अयोध्या येथील २.७७ एकर क्षेत्रफळाच्या वादग्रस्त जागेची सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यात समान विभागणी करावी, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिला होता. त्या निकालाविरुध्द १४ अपिले सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहेत. त्यावर घटनापीठाकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी २९ ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते. 


या प्रकरणी लवकर सुनावणी करण्याची मागणी या प्रकरणातील एक मूळ अर्जदार अखिल भारत हिंदू महासभेने याचिकेद्वारे केली होती. मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय पीठाने १९९४ सालच्या निकालात नोंदवले होते. त्याच्या फेरविचारासाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाकडे वर्ग करण्यात यावे, ही मागणी त्रिसदस्यीय पीठाने गतवर्षी २७ सप्टेंबर रोजी २ विरुध्द १ अशा मत फरकाने नाकारली होती.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपाचे सगळे ‘चौकीदार’ चोर
धार्मिक हिंसाचार घटनांच्या सदोष तपासामुळे गुन्हेगार मो
देशात भाजप- कॉंग्रेस अपयशी ठरले
शिवसेनेच्या सोशल इंजिनीयरिंगला उतरती कळा
वारणा, भीमा पाटस आणि जय महेशवर कारवाईचा बडगा
राज्यातील ३९ लाख मतदारांची नावे यादीतून गहाळ
आचारसंहिता न पाळल्यास सहा महिने शिक्षा
हा कसला चौकीदार?
मतांसाठी जवान मारण्यात आले
खासदार शेट्टींच्या दत्तक गावात पाण्यासाठी नागरिक स्त्र
राज्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढला
बांदिवडेकर यांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात
भाजपच्या पहिल्या यादीत १९ टक्के गुन्हेगारी पार्श्‍वभूम
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात अनियमतता, सार्वजन
भारताने बालाकोटमध्ये खरंच ३०० दहशतवादी मारले का?
खाजगीकरणातून विकासाची दारे बंद करण्याचा डाव
आरएसएसशिवाय पार्टी चालू शकत नाही, संघ पॉवर प्लांट तर खास
श्रीलंकेत ४ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक
संघाच्या मर्जीशिवाय भाजपा नेत्यांना मिळत नाहीत पदे
आयुष्यमान भारत योजना खाजगी रुग्णालये आणि विमा कंपन्यां
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper