×

सवर्णांच्या आरक्षणामुळे एससी, एसटी, ओबीसींचे नुकसान

Published On :    11 Jan 2019  By : MN Staff
शेयर करा:


आरएसएसचा गुप्त अजेंडा राबवण्याचा डाव असल्याचा वामन मेश्राम यांचा आरोप





नवी दिल्ली : सवर्णांना दिलेल्या १० टक्के आरक्षणामुळे एससी, एसटी, ओबीसींचे फार मोठे नुकसान होणार आहे. आर्थिक आधाराची टूम काढून आरएसएसचा गुप्त अजेंडा राबवण्याचा डाव असल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. नॅशनल दस्तकचे प्रतिनिधी शंभूकुमार यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 


ते म्हणाले, सरकारमार्फतच आऊट सोर्सिंग केले जात आहे. सरकारच एजन्सी देत आहे.  नोकर्‍यांमध्येही खाजगीकरण करण्यात आले आहे. याबाबत चर्चा करून खाजगीकरणाविरोधात जागृती करण्याची गरज आहे. दरम्यान आरएसएसचा गुप्त अजेंडा आहेे तो राबवण्यात येत आहे. अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी आम्ही काही करतो आहोत हे दाखवण्याचा आता खटाटोपही होईल. त्यानंतर निवडणुका घोषित होतील. 


लोकांना सरकारच्या निर्णयाविरोधात भडकावले पाहिजे. आता काही लोक राजकीय स्टँड घेत नाहीत. संविधान बदलण्याचा मामला सुरू आहे. परंतु संविधानाच्या मौलिक ढाचाला हात लावता येणारच नाही. समजा सवर्णांचे आरक्षण शेड्युल्ड ९ मध्ये टाकून राबवण्याचा प्रयत्न झाला तरी सर्वोच्च न्यायालयात ते टिकणार नाही. ते सर्वोच्च न्यायालयाकडून परत पाठवले जाईल असे मेश्राम यांनी सांगितले. 


एससी, एसटी, ओबीसीला दिलेल्या आरक्षणावरच अंमलबजावणी होत नाही. खाजगीकरणाने सर्व शून्य करण्यात आले आहे. १९९० मध्येच खाजगीकरणाचे वारे वाहू लागले. त्यानंतर १९९२ ला मंडल आयोग लागू झाला. म्हणजे पहिले खाजगीकरण करण्यात आले. त्यानंतर ओबीसींना मंडल आयोग थोडाफार लागू झाला. तर प्रशासकीय अधिकारी असलेल्या आयएएस, आयपीएस, आयएफएसला खाजगीकरण लागू करता येणार नाही. त्यासाठी त्यांना वेगळे ठेवावेच लागेल. खाजगीकरणामुळे एससी, एसटी, ओबीसींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा मुद्दा उठवण्याची गरज आहे असे मेश्राम यांनी सांगितले. 


शैक्षणिकदृष्ट्या मराठा, पटेल, जाट मागास आहे. त्यांना मॅनेज करण्याचे प्रयत्न आहेत का? असा सवाल शंभूकुमार यांनी विचारताच मेश्राम म्हणाले, एससी, एसटी, ओबीसी लोकांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. परंतु अनु.जातीला शैक्षणिक आरक्षण २ टक्केच मिळत आहे. म्हणजे एससी, एसटी व ओबीसीचेंच १० टक्के सवर्णांकडे वळवण्याचा घाट आहे. त्यालाच डायव्हर्ट केले जाईल. 


एससी, एसटी, ओबीसींची राजकीय मूळे मजबूत करायला हवीत. कॉंग्रेस आणि भाजपा एकाच जातीतून येतात. बहुमत घेऊन राज करतात. कारण त्यांचा अजेंडा एकच असतो. त्यामुळे या विरोधात संयुक्त कारवाई करावीच लागेल असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.  



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शिक्षणाचा ‘विनोद’ आणि बालभारतीची ‘बालबुध्दी’
चार वर्षांत राज्यभरात १२ हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या
रॅगिंगविरोधी कायदा अधिक कडक करणार
आरएसएस आणि मोहन भागवत दहशतवादी
गेल्या १२ वर्षात प्रथमच मान्सूनची धीम्या गतीने वाटचाल!
जेटकडे अडकले प्रवाशांचे ३ हजार २०० कोटी
मुंबई लोकलमधली गर्दी ‘जीवघेणी’
न्यायव्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप नको
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलास अटक
यूट्यूबची साफ-सफाई मोहीम... ९० लाख व्हिडिओ हटवले
शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला
स्विस बँकेने ५० भारतीय खातेदारांना बजावली नोटीस
देशभरात डॉक्टरांचा संप सुरुच, रुग्णांचे हाल कायम
राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा अहवाल पुढील आठवड्यात?
मंत्र्यांसमोरच शेतकर्‍याने घेतला विषाचा घोट
१३ टक्के व्याज आकारून शेतकर्‍यांची लुटमार
तापाचा कहर! बिहारमध्ये १०० बालकांचा मृत्यू
ओबीसी, अनुसूचित जाती, जमातींना औटघटकेचे मंत्रिपद देत विध
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर विरोधकांना संशय
देशाच्या विकासाची बस चुकली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper