×

उमेदवारी कोण विकत आहे?

Published On :    12 Jan 2019  By : MN Staff
शेयर करा:


शिवपाल यादव यांचा मायावतीवर हल्लाबोल





आंबेडकरनगर  : भाजपच्या आर्थिक सहकार्याने आम्ही रॅली काढत आहोत, मोठा खर्च करत आहोत असा आरोप बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपाला उत्तर देताना उमेदवारी कोण विकत आहे, असा हल्लाबोल शिवपाल यादव यांनी केला. बीएमपी आणि प्रगतीशील समाजवादी पार्टीच्या महारॅलीत ते बोलत होते. 


यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर हात घातला. भाजपला हरविण्यासाठी आपल्याला ईव्हीएमविरोधात काम करावेच लागेल. आज देशामध्ये विषम परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशाची सीमा सुरक्षित नाही. कर्ज वाढत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी छाती ठोकून सांगितले होते की, भाजप सरकार आल्यास सीमेवर होणार्‍या अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जाईल. ‘सबका साथ सबका विकास’ असाही वादा करण्यात आला होता. परंतु विकास कोणाचा झाला, असा सवाल शिवपाल यादव यांनी केला. 


किती लोकांना नोकर्‍या मिळाल्या, भ्रष्टाचार संपला का? असा सवाल करतानाच जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागिदारी असा आमचा पवित्रा आहे. शेतकरी, मजूर त्रासले आहेत. मुस्लिमांना सच्चर कमिशनच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या नाहीत. या देशातील ब्राह्मणवादी सरकार हटवायचे असेल तर बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायला हव्यात, असे शिवपाल यादव म्हणाले. 


दरम्यान, ९ डिसेंबरला लखनऊमध्ये झालेल्या रॅलीलाच घाबरुन मायावती व अखिलेश एकत्र आल्याचा आरोप शिवपाल यादव यांनी केला. ८५ विरुद्ध १५ अशी लढाई आता खर्‍या अर्थाने सुरु झाली आहे. बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या संघर्षामुळे शत्रूची ओळख निर्माण झाली आहे. 


परिणामी देशातील एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी व धर्मपरिवर्तीत लोक एकत्र येताना दिसत आहे. त्यामुळे सामाजिक धृविकरण होत असल्याने भविष्यात भाजपला बहुजन मुक्ती पार्टी आणि प्रगतीशील समाजवादी पार्टीच टक्कर देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त करतानाच भाजपने १० उद्योगपतींच्या फायद्यासाठीच निर्णय घेतल्याचा आरोप शिवपाल यादव यांनी केला. 

 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
महाराष्ट्रातही मॉब लिंचिंग
ब्राम्हण हा बहुजनांचा रक्त शोषणारा पॅरासाईट
मुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर? अमृता फडणवीस यांच्या
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्याला अटक
स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या भाजपा खासदाराला को
‘देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’; पोस्
ईव्हीएम विरोधामुळेच राज ठाकरेंवर चौकशीचा ससेमिरा
मनसेचा भाजपावर ‘कार्टूनवार’
सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक
संत रविदास मंदिर तोडल्याप्रकरणी उद्या दिल्लीत आंदोलन
तुम्ही आरक्षणावर चर्चा करा आम्ही ईव्हीएम घोटाळ्यावरच च
राजकीय आरक्षण वाढवल्यास आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार
महिंद्रा अँड महिंद्राने १५०० जणांना काढून टाकले
लोकसभेच्या २०० माजी खासदारांना अजूनही हवी सरकारी बंगल्
एसआयटी आज आरोपी व अधिकार्‍यांचा जबाब नोंदवणार
चौकशीसाठी सीबीआयला आणखी दोन आठवड्यांची मुदत
ईडीच्या अशा नोटीशीला भीक घालत नाही
भारत सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुराष्ट्रच
तरीही ट्रकचालकाने कारचा केला चेंदामेंदा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper