×

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता मानवमुक्तीचा धगधगता अंगार

Published On :    14 Apr 2018  By : MN Staff
शेयर करा:


विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण राष्ट्राचे निर्माते, घटनाकार, कायदेपंडीत, अर्थतज्ञ,घटनातज्ञ म्हणून ओळखतो. परंतु ज्या क्षेत्रात या महामानवाने पाऊल टाकले ते क्षेत्र आपलेसे केले.

विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण राष्ट्राचे निर्माते, घटनाकार, कायदेपंडीत, अर्थतज्ञ,घटनातज्ञ म्हणून ओळखतो. परंतु ज्या क्षेत्रात या महामानवाने पाऊल टाकले ते क्षेत्र आपलेसे केले. त्यातील आणखी एक वेगळा पैलू त्यांच्या नसानसात भिनला होता. 


तो म्हणजे पत्रकारिता! मात्र पत्रकारितेच्या त्यांच्या या पैलूवर टिळकपंथीय पत्रकारितेने अन्यायच केला. त्याकाळी सर्वांची पत्रकारिता ही गल्लाभरू, पोटभरू तसेच व्यवस्था समर्थक होती आणि ब्राम्हणांची टिमकी वाजवणारी होती. 


मात्र त्याला एकमेव अपवाद होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर! त्यांची पत्रकारिता म्हणजे मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. मानवमुक्तीच्या लढ्यातील एकाकी शिलेदाराप्रमाणे तळपणारी तलवार होती. 


पत्रकारिता म्हणजे काय? हे आपण आधी समजून घेतले पाहिजे. परंतु पत्रकारिता कशासोबत खातात याची साधी जाणीव नसलेले लोक पत्रकारितेवर मोठमोठ्या गप्पा मारताना दिसतात. त्यामध्ये ब्राम्हण-बनिया टॉयलेट पत्रकारिता करणारे लोक जास्त आहेत. 


पत्रकारितेने समाजाच्या सुखदु:खात सामील झाले पाहिजे. त्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली पाहिजे. त्यासाठीच आपली लेखणी झिजवली पाहिजे. जागतिक पत्रकारितेचे विविध प्रवाह व कंगोरे तपासले असता जगातील पत्रकारितेने क्रांती केली आहे. 


अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिकेतील निग्रोंची मानवी व नागरी स्वातंत्र्याची चळवळ अत्यंत जवळून पाहिली होती. निग्रोंच्या लढ्याचे केंद्र हार्लेम उपनगर होते. त्याच शहरात त्यांचे वास्तव्य होते. 


निग्रोंच्या सामाजिक, सांस्कृतिक उत्थानासाठी डब्ल्यू इ.बी.ड्यू बोईस यांनी १९०९ मध्ये नॅशनल असोसिएशन फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पिपल नावाच्या संघटनेची स्थापना केली. या संघटनेमार्फत द क्रायसिस नावाचे मुखपत्र सुरू केले. 


या मुखपत्रातून निग्रोंवरील अत्याचाराच्या घटना, सरकारशी वैधानिक पध्दतीने सुरू केलेल्या संघर्षाच्या बातम्या आणि निग्रोंचे लढाऊ संघटन उभे करण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन सुरू केले. 


निग्रोंना गोर्‍यांच्या गुलामीतून मुक्त व्हायचे असेल तर त्यांनी खेड्यातून शहरांमध्ये स्थलांतर केले पाहिजे यासाठी प्रभावी प्रचार सुरू केला. १९११ ते १९२० या कालावधीत द क्रायसिस या नियतकालिकाने अमेरिकेतील निग्रोंचे विश्‍व ढवळून काढले होते. 


डयू बोईस यांचे दुसरे सहकारी रॉबर्ट एबॉट यांनी द शिकागो डिफेंडर नावाचे नियतकालिक सुरू करून निग्रोंनी ऊसाच्या  व कापसाच्या मळ्यात काम करण्याचा पारंपरिक व्यवसाय सोडून मोठ्या शहरात स्थलांतर केले पाहिजे यासाठी जागृती केली. 


मार्कस् गार्वी यांनी त्यांच्या निग्रो वर्ल्ड या नियतकालिकातून निग्रोंवरील अत्याचार, निग्रोची स्थिती व त्यासाठी जबाबदार असलेली गोर्‍यांची मानसिकता यावर सडेतोड लेखन सुरू केले. निग्रोंच्या या स्वातंत्र्य लढ्याला हार्लेम रिनेसन्स या नावाने ओळखले जाते. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण सहित्यावर दृष्टीक्षेप टाकल्यास त्यांच्यावर हार्लेम रिनेसन्सचा मोठा प्रभाव असल्याचे जाणवते. अमेरिका व इंग्लंडमध्ये वास्तव्य करून भारतात परतल्यानंतर दुसर्‍याचवर्षी म्हणजे १९१९ सालच्या जानेवारी महिन्यात भारतात विशेष राजकीय हक्क प्रदान करण्यासाठी लॉर्ड साऊथबरो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती भारतात आली होती. 


या समितीने एकूण ३६ लोकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंंबेडकर एक होते. साऊथ बरो समितीला त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्काच्या मागणीचे पहिले निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांचे वय २७ वर्षाचे होते. 


या निवेदनामध्ये त्यांनी निग्रोंच्या चळवळीचा सविस्तर उहापोह केला आहे. अमेरिकेत विद्यमान असलेल्या विभिन्न सामाजिक भेदभावांसह अमेरिकेत प्रातिनिधिक सरकार स्थापन होऊ शकते तर भारतात का नाही? असा प्रश्‍न उपस्थित करून त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय चळवळीचा पाया घातला.  


या राजकीय हक्कांच्या मागणीला पाठबळ मिळवण्यासाठी त्यांनी १९२० मध्ये मूकनायक वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. मूकनायक सुरू करण्यामागची एक प्रेरणा त्यांना कदाचित अमेरिकेतील निग्रोंच्या लढ्यात त्यांच्या मुखपत्रांनी बजावलेली भूमिका पाहून मिळालेली असू शकते. 


मूकनायक वृत्तपत्र सुरू करताना बाबासाहेबांनी आपल्या पहिल्याच अग्रलेखात जी भूमिका मांडली त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खर्‍या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. 


बाबासाहेबांचा वृत्तपत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बातमी देणारे वृत्तपत्र नव्हे तर चळवळ बांधणारे मुखपत्र निर्माण करण्याचा होता. त्यानंतर बाबासाहेबांनी १९२७ मध्ये बहिष्कृत भारत, १९३० मध्ये जनता आणि १९५६ मध्ये प्रबुध्द भारत या नावांनी पाक्षिके चालविली.  


यापैकी जनता व प्रबुध्द भारत ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन बाबासाहेबांनी स्वत: न करता सहकार्‍यांकडून करून घेतले. मात्र मूकनायक व बहिष्कृत भारत या दोन्ही पत्रांचे संपादन त्यांना स्वत:च करावे लागले. 


बहिष्कृत भारतच्या संपादनात बाबासाहेब स्वत: प्रत्येक ओळ वाचत असत. बाबासाहेबांची पत्रकारिता सखोल जाणून घेण्यासाठी मूकनायक व बहिष्कृत भारत ही पत्रे त्यासाठी आधारभूत आहेत. मूकनायकाने त्याकाळी सर्वार्थाने मुक्या असलेल्या समाजाला खर्‍या अर्थाने आवाज दिला. बाबासाहेबांची पत्रकारिता होती ती समाज बदलाची आणि बंडखोर वृत्तीची. 


प्रस्थापित विषमतावादी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला भूकंपाचे धक्के देऊन तिला नेस्तनाबूत करणारी क्रांतीकारी पत्रकारिता! बहिष्कृत भारत सुरू झाले त्यावेळी महाड येथील संगराला सुरूवात झाली होती. त्याचवेळी त्यांचे भाषेचे वैभव अधिकच खुलून आले होते. 


काही शिर्षके पाहिल्यास लक्षात येईल. ‘आरसा आहे, नाक असेल तर तोंड पाहून घ्या!’ खोट्याच्या साक्षीने खरे सिध्द होते काय? आपलेपणाची साक्ष दे नाहीतर पाणी सोड, गुण श्रेष्ठ की जात श्रेष्ठ? अशा प्रकारच्या लेखांमधून बहिष्कृत भारताने रान पेटवले. 


सामाजिक बांधिलकी जोपासत चळवळीचा सहाय्यक पत्रकार म्हणून ज्यांना काम करायचे आहे त्यांनी मार्गदर्शक लेखन म्हणून बहिष्कृत भारतातील आजकालचे प्रश्‍न आणि प्रासंगिक विचार या सदरातील लेखनाचा जरूर अभ्यास केला पाहिजे. 


बाबासाहेबांनी आजकालचे प्रश्‍न आणि प्रासंगिक विचार या सदरातून केलेले स्फुटलेखन म्हणजे बिनतोड युक्तीवादाचा कळस गाठणार्‍या लेखन शैलीचा परमोच्च आविष्कार आहे. 


सळसळता त्वेष, बोचरी परंतु सभ्यतेच्या मर्यादा न ओलांडणारी टीका, कोणताही शिवराळपणा न करता समोरच्यांना गप्पगार करणारे शब्द, उपहास, उपरोध, कोट्या, म्हणी यांचा चपखलपणे केलेला वापर आणि कोणतीही भीडमुर्वत न ठेवता ब्राम्हणवादाची केलेली चिरफाड, मुख्य प्रवाहातील सारी पत्रे बाबासाहेबांच्या विरोधात आग ओकत असताना त्यांनी आपला तोल जाऊ न देता निर्भयपणे व अतिशय सुसंस्कृत पध्दतीने परखड लेखन केले. 


त्यावेळच्या तथाकथित पत्रमहर्षींना नामोहरम केले. मानवताप्रधान व बुध्दीवादी पत्रकारितेचा पायंडा त्यांनी पाडला. ही बाबासाहेबांच्या पत्रकारिय लेखनाची अनन्यसाधारण वैशिष्टये आहेत.


बाबासाहेबांची पत्रकारिता आणि ब्राम्हण-बनियांची पत्रकारिता अर्थात आजची पत्रकारिता याची तुलना केल्यास बाबासाहेबांची पत्रकारिता उजवी आहे. कारण ब्राम्हण-बनियांची पत्रकारिता अर्थात आजची पत्रकारिता ही विकाऊ झाली आहे. परंतु बाबासाहेबांची पत्रकारिता ही मानवी मुल्ये जोपासणारी होती.


आताची पत्रकारिता गल्लाभरू आणि थ्री पेजला प्राधान्य देणारी आहे. चाय तिकडचा न्याय करणारी आजची पत्रकारिता आहे. त्यामुळे ही वास्तववादी पत्रकारिता नसून ती ब्राम्हण-बनियांची टॉयलेट पत्रकारिता आहे. कुठल्याही बातमीला ‘ना शेंडा ना बुड’ अशी ही रसातळाला गेलेली आजची पत्रकारिता आहे. 


त्यातच आता सोशल मिडीयानामक पत्रकारितेने सार्‍या जगभरात धुमाकूळ घातला आहे. वृत्तपत्रे, दृकश्राव्ये, पारंपरिक व व्होकल असे मिडीयाचे चार प्रकार आहेत. कुठल्याही वृत्तपत्राचा अथवा वृत्तवाहिनीचा संपादक हा ब्राम्हण असतो. तर पारंपरिक मिडीयात बुवाबाजी सुरू असते. 


अंधश्रध्दा पसरवणार्‍या बुवाबाजींमध्येही ब्राम्हणांनी वरचे स्थान राखले आहे. म्हणून सोशल मिडीयाची भूमिका फार महत्वाची आहे. कारण हाच एक मिडीया आपल्यासाठी आजच्या घडीला उपयोगाचा आहे. वृत्तपत्र अथवा वृत्त वाहिनीपेक्षा सोशल मिडीयावर जगात घडलेली वार्ता क्षणात पोहचते. 


त्यामुळे हा मिडीया क्रांती करू शकतो. फेसबुक, गुगल, व्हॉटस ऍप, लिंक्ड इन, इंस्टाग्राम, ट्विटर यासारखे सोशल मिडीयावरील युजर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. पुन्हा एकदा क्रांतीची मशाल प्रज्वलित करायची असेल तर सोशल मिडीयाच प्रभावीपणे भूमिका बजावू शकतो. 


बाबासोहबांची पत्रकारिता म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी आरंभलेला उद्योग नव्हता. हे समजून घेण्यासाठी बाबासाहेबांनी रानडे गांधी आणि जिन्ना या सुप्रसिध्द भाषणात भारतातील पत्रकारितेविषयी केलेले भाष्य लक्षात घेतले पाहिजे. 


एकेकाळी पत्रकारिता हा एक प्रतिष्ठित पेशा होता. परंतु आता तो व्यापार झाला आहे. एखाद्याने विकण्यासाठी साबण बनवावा यापेक्षा अधिक नैतिक कार्य या पत्रकारितेत उरले नाही. ती आता जनतेच्या जबाबदार मार्गदर्शकाची भूमिका निभावत नाही. 


बातमी देताना ती अतिरंजित नसावी, त्यामागे दुष्ट हेतू नसावा याचे भान ती बाळगत नाही. सरकारने आखलेले धोरण जनतेच्या आणि समुदायाच्या हिताचे नसेल तर मग ते कितीही उच्च पदावरील व्यक्तीने ठरविलेले असेल याची तमा न बाळगता त्यावर न घाबरता तुटून पडले पाहिजे. 


योग्य धोरण कोणते असावे यासाठी निर्भिडपणे मत व्यक्त केले पाहिजे. हे आपले प्रथम आवश्यक कर्तव्य आहे असे ब्राह्मण-बनिया पत्रकारिता मानत नाही. एखाद्याला नायकत्व बहाल करणे आणि त्याचे पूजन करणे हेच आपले परमकर्तव्य असल्याचे भारतीय पत्रकारितेने ठरवले आहे. 


सनसनाटी निर्माण करणार्‍या कुहेतूने बेजबाबदार वृत्त देणे, सहेतूक स्वार्थ ठेवून लोकांच्या भावनेशी खेळणार्‍या तर्कहीन अफवा पसरविणे यात भारतीय पत्रकारिता रममाण झाली आहे. भारतीय पत्रकारिता म्हणजे वाजंत्र्यांनी आपल्या नायकाचा गाजावाजा करण्यासाठी ढोल बडविणे होय. 


भारतीय पत्रकारितेने नायकपूजेसाठी इतक्या मूर्खतम पातळीवर जाऊन देशाच्या हिताशी यापूर्वी कधीच सौदा केलेला नव्हता. आजचा भारत नायक पूजेच्या कैफाने आंधळा झाला आहे व त्यास भारतीय पत्रकारिता जबाबदार आहे. बाबासाहेबांनी हे विचार १८ जानेवारी १९४३ रोजी मांडले होते. 


मात्र आजही ते तंतोतंत खरे आहेत. त्याचप्रमाणे भारतातील ब्राम्हणांनी अद्याप एकही व्हॉल्टेअर पैदा केला नाही. ‘तुम्ही काय म्हणता या मताशी मी सहमत नसलो तरी तुमच्या या बोलण्याच्या मुलभूत अधिकाराचे मी मरेपर्यंत रक्षण करीन’, असे व्हॉल्टेअर म्हणाला होता. 


परंतु आजची ब्राम्हण-बनिया टॉयलेट पत्रकारिता कुठल्याही अधिकाराचे रक्षण न करता सर्वच अधिकाराचेे भक्षण करताना दिसत आहे. म्हणून बाबासाहेबांनी पत्रकारितेविषयी मांडलेले विचार हा कसा मानवमुक्तीचा धगधगता अंगार होता, हा अंगार फुलविण्याचा हा छोटासा लेखन प्रपंच आहे. 

दिलीप बाईत

९२७०९६२६९८PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
हा कसला चौकीदार?
मतांसाठी जवान मारण्यात आले
खासदार शेट्टींच्या दत्तक गावात पाण्यासाठी नागरिक स्त्र
राज्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढला
बांदिवडेकर यांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात
भाजपच्या पहिल्या यादीत १९ टक्के गुन्हेगारी पार्श्‍वभूम
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात अनियमतता, सार्वजन
भारताने बालाकोटमध्ये खरंच ३०० दहशतवादी मारले का?
खाजगीकरणातून विकासाची दारे बंद करण्याचा डाव
आरएसएसशिवाय पार्टी चालू शकत नाही, संघ पॉवर प्लांट तर खास
श्रीलंकेत ४ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक
संघाच्या मर्जीशिवाय भाजपा नेत्यांना मिळत नाहीत पदे
आयुष्यमान भारत योजना खाजगी रुग्णालये आणि विमा कंपन्यां
मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाची सरकारकडून फसवणूक
नीरव मोदीला निवडणुकीपूर्वी आणतील, नंतर परत पाठवतील
आनंदी देशांमध्ये भारत पाकिस्तानच्याही मागे
शिवसेना, भाजपवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार
६८ जणांचा मृत्यूूला कोणीच जबाबदार नाही?
दीक्षाभूमी विकास निधी कधीपर्यंत देता?
सत्तेची चावी प्रादेशिक पक्षांच्या हाती?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper