×

क्रिप्टोकरन्सी सीईओचा भारतात मृत्यू

Published On :    7 Feb 2019  By : MN Staff
शेयर करा:


१ हजार ३०० कोटी अडकले





वॉशिंग्टन : क्रिप्टोकरन्सी (बीटकॉईन) फर्मचा कॅनडातील ‘सीईओ’ भारतात येतो. त्याला अनाथाश्रम उघडायचे असते. परंतु आजारपणामुळे त्याचा मृत्यू होतो. सीईओच्या मृत्यूमुळे लाखभर गुंतवणूकदार हादरतात. कारण क्रिप्टोकरन्सी ज्या अकाऊंटवर जमा केलेली असते त्याचा पासवर्ड फक्त सीईओकडेच असतो. 


जगभरातील अनेक बडे सायबर सेक्युरिटीतज्ञ प्रयत्न करूनही क्रिप्टोकरन्सीचे अकाऊंट अनलॉक होत नाही. तब्बल १९० दशलक्ष कॅनेडियन डॉलर्स (सुमारे १हजार ३०० कोटी) अडकले आहेत. चित्रपटात शोभेल अशीच ही कथा घडली आहे. क्रिप्टोकरन्सीला अभासी चलन म्हणतात. मात्र ही कथा अभासी नाही खरी आहे.


३० वर्षीय मृत ‘सीईओ’चे नाव आहे गेराल्ड कॉटन आणि त्याच्या कंपनीचे नाव आहे क्वॉड्रिगासीएक्स. भारतीय दौर्‍यावर आलेल्या गेराल्डचा मृत्यू ९ डिसेंबर २०१८ ला झाला. त्याला आतड्याचा आजार होता. भारतात एक अनाथाश्रम सुरू करण्यासाठी तो आला होता. गेराल्डच्या मृत्यूला कॅनडाच्या दूतावासाने दुजोरा दिला आहे.


पत्नी कोर्टात गेल्यामुळे मृत्यूची माहिती समजली

गेराल्डची पत्नी जेनिफर रॉबर्टसन हिने कॅनडाच्या न्यायालयात याचिका दाखल करून क्रेडीट संरक्षणाची मागणी केली आहे. या याचिकेनंतर गेराल्डचा मृत्यू झाल्याचे समजले आणि सुमारे १ लाख गुंतवणूकदार हादरले. या गुंतवणूकदारांचे तब्बल १९० दशलक्ष कॅनेडियन डॉलर्स गेराल्डच्या कंपनीत गुंतलेले आहेत.


गेराल्डच्या अकाऊंटमध्ये सुमारे १९० दशलक्ष डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी अडकली आहे. या अकाऊंटचा पासवर्ड फक्त गेराल्डलाच माहीत होता. तसेच गेराल्ड ज्या लॅपटॉपवर काम करीत होता तोही इनक्रिप्टेड आहे. त्याचा पासवर्डही माहीत नाही, असे जेनिफरने याचिकेत म्हटले आहे. ज्यांनी पैसे गुंतवले ते तगादा लावत आहेत. त्यांना पैसे परत करता येत नाहीत. कंपनी आर्थिक अडचणीत आहे. गेराल्डच्या अकाऊंटला संरक्षण द्यावे, असे जेनिफरचे म्हणणे आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
काय उखडायची ती उखडा, शरद पवारांनी अमित शहांना खडसावले
साध्वी प्रज्ञा सिंह तुरुंगाबाहेर आल्या कशा?
अमित शहांनी स्वप्नात पाकिस्तानी सैनिक मारले
बुलेट ट्रेन नको, लोकल सुधारा, रेल्वे प्रवाशांची मागणी
इस्लामी दहशतवादी कारवायांसाठी हैदराबाद सुरक्षित ठिकाण
पुलवामा हल्ला प्रकरणाची चौकशी करणार का?
उल्हासनगरात भाजपा पदाधिकार्‍याचे बूथप्रमुखांना पैशां
योगी सरकार ‘काम रोको’आजाराने ग्रस्त
जिल्ह्यातील १६ गावांचा व्होटींगवर बहिष्कार
एका छाव्याची अखेर..!
शिवसेना, भाजपला मत म्हणजे देशातील हुकूमशाहीला मत
प्रज्ञा सिंहच्या शहीद करकरेंवरील वक्तव्याने पोलीस वर्त
अपयशी लोकप्रतिनिधींमुळेच कोकण पर्यटनात मागे
ब्राम्हणी आतंकवादाचा बेसूर चेहरा
प्रधानमंत्री मोदींना आताच मागास असल्याची जाणीव कशी झाल
जेटनंतर आता एअर इंडियाही संकटात?
दाभोळकरांचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही उमेदवारी
भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नाही
राज्यातील २७ तंत्रनिकेतन संस्थांना टाळे लागण्याची शक्य
सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचा आरोप
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper