×

दबाव आणि तणावात न्यायपालिका निर्णय देते

Published On :    11 Feb 2019  By : MN Staff
शेयर करा:


सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश ए.के.सिकरी यांचे परखड मत





नवी दिल्ली : आजच्या डिजीटल युगात दबाव आणि तणावात येऊन न्यायपालिका निर्णय देत असल्याचे परखड मत सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश ए.के.सिकरी यांनी व्यक्त केले आहे. सिकरी यांनी लॉएशिया येथील पहिल्या संमेलनात ‘डिजीटल युगात प्रेसची स्वतंत्रता’ या विषयावर ते रविवारी बोलत होते. 


ते म्हणाले, न्यायिक प्रक्रिया दबावात आहे. तर कुठल्याही मुद्यावर सुनावणी होण्यापूर्वी लोक चर्चा व युक्तीवाद करताना दिसतात. याचा फैसला कसा यायला हवा यावर चर्चा केली जाते. त्याचा न्यायाधीशांवर प्रभाव पडत असल्याची कबुली सिकरी यांनी दिली. प्रेसची स्वतंत्रता नागरिक आणि मानवाधिकाराची रूपरेखा, कसोटीला बदलत आहे. मीडियाची ट्रायल होत आहे. मीडियाची ट्रायल पहिलीदेखील होत होती. 


परंतु आता जी काही मीडिया ट्रायल होत आहे तो मुद्दा बुलंद केला जात आहे. एक याचिका दाखल केली जात आहे. याचिकेवर सुनावणी होण्याअगोदर लोक त्यावर चर्चा करतात. याचा फैसला काय व्हायला हवा अशी चर्चा सुरू होते. त्यामुळे या चर्चेचा प्रभाव न्यायाधीशांवर पडतो, त्याचे प्रतिबिंब न्याय देण्यावर पडते असे सिकरी यांनी सांगितले. 


सर्वोच्च न्यायालयात एखादा विषय येतो त्यावेळी तो परिपक्व झालेला असतो. कायद्याच्या चौकटीत राहून फैसला कसा करता येईल यादृष्टीने काम केले पाहिजे. परंतु आजची न्यायिक प्रक्रिया दबावात व तणावात येऊन निर्णय देत असल्याचे सिकरी यांनी स्पष्ट केले. 


काही वर्षापूर्वी सर्वोच्च अथवा उच्च न्यायालय असो एकवेळा न्यायालयाने फैसला दिला तर त्याबाबत आलोचना करण्याची मुभा होती. आता न्यायाधीश फैसले करतात त्यांनाही बदनाम केले जात आहे. तर त्यांच्याविरोधात मानहानीकारक भाषण दिले जात असल्याची खंत सिकरी यांनी व्यक्त केली.


यावेळी अतिरिक्त सॉलीसिटर जनरल माधवी गोराडिया दिवान यांनीही अशाचप्रकारे विचार व्यक्त केले. बातमी आणि खोटी बातमी, बातमी आणि विचार, नागरिक व पत्रकार यामधील फरक दिसेनासा झाला आहे. वकीलदेखील कार्यकर्ता बनल्याने मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 





PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘स्मार्ट सिटी’ योजना ठरतेय गाजर, ५८ टक्के कामांना सुरु ह
जवानांच्या हत्येच्या बदल्यासाठी भाजपाला मते द्या म्हणण
बुलेट विरोधात महापालिका कोर्टात, ठराव विखंडित कराल तर खब
ब्राम्हणवादी संघटनांकडून पुलावामा घटनेचा वापर मुस्लिम
सत्तेसाठी सरकार दंगली घडवेल, अजित पवारांंचा भाजपावर हल्
आरक्षणासाठी धनगर समाजाचे खासदारांच्या निवासस्थानी ठिय
जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला मुस्ल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शेतकर्‍यांनी आ
राज्यात बालकामगारांची स्थिती ‘जैसे थे’
विमा योजनेचा सोसायटीत रुपांतर करण्यास विरोध
पाकिस्तानविरोधी भावना भडकावून निवडणुकीत भाजपा फायदा उठ
देश शोकसागरात बुडाला असताना मोदी सभा कसे घेतात
‘बेरोजगारीने युवक अस्वस्थ’, माजी प्रधानमंत्री मनमोहन स
जम्मू-काश्मीरमध्ये बॉम्बस्फोटात ५७ टक्के वाढ
शरद करळसकरने खुनासाठी वापरलेली हत्यारे वसईच्या खाडीत फ
जवानांच्या कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी मिळतेय अवघ्या ‘सव
घटनात्मक मार्गाने समाजात बदल घडवा
नीतीश कुमारांविरोधात फास आवळला
पाचशे कोटी खर्च करूनही गोदावरी प्रदूषितच
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७ शेतकर्‍यांनी संपविली जीवनय
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper