×

भारतात लोकतंत्र नसून ब्राह्मणतंत्र

Published On :    16 Apr 2018  By : MN Staff
शेयर करा:


वामन मेश्राम यांनी केली ब्राह्मणी व्यवस्थेची चिरफाड, पाटन्यात ‘दीन बचाव, देश बचाव’ परिषद





पाटना | मूलनिवासी वृत्तसंस्था

न्यायपालिका, कार्यपालिका, संसद आणि प्रसार माध्यमे या चारही स्तंभावर ब्राह्मणांनी कब्जा केला आहे. त्यामुळे भारतात लोकतंत्र नसून ब्राह्मणतंत्र आहे, असा हल्लाबोल करत बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी ब्राह्मणी व्यवस्थेची चिरफाड केली. पाटन्यामध्ये आयोजित ‘दिन बचाव, देश बचाव’ परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी ब्राह्मण-बनिया मीडियाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. 


भारतातील ब्राह्मण-बनिया मीडिया म्हणजे टॉयलेट पत्रकारिता आहे. अमेरिका, युरोपमध्ये जसे टॉयलेटमध्ये पेपरचा वापर केला जातो तशीच भारतातील पत्रकारिता आहे. त्यामुळे ही टॉयलेट पत्रकारिता आहे. आज वृत्तपत्रे, दृकश्राव्ये माध्यम, पारंपरिक (ट्रॅडिशनल) आणि व्होकल मीडिया आहे. 



वृत्तपत्रे, दृकश्राव्ये माध्यमांबरोबरच पारंपरिक माध्यमांवरही ब्राह्मणांनी कब्जा केला आहे. मुरारी बापू, आसाराम बापू सगळेच खिसे कापू! त्यामुळे हे सर्व खिसे कापू ब्राह्मणवादाचे प्रचारक आहेत. आज ब्राह्मणांचे प्रशासनावर ८० टक्के कब्जा आहे. आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस यासारख्या प्रशासनिक पदांवर ब्राह्मण आहेत. 


त्यामुळे प्रशासन ब्राह्मणांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना हवे तसे निर्णय घेत आहेत. हे सर्व निर्णय एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी आणि धर्मपरिवर्तीत यांच्या विरोधात घेतले जात आहेत. म्हणून भारतात लोकतंत्र नसून ब्राह्मणतंत्र आहे, असा हल्लाबोल करत मेश्राम यांनी ब्राह्मणी व्यवस्थेची चिरफाड केली. 


यावेळी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव मौलाना रहमानी यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. सरकार दहशत पसरवत आहे. शरियतवर हल्ले होत आहेत. लोकशाहीच्या नावाखाली स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. 


त्यामुळे या जुलमाविरोधात सर्व मूलनिवासी बहुजनांनी एकत्र यायला हवे. देशातील सध्या मुस्लिमांवर अत्याचार वाढत आहेत. आपण शत्रूंना ओळखले पाहिजे. त्याचा सामना करायला पाहिजे. हे सरकार सर्वांना दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.


मांस घेऊन जाणार्‍या मुस्लिमांना मारुन टाकल्या जात आहे. या देशात माणसाचे रक्त स्वस्त आणि गोमूत्र महाग झाले आहे. हे रोखण्यासाठी आपण मजबूत गरजेचे असल्याचे रहमानी यांनी स्पष्ट केले. या परिषदेला बिहार बरोबरच झारखंड, ओडिसातून मोठ्या प्रमाणावर मुस्लीम बांधव उपस्थित होते. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बुलेट ट्रेनला गुजरातच्या शेतकर्‍यांचाही विरोध
अमित शहांचे मनसुबे उधळवून लावणारे मंत्री शिवकुमार ‘ईडी
हिंदु धर्मातील अनिष्ट प्रथांवर सोशल मीडियातून टीका हा ग
तुझा पाय तोडेन
ओएनजीसीसाठी दिल्लीतील कृषी भवनात बनावट मुलाखती
राज्यावर भारनियमनाचे सावट
महागाईचा पुन्हा भडका
राष्ट्रीय परिवर्तन यात्रेला ब्रम्हादेखील रोखू शकत नाही
मोहनदास गांधीना नेता मानल्याने ओबीसींची वाताहात
स्वत:च्या वर्चस्वासाठी ब्राम्हणांनी ११ वेळा केले भारता
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार?
सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निल
२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द
परराज्यातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या
साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ४०० कोटींची फसवणूक?
नरेंद्र मोदी ठरले ‘प्रसिध्दी विनायक’
बँकांचे १ हजार २२४ कोटींचे कर्ज थकवले
राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात
करार कमी दरात असेल तर १२६ ऐवजी ३६ राफेल का खरेदी केले
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper