×

उद्देशासाठी समर्पित भावनेने कार्यकर्त्याने काम केले पाहिजे

Published On :    11 Mar 2019  By : MN Staff
शेयर करा:


दोन दिवसीय राज्यस्तरीय संघटनात्मक प्रशिक्षण शिबीरात डी.आर.ओहोळ यांचे प्रतिपादन

पुणे : कितीही वादळे आली तरी उद्देश विसरता कामा नये. उद्देश पूर्तीसाठी समर्पित भावनेने कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे असे प्रतिपादन बामसेफचे राष्ट्रीय महासचिव (प्रभारी) डी.आर.ओहोळ यांनी केले. पुणे गंजपेठेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित दोन दिवसीय राज्यसतरीय संघटनात्मक प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संघटना कशी निर्माण होते, संघटनेची कुठली अंगे आहेत यावर प्रकाशझोत टाकला. ओहोळ यांच्या अप्रतिम सादरीकरणाचे उपस्थित कार्यकर्त्यांनी कौतुक केले.


आम्ही स्वातंत्र्याचे दुसरे आंदोलन सुरू करत आहोत. १५ ऑगस्ट १९४७ ला आपण स्वातंत्र्य झालेलो नाही. तर ब्राम्हण स्वातंत्र्य झाला आहे. जे घाबरतात ते आंदोलन चालवू शकत नाहीत. अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर म्हणतात, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तेथून सुरूवात करा. आपल्याशी असलेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. पळून जाणे नव्हे तर लढणे हा आंबेडकरवाद आहे. कधीही संतुष्ट रहायचे नाही. 


भारतात दोन विचारधारा काम करत आहेत. एक ब्राम्हणी व दुसरी मूलनिवासी महापुरूषांची विचारधारा. ब्राम्हणी विचारधारा ही केवळ सवालांची तर आपल्या महापुरूषांची विचारधारा उत्तरांची आहे. हे संटघटनात्मक प्रशिक्षण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ४० वर्षाच्या संघर्षाचा सार आहे. बामसेफ एक मुक्त विद्यापीठ आहे. एक मेंदूची व दुसरी पोटाची भूक असते. मेंदूची भूक भागवण्याचे काम बामसेफ करत आहे असे ओहोळ यांनी सांगितले. 


विचार केल्याने विकास होतो असे स्पष्ट करताना विश्‍वास ठेवण्याअगोदर हे खरे असेल का? यामध्ये हात कुणाचा आहे? याचा फायदा कुणाला होईल? याचे नुकसान कोणाला होईल? याचा परिणाम काय होईल? असे पाच प्रश्‍न मनाला विचारायला हवेत. कुठल्याही घटनेमागे कारण असते. ते कारण शोधून काढायला हवे. मुस्लिमांकडे बिफ आहे हे समजते, परंतु पुलवामा हल्ल्यात ३५० किलो आरडीएक्स कुठून आले? याची माहिती मिळत नाही याला काय म्हणावे असा सवाल ओहोळ यांनी उपस्थित केला. 


ब्राम्हण संकटात आल्यानंतर तो देव, धर्माची भीती दाखवतो. देव, धर्माची भीती दाखवूनही लोक घाबरत नसतील तर देशाची सरहद्द असुरक्षित केली जाते. सरहद्दीवर अशांतता माजवली जाते. देश संकटात घालण्याचे काम केले जाते. पुलवामा हल्ला हा त्याच प्रकारातला आहे असे ओहोळ यांनी स्पष्ट केले. 


शिक्षण आणि प्रशिक्षण यामध्ये मूलभूत फरक आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षणाची व्याख्या करताना सांगितले की, खरं आणि खोटं यामधील जे अंतर आहे, त्यातील फरक ओळखण्याची अक्कल निर्माण करते ते शिक्षण. खर्‍यासाठी संघर्ष करणे आणि खोट्याला विरोध करणे हे शिक्षण आहे. सत्याला सत्य जाणा व असत्याला असत्य जाणा ही तथागत गौतम बुध्दांनी शिक्षणाची पहिली व्याख्या केली होती. मन, मस्तक, मेंदू, मनगट मजबूत करण्यासाठी हे संघटनात्मक प्रशिक्षण आहे. 


शिक्षणाचे दोन प्रकार आहेत. एक पुस्तकी व दुसरे सामाजिक शिक्षण. सामाजिक शिक्षणामुळे सामाजिक प्रामाणिकता बनते व सामाजिक प्रामाणिकतेमुळे सामाजिक चळवळ उभी राहते. शिक्षणामुळे लॉजिक विकसित होते. त्यामुळे व्हिजन विकसित होते. व्हिजन विकसित झाल्याने सम्राट बनता येते असे ओहोळ यांनी स्पष्ट केले. परंतु आता तर्क न करणारे शिक्षण दिले जात आहे. अनुभव हा सर्वात मोठा संदर्भ आहे. अडाणी लोक टिव्हीवर व रेडीओवर जे सांगितले जाते त्याच्यावर विश्‍वास ठेवतात तर शिकलेल्यांना पेपरात व पुस्तकात आलेले खरे वाटते. ही माध्यमे कोण चालवते तर ब्राम्हण. म्हणजे एकूण ब्राम्हणाचे खरे वाटते असेही त्यांनी सांगितले. 


कुठल्याही शब्दासमोर एखादा प्रत्यय लागला तर त्या शब्दाला मोठा अर्थ प्रापप्त होतो. वर्ग-प्रवर्ग, वर्तन-प्रवर्तन तर तसेच शिक्षण-प्रशिक्षण आहे. निकाल काढण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. संघटनेद्वारा दिलेली जबाबदारी सफलतापूर्वक पूर्ण करणे त्यासाठी वैज्ञानिक पध्दतीने प्रशिक्षण दिले जाते. संघटन कसे बनवले जाते. कोण बनवतो व संघटनेचे घटक कोणते?  यावर ओहोळ यांनी प्रकाशझोत टाकला. 


समाजाची समज विकसित करण्यासाठी हे प्रशिक्षण आहे. समाजाला माहिती हवी. ज्ञान असायला हवे. अनुभव असायला हवा. कुशलता असायला हवी. विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी सामाजिक आंदोलनात उडी घेतली त्यावेळी त्यांना काही कमतरता आढळली. त्यावेळी कुठल्याही प्रकारे चळवळीचा इतिहास माहित नव्हता व कागदपत्रे उपलब्ध नव्हती, सामायिक लक्ष्य नव्हते व सुसंवाद नव्हता. ही भरपाई भरून काढण्यासाठी मग बाबासाहेबांनी आपला इतिहास धुंडाळला. ही कमतरता कमी करण्यासाठी बामसेफने आपला लिखीत इतिहास उपलब्ध करून दिला. 


संघटनेचा विचार हा एकाच्या मनात येतो. परंतु संघटनेत अनेक लोक असतात. राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांनी स्वत:च्या सन्मानाची चळवळ निर्माण केली. उद्देशामुळे संघटना निर्माण केली जाते. संघटनेचे पाच प्रकार आहेत. मदत करणारी, लोकप्रिय, अन्याय अत्याचार निवारण, ट्रेड युनियन, समर्पित भावनेने काम करणार्‍या संघटना. आजच्या घडीला समर्पित भावनेने काम करणारी बामसेफ ही एकमेव संघटना आहे. 


आपल्या संघटनेकडे बघण्याचा ब्राम्हणांचा दृष्टीकोन वेगळा आहे. तो म्हणजे चळवळीकडे दुर्लक्ष करा, चळवळीत फूट पाडा, संघटनेच्या नेतृत्वाला विकत घ्या, चळवळीला प्रकाशित आणू नका, चळवळीचे चारित्र्यहनन करा असे फंडे वापरले जातात. सिध्दार्थ महाविद्यालय मुंबई येथे १७ ऑगस्ट १९५२ ला भाषण करताना विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, मी स्वाभीमानी लोकांचे संघटन बनवू शकलो नाही. संघटनेचे घटक कोणते आहेत. उद्देश, विचारधारा, नीती-धोरण, कार्यक्रम, कार्यप्रणाली, अनुशासन, नेतृत्व, कार्यकर्ता व सभासद असे घटक आहेत. उद्देश पूर्तीसाठी संघटना बनवल्या जातात. म्हणून उद्देशाला विसरता कामा नये असे ओहोळ यांनी स्पष्ट केले. 


दरम्यान, काही संघटना असफल का ठरल्या यावर भाष्य करताना ओहोळ म्हणाले, निरूद्देश काम, साधनांचा अभाव, क्रांतीकारी विचार अन्य जातींमध्ये फैलावला नाही. विचारांचे नाते सर्वात मोठे असते. डावपेच परिवर्तनशील असते, उद्देश परिवर्तनशील नसते. निरंतर वाहणार्‍या धारेला विचारधारा म्हणतात. ज्यांची विचारधारा प्रस्थापित होते त्यांची व्यवस्था असते. 


महापुरूषांना मारता येते परंतु त्यांच्या विचाराला मारता येत नाही असे अमेरिकेचे जोसेफ मॅझिनी म्हणाले होते. परंतु याला विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी छेद दिला. महापुरूषांना मारता येते त्याचबरोबर महापुरूषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार न केल्यास विचारधाराही मरते असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे सतत विचारधारेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. कालसंगत आणि कालबाह्य विचारधारा असते. त्यामुळे कालसंगत विचारधारा स्विकारली पाहिजे. एकट्याने विचार केल्यास नकारात्मक वाढते. त्यामुळे कलेक्टीव्ह विचार करायला हवा. निराशावादी विचारधारा कधीच सांगू नये. लोकांना जागृत करायला हवे. 


बामसेफ हे गैरधार्मिक, गैर राजनितीक व गैर संघर्षिक संघटन आहे. कार्यकर्त्याने जबाबदारी घ्यायला हवी. कार्यकर्त्याने गंभीर व्हायला हवे. जो गंभीर होतो तो विचार करतो आणि जो विचार करतो तो जबाबदारी घेतो. नेतृत्वाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी व धर्मपरीवर्तीत लोकांचा दुशमन हा एकच आहे तो म्हणजे ब्राम्हण. त्यामुळे आपल्याला सर्वांना एकत्र यायला हवे. 


ब्राम्हणांनी ओबीसींचे कल्याण केलेली एक गोष्ट दाखवा आणि बाबासाहेबांनी ओबीसींचे नुकसान केलेली एक गोष्ट दाखवा असे ओहोळ यांनी आव्हान दिले. कुठल्याही संघटनेला तीन बाबींमुळे यश मिळते, ते म्हणजे समाजाचे समर्थन, संघटनेची शक्ती व नेतृत्वाचे डावपेच आहेत. कार्यक्रमामुळे विचारांची निर्मिती होते. विचारांमुळे ज्ञान वाढते. ज्ञानामुळे जागृती होते. जागृतीमुळे  चेतना निर्माण होते. चेतनामुळे समाज गतीशील बनतो. समाज गतीशील बनल्यामुळे समाजात बदल होतो. समाजात बदल झाल्यामुळे क्रांती होते असे त्यांनी क्रांतीचे महत्व विषद केले. 


ज्याला भविष्याचे आकलन होत नाही तो गुलाम होतो. गुलाम नेहमीच मालकाची ऑर्डर फॉलो करतो. लोक म्हणतील तसे नेत्याने वागू नये तर नेता म्हणेल तसे लोकांनी वागले पाहिजे. यश माझे व पराजयही माझा असा म्हणणारा नेता असतो. सामान्य लोकांना असामान्य व साधारण लोकांना असाधारण बनवतो तो नेता असतो. पावसाळ्यात जसे भूछत्र उगवते तसे सिझनरी नेता नको तर व्हिजनरी नेता असायला हवा. नेत्याला व्यवस्थेची समज असायला हवी. ६ हजार जातींना जोडण्यासाठी कार्यक्रम हवा. त्यासाठी नियोजन असायला हवे. साहस, निर्भय व निडर असायला हवे. संयम असायला हवा. त्याग व समर्पणाची भावना असायला हवी. सामाजिक इमानदारी असायला हवी. ज्याच्याकडे हे गुण आहेत तोच खरा नेता आहे. 


कार्यकर्ता म्हणजे कार्य करणारा होय. बुध्दांनी आपल्या कार्यकर्त्यांना भिक्खू संघ असे नाव दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळा तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा यांनी सत्यशोधक असे कार्यकर्त्यांना नाव दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता हा कर्मचारी आहे. तर बामसेफने प्रचारक असा शब्दप्रयोग सुरू केला. कार्यकर्त्याचे पाच काम आहेत. प्रचार करणे, प्रसार करणे, मानवी संसाधनांचा निर्माण करणे, आर्थिक साधनांचा निर्माण करणे, बुध्दी व वेळ देण्यासाठी लोकांना तयार करणे होय. नेतृत्व आणि मूलनिवासी बहुजन समाजाचा दुवा म्हणजे कार्यकर्ता असतो. एकंदरीत त्याची भूमिका ही पुलासारखी असते असे ओहोळ यांनी सांगितले. 


कार्यकत्याने चारित्र्यसंपन्न असायला हवे. निर्व्यसनी असायला हवे. उक्ती तशी कृती असायला हवी. जगात काय होते आहे याची माहिती असायला हवी. शोध लावण्यापूर्वी लोक वेडा म्हणतात आणि शोध लावल्यावर शास्त्रज्ञ म्हणतात तर क्रांती करण्यापूर्वी वेडा म्हणतात आणि क्रांती झाल्यावर क्रांतीकारक म्हणतात अशी लोकांची मानसिकता आहे. 


संघटनेची मूलतत्वे काय आहेत तर ब्रॉडबेस, मासबेस व केडरबेस संघटना असायला हवी असे ओहोळ यांनी स्पष्ट केले. यावेळी बामसेफचे राष्ट्रीय महासचिव (प्रशिक्षण) कुमार काळे, राष्ट्रीय मूलनिवासी महिला महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुजाता काळे, भारत मुक्ती मोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्षा प्रतिभा उबाळे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय युवाध्यक्ष अनील माने, इम्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मगन ससाणे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अझहरी, प्रा. विलास खरात, भारत मुक्ती मोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेश कार्याध्यक्ष सचिन बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 


...संधी मिळाल्यास बामसेफच्या केडरमध्ये शिकवलेला अभ्यासक्रम

आज ब्राम्हण लिहतो आणि आम्ही वाचतो. त्यामुळे ब्राम्हणाने आपल्या हवे तसे लेखन केले. इतिहासाचे विकृतीकरण केले, त्यामुळे आम्हांला संधी मिळाल्यास बामसेफच्या केडरमध्ये शिकवलेला अभ्यासक्रम असेल असे ओहोळ यांनी सांगितले. 


ब्राम्हणांसाठी ‘मूलनिवासी’ आरडीएक्स!

ब्राम्हणांनी येथील लोकांना जातीत वाटले. डॉ.आंबेडकरांनी त्या जातींचा प्रवर्ग बनवला. तर आता बामसेफने ज्योतीराव फुलेंचा मूलनिवासी हा शब्दप्रयोग रूढ केला. ‘मूलनिवासी’ हा शब्दच ब्राम्हणांसाठी आरडीएक्स आहे असा बॉम्बगोळा डी.आर.ओहोळ यांनी टाकला. आत्मा अमर नाही तर डीएनए अमर असल्याचे सांगतानाच त्यांनी ब्राम्हणवादाचे वाभाडे काढले.  PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटशी संबधित याचिका फेटाळली
लोकसभा निकालाच्या तोंडावर पेट्रोल-डिझेल दरवाढीची चिन्ह
ईव्हीएम छेडछाडीची चिंता लागल्याचा प्रणव मुखर्जींचा खोट
बोधगया मुक्तीसाठी काऊंटर प्लॅनिंग बनवायला हवे
ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी एक्झीट पोलचा होतोय वापर
‘बँक ऑफ बडोदा’च्या ८०० ते ९०० शाखा होणार बंद?
केंद्रीय अर्थमंत्री, संरक्षणमंत्र्यांनी थकवले सरकारी ब
ऑस्ट्रेलियात मॉरिसन यांच्या आघाडीची सरशी
मोदी आणि गँगसमोर निवडणूक आयोग झुकला
प्रज्ञासिंहला भाजपामधून हाकलण्यासाठी भाजपाने विचार कर
उत्तरप्रदेशमध्ये भाजपाची गुंडागर्दी सुरूच
आमरसभंग! ८ लाख ८७ हजारांचा रासायनिक पदार्थमिश्रीत आमरस ज
तीव्र दुष्काळामुळे राज्यातील २६ धरणे कोरडी
गुजरातमध्ये अनु.जातींवरील अत्याचार वाढीविरोधात आंदोलन
सातव्या टप्प्यातील १७० उमेदवारांवर गुन्हे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper