×

निकाल येण्याआधीच भाजपा सरकार बनवणार याचा अर्थ लोकसभा निवडणुका मॅनेज

Published On :    11 Mar 2019  By : MN Staff
शेयर करा:


अमित शहांच्या विधानाचा बीएमपीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.एल.मांतग यांनी घेतला खरपूस समाचार





नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांचा निकाल २३ मे रोजी येणार आहेत. मग अगोदरच २६ मे रोजी भाजपा सरकार बनवणार हे कुठल्या अर्थाने सांगत आहेत. याचा अर्थ लोकसभा निवडणुका मॅनेज करण्यात आल्या आहेत व ईव्हीएममध्ये गडबड करून निवडणुका जिंकल्या जातील असा हल्लाबोल बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.एल.मातंग यांनी केला. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या विधानाचा मातंग यांनी खरपूस समाचार घेताना ते एमएनटीव्हीशी बोलत होते. 


भाजपाला उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल या ठिकाणी आव्हान मिळणार आहे. त्यामुळे सात टप्प्यामध्ये निवडणूक घेण्यामागे निवडणूक आयोगाने वेळेचे नियोजन केले आहे. भाजपा आपल्या मनुष्यबळाला रिलीज करुन त्या ठिकाणी नेऊ इच्छिते. ४९ दिवसाचा वेळ आणि मोजणी करण्यासाठी आणखी ३ दिवस लागत असेल तर मग व्हीव्हीपॅटची एक दोन दिवसात मोजणी करण्यासाठी काय अडचण आहे? असा सवालही मातंग यांनी उपस्थित केला. 


भाजपा ईव्हीएममध्ये गडबड करून निवडणूक जिंकू इच्छिते. अमित शहांनी २६ मे ला पुन्हा सरकार बनवू अशी आधीच घोषणा केली आहे. परंतु २३ मे ला निवडणुकीचा निकाल येणार आहे आणि २६ मे ला सरकार बनवणार याचा अर्थ हे सर्व पहिलेच मॅनेज केल्याचा आरोप मातंग यांनी केला. निवडणूक आयोगाला निष्पक्ष निवडणुका करायच्या असतील तर उमेदवाराने किती खर्च केला पाहिजे हे ठरविले पाहिजे. त्याचप्रमाणे पार्टीने किती खर्च केला पाहिजे हेदेखील ठरविले पाहिजे. कारण पक्षांद्वारे अमर्यादित खर्च केला जातो. उमेदवार करोडो रुपये खर्च करतात आणि ते पार्टीच्या अकाऊंवर दाखविले जाते. जर असे असेल तर मग निवडणुका निष्पक्ष कशा? असाही सवाल त्यांनी केला.


निवडणूक आयोग आचारसंहिता स्ट्रिकली फॉलो करवू इच्छिते तर मग रात्रंदिवस प्रचार-प्रसार करणार्‍या मीडियावर सुध्दा बंदी आणली पाहिजे. इतरांना मात्र रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी असते मग मीडियाला का नाही? असा सवाल करतानाच पत्रक छापायचे असेल तर परवानगी घ्यावी लागते. मग पेपरमध्ये जी पहिल्या पानावर जाहिराती दिल्या जातात त्यासाठी कमीत कमी २५ लाख रुपये द्यावे लागते. जर एका दिवसामध्ये २० पेपरमध्ये छापले तर ५ करोड रुपये द्यावे लागतात. जर पत्रक छापले तर खाली लिहावे लागते की किती छापणार आहात. परंतु पेपरमध्ये करोडो रुपयाच्या दररोज जाहिराती दिल्या जातात त्यावर कुठल्याही प्रकारची आचारसंहिता नाही. 


त्याचप्रमाणे पक्षाद्वारे मोठमोठ्या होर्डिंग्सही लावल्या जातात आणि ते निवडणुकापर्यंत तशाच असतात. मग निवडणूक आयोग त्यांच्यावर आचारसंहिता का लागू करत नाही? यावरुन निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणूक करत नसल्याचे मातंग यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोग आर्मी लोकांचा पोस्टवर वापर करणार्‍या, मंदीराच्या नावावर मत घेणार्‍या भाजपावर कारवाई करेल का? असाही सवाल त्यांनी केला.


निवडणूक आयोगाला निवडणुका निष्पक्ष करायच्या असतील तर सर्व पक्षांकडून स्टॅम्प पेपरवर घोषणापत्र लिहून घेण्याची सक्ती केली पाहिजे. मागील निवडणुकांमध्ये मोठी आश्‍वासने दिली परंतु जनतेसोबत विश्‍वासघात झाला. मग निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कोणती कारवाई केली? केवळ निवडणुका घेणे हेच निवडणूक आयोगाचे काम आहे का? ५ वर्षापर्यंत निवडणूक आयोगाने काय केले? 


राफेलची फाईल मिळत नसल्याचे सांगितले जाते. सुप्रीम कोर्ट अंबानीपासून ती फाईल घेऊ शकते, कारण त्यांच्यासोबत करार झालेला आहे. जर अंबानीपासून मिळत नसेल तर फ्रान्सकडून मागविली जाऊ शकते. ते फ्रान्सला देणे बंधनकारक आहे. परंतु असे करताना दिसत नाही. निवडणूक आयोग निवडणुकांसंबंधी गंभीर नाही. जनतेची दिशाभूल करुन निवडणुका जिंकल्या जातात. जर निवडणुका निष्पक्ष करायच्या असतील तर १०० टक्के पेपर ट्रेलची मोजणी झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
अल्पसंख्य ब्राम्हणांसाठी कॉंग्रेसकडून लोकसभा उमेदवार
भाजपाने स्वत:च्या साईटसाठी आमचा कोड चोरला
राजकीय फायद्यासाठी मोदींना आता चहावाला सोडून चौकीदार आ
प्रकाश आंबेडकरांनी राज्यघटनेचा खून केला
५६ इंच छातीवाल्यांनी ‘कुलभूषण’ला का सोडविले नाही?
ब्राम्हण असल्याने मी चौकीदार होऊ शकत नाही
माणगाव परिषदेने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व पुढे
आमचा युतीला उघड पाठिंबा, आंबेडकर करतात छुपी मदत
‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिकच्या मेकर्सवर भडकल्या शबाना
मोदींच्या नावाने मत मागायला आले तर कानाखाली आवाज काढा
आम्ही कॉंग्रेससारखा पाठीत खंजीर खुपसणार नाही!
विठ्ठल पुजेत म्हणण्यात येणार्‍या पुरुषसूक्तविरोधात रा
‘मी पण चौकीदार’ म्हणणार्‍या वकीलांभोवती चौकशीचा फास
सार्वजनिक क्षेत्रातील चौकीदारांच्या भर्तीत महाघोटाळा
अनु.जातीच्या विद्यार्थ्याला झाडाला बांधून मारहाण, गुजर
‘भारत माता की जय’ म्हणणे राष्ट्रवाद नाही
भारतीय संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व ३३ टक्क्यांपेक्षा
ब्राम्हणवादी संघटनेच्या टोळक्याकडून मुस्लीम कुटुंबाल
प्रधानमंत्र्यांच्या विरोधात १११ शेतकरी
लोकसभेसाठी हाती धत्तुरा मिळूनही घटक पक्षांचे भाजपासमोर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper