×

८ कंपन्यांनी केला २२४ कोटींचा जीएसटी घोटाळा

Published On :    14 Mar 2019  By : MN Staff
शेयर करा:


१ हजार २८९ कोटी रूपयांची बनावट बिले केली तयार





हैदराबाद : केंद्रीय जीएसटी अधिकार्‍यांनी २२४ कोटी रुपयांचा कर घोटाळा उघडकीस आणला आहे. या घोटाळ्यात लोह आणि पोलाद उत्पादनाच्या व्यापाराशी संबंधित असलेल्या आठ कंपन्या सहभागी आहेत. त्यांनी १ हजार २८९ कोटी रुपयांची बनावट बिले (इन्व्हॉइस) तयार करून हा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे.


हैदराबादच्या केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून, १९.७५ कोटी रुपयांची रोख रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. घोटाळ्यात सहभागी असलेल्या कंपन्यांच्या विविध ठिकाणांवर धाडी टाकून तपासणी करण्यात आली. यात निवासस्थाने आणि कार्यालयांचा समावेश आहे. 


या धाडीत महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. निवेदनात म्हटले आहे की, जुलै २०१७ पासून हा घोटाळा सुरू होता. घोटाळेखोर कंपन्या टीएमटी सळया, एमएस सळया आणि एमएस फ्लॅट उत्पादने इत्यादी उत्पादनांचा व्यवसाय करतात. या कंपन्यांनी या सळयांचा कोणत्याही प्रकारे पुरवठा न करताच खोटी बिले तयार करून माल विकल्याचे दाखविले. आपल्याच समूहातील कंपन्यांना माल खरेदीदार दाखविले. खरेदीदार कंपन्यांच्या नावे इनपुट टॅक्स क्रेडिट हस्तांतरित करण्यात आले. या कंपन्यांनी तयार केलेल्या बनावट बिलांची रक्कम १ हजार २८९ कोटी रुपये आहे. यातून त्यांना २२४ कोटी रुपयांचे इनपुट क्रेडिट मिळाले. 


पाच कंपन्या, पत्ता मात्र एकच

निवेदनात म्हटले आहे की, घोटाळ्यातील पाच कंपन्यांना पत्ता एकच आहे. या कंपन्यांचे अनेक संचालक, भागीदार आणि मालमत्ताही समान आहेत. आपली उलाढाल वाढवून दाखविण्यासाठीही या कंपन्यांनी बनवेगिरी केल्याचे तपासात आढळून आले आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
अल्पसंख्य ब्राम्हणांसाठी कॉंग्रेसकडून लोकसभा उमेदवार
भाजपाने स्वत:च्या साईटसाठी आमचा कोड चोरला
राजकीय फायद्यासाठी मोदींना आता चहावाला सोडून चौकीदार आ
प्रकाश आंबेडकरांनी राज्यघटनेचा खून केला
५६ इंच छातीवाल्यांनी ‘कुलभूषण’ला का सोडविले नाही?
ब्राम्हण असल्याने मी चौकीदार होऊ शकत नाही
माणगाव परिषदेने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व पुढे
आमचा युतीला उघड पाठिंबा, आंबेडकर करतात छुपी मदत
‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिकच्या मेकर्सवर भडकल्या शबाना
मोदींच्या नावाने मत मागायला आले तर कानाखाली आवाज काढा
आम्ही कॉंग्रेससारखा पाठीत खंजीर खुपसणार नाही!
विठ्ठल पुजेत म्हणण्यात येणार्‍या पुरुषसूक्तविरोधात रा
‘मी पण चौकीदार’ म्हणणार्‍या वकीलांभोवती चौकशीचा फास
सार्वजनिक क्षेत्रातील चौकीदारांच्या भर्तीत महाघोटाळा
अनु.जातीच्या विद्यार्थ्याला झाडाला बांधून मारहाण, गुजर
‘भारत माता की जय’ म्हणणे राष्ट्रवाद नाही
भारतीय संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व ३३ टक्क्यांपेक्षा
ब्राम्हणवादी संघटनेच्या टोळक्याकडून मुस्लीम कुटुंबाल
प्रधानमंत्र्यांच्या विरोधात १११ शेतकरी
लोकसभेसाठी हाती धत्तुरा मिळूनही घटक पक्षांचे भाजपासमोर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper