×

‘मुद्रा’ अंतर्गत रोजगाराचा मोदी सरकारने अहवाल दडवला

Published On :    14 Mar 2019  By : MN Staff
शेयर करा:


माहिती मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण, निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून चाल





नवी दिल्ली : केंद्र सरकारने मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रीफायनान्स एजन्सी (मुद्रा)अंतर्गत किती नोकर्‍या उत्पन्न झाल्या, याबाबतचा लेबर ब्युरोचा अहवाल सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. येत्या दोन महिन्यांपर्यंत हा अहवाल प्रसिध्द न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सरकारला दगाफटका होऊ नये, या उद्देशाने मोदी असे करत असल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


नोकर्‍या उत्पन्न होण्यासंदर्भातील हा तिसरा अहवाल आहे. तोसुध्दा मोदी सरकारने सार्वजनिक करण्याआधीच दडवला आहे. मुद्रा योजनेंतर्गत उत्पन्न झालेल्या नोकर्‍यांच्या संख्यांशी संबंधित आकडे येत्या निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहेत. तज्ज्ञांच्या कमिटीला या अहवालासाठी वापरण्यात आलेल्या पध्दतीमध्ये अनियमितता आढळली आहे. २२ फेब्रुवारीला द इंडियन एक्स्प्रेसनं एक वृत्त छापलं होतं. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसचा अहवाल फेटाळल्यानंतर एनडीए सरकारनं लेबर ब्युरोच्या सर्व्हेच्या निष्कर्षांचा वापर करून नवा अहवाल बनवण्याचं ठरवलं होतं.


गेल्या शुक्रवारी झालेल्या एका बैठकीत लेबर ब्युरोनं अहवालात काही त्रुटी आढळल्या होत्या, त्या दुरुस्त करण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यासाठी लेबर ब्युरोनं दोन महिन्यांचा अवधी मागितला आहे. केंद्रीय श्रम मंत्र्यांनी या अहवालाला अद्याप मंजुरी दिलेली नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा अहवाल निवडणुकांनंतर सार्वजनिक करण्यात येणार आहे. 


एनडीए सरकारनं आतापर्यंत एनएसएसओच्या लेबर ब्युरोचा नोकरी आणि बेरोजगारीसंदर्भातील वार्षिक अहवाल सार्वजनिक केलेला नाही. या दोन्ही रिपोर्टमध्ये एनडीए सरकारमध्ये बेरोजगारी वाढल्याचं नमूद करण्यात आलं आहे. नोकरी आणि बेरोजगारीसंदर्भातील लेबर ब्युरोचा वार्षिक अहवालात सांगण्यात आलं आहे की, २०१६-१७मध्ये बेरोजगारी चार वर्षांच्या स्तरात ३.९ टक्के होती. २०१७-१८मध्येही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं या अहवालांतून समोर आलं आहे. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटशी संबधित याचिका फेटाळली
लोकसभा निकालाच्या तोंडावर पेट्रोल-डिझेल दरवाढीची चिन्ह
ईव्हीएम छेडछाडीची चिंता लागल्याचा प्रणव मुखर्जींचा खोट
बोधगया मुक्तीसाठी काऊंटर प्लॅनिंग बनवायला हवे
ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी एक्झीट पोलचा होतोय वापर
‘बँक ऑफ बडोदा’च्या ८०० ते ९०० शाखा होणार बंद?
केंद्रीय अर्थमंत्री, संरक्षणमंत्र्यांनी थकवले सरकारी ब
ऑस्ट्रेलियात मॉरिसन यांच्या आघाडीची सरशी
मोदी आणि गँगसमोर निवडणूक आयोग झुकला
प्रज्ञासिंहला भाजपामधून हाकलण्यासाठी भाजपाने विचार कर
उत्तरप्रदेशमध्ये भाजपाची गुंडागर्दी सुरूच
आमरसभंग! ८ लाख ८७ हजारांचा रासायनिक पदार्थमिश्रीत आमरस ज
तीव्र दुष्काळामुळे राज्यातील २६ धरणे कोरडी
गुजरातमध्ये अनु.जातींवरील अत्याचार वाढीविरोधात आंदोलन
सातव्या टप्प्यातील १७० उमेदवारांवर गुन्हे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper