×

‘कांशी तेरी नेक कमाई, तुने सोती कोम जगाई!’

Published On :    15 Mar 2019  By : MN Staff
शेयर करा:


मान्यवर कांशीराम यांनी उत्तर भारतात मागासवर्गीय समाजात जनजागृती करून बहुजन समाजाला जागे केले म्हणून ही घोषणा बहुजन समाजाच्या घराघरात दिली जाते ‘कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई’ कांशीराम यांचा जन्म १५ मार्च १९३४ ला झाला.

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होत आहे. कालपर्यंत प्रत्येक जातीचे लोक आमच्या जातीला एवढे आरक्षण मिळाले पाहिजे नाही तर येणार्‍या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवू असे सत्ताधारी पक्षांना भीती दाखवित होते. या सर्व मागासवर्गीय समाजातील जाती कशा जागृत झाल्या? कोणी केल्या? तर हे महापुरुषांचे महामानवाचे, संतांचे,मान्यवरांचे ऐतिहासिक कार्य आहे त्यांनी त्यांच्या काळात बहुजन समाजाला जाती तोडो समाज जोडो ही घोषणा दिली. 


स्वतःची जात जागरूक करत नाही दुसर्‍याच्या जातीचे नेतृत्व करणार्‍यांना नेत्यांना राजकारणात जास्त महत्व प्राप्त होते. ते वेळोवेळी तोडल्या गेले म्हणूनच आम्ही भारतीय नागरिक किंवा मतदार म्हणून जागृत झालो तर राजकीय परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही हा इतिहास आहे.


भारतीय राजकारणात जातीला आणि त्यांच्या समूहाला जे नाव दिले जाते तेच त्याचे हुकमी पत्ते असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजाती धर्मातून जे तडफदार तरुण गोळा केले त्यांना त्यांनी नांव दिले होते मावळे. हेच मावळे शिवाजी महाराजाच्या नेतृत्वात संघटीत झाले. स्वकियाशी ३२ आणि परकीयांशी १२ लढाया लढून त्यांनी रयतेचे राज्य स्थापन करून स्वराज निर्माण केले होते. 


महात्मा जोतीराव फुलेंनी सर्व ब्राम्हण सोडून सर्व समाजाला ब्राम्हणेतर म्हणून संघटित केले आणि सत्यशोधक समाज निर्माण केला. देशातील पहिली असंघटीत बांधकाम व गिरणी कामगार संघटना बांधली. त्यांना कामगार म्हणून मान्यता मिळवून रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडेसारखा तडफदार वैचारिक संघर्ष करणारा नेता दिला. 


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक समाजाला प्रबुद्ध मानव बनविले आणि सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिवर्तन घडवून राजकीय परिवर्तन घडविण्याची ताकद मागासवर्गीय समाजात निर्माण केली. म्हणूनच देशभरात मागासवर्गीय समाजाचे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत ते राष्ट्रपतीपर्यंत निवडून जातात. स्वार्थीपणा व अहंकार ज्यांच्या डोक्यात भिनविला जातो. तो वैचारिक गुलाम बनतो. रामनाथ कोविंद किंवा नरेंद्र मोदींसारखा.


मान्यवर कांशीराम यांनी उत्तर भारतात मागासवर्गीय समाजात जनजागृती करून बहुजन समाजाला जागे केले म्हणून ही घोषणा बहुजन समाजाच्या घराघरात दिली जाते ‘कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई’  कांशीराम यांचा जन्म १५ मार्च १९३४ ला झाला.(मृत्यू ९ ऑक्टोंबर २००६) ते भारतीय राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील विशेष तज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतीय वर्णव्यवस्था मोडून काढण्यासाठी सर्व मागासवर्गीय समाजात प्रचंड प्रबोधन करून जनजागृती केली. न बिकनेवाला समाज निर्माण केला. 


बहुजन समाज ही ओळख देशात निर्माण केली. राजकीय परिवर्तन केले. डीएसफोरमुळे उतर भारतात मागासवर्गीय समाजाची ओळख बहुजन समाज झाली. १९७१ ला त्यांनी अखिल भारतीय पिछडा और अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघची स्थापना केली. आरक्षण प्रमोशनच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे उत्तरप्रदेश हे पहिले राज्य आहे. 


सत्ता आल्यावर सर्व समस्या सुटतात त्यामुळे संघटना, युनियनची गरज काय असे म्हणणारे कामगार, कर्मचारी अधिकारी आज कोणत्या समस्यांना तोंड देतात? राजकीय पक्ष निर्माण केला पण ट्रेड युनियन कामगार संघटनेकडे पूर्ण दुर्लक्ष केले. मात्र गोरगरीब मागासवर्गीय समाजात बहुजन समाजात प्रबोधन केले. म्हणून ‘कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई’असे म्हटले जाते.


१४ एप्रिल १९८४ बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. सर्व समस्यांची गुरुकिल्ली ही सत्ता असते सत्ता सर्व कुलुपाची चावी असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर ते मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ १९३२ ते १९८२ प्रबोधन करून संघर्ष करीत संघटित झाली, म्हणूनच २००७ ला उतर प्रदेशात बहुजन समाज पार्टी पूर्ण बहुमताने निवडून आली होती आणि देशात एक नवा प्रेरणादायी इतिहास लिहला गेला होता. जी बसपा देशातील बहुजन समाजाला सांगत होती, ‘बाबा तेरा मिशन अधुरा बीएसपी करेगी पुरा !. ती बसपा अनेक राज्यात विकलांग झाली आहे. मागासवर्गीय बहुजन समाजातील सुशिक्षित लोक व असंघटित लोक पक्ष संघटनापासून दूर जात आहेत. 


कांशीरामजी यांची संघटना बांधनीची पध्दत बाजूला पडली चमकेगिरी,चमचेगिरी करणार्‍या लोकांनी बसपाचे उद्दीष्ट बाजूला केल्यामुळेच भारतातही तिसर्‍या नंबरचा राष्ट्रीय पक्ष काही राज्यापुरता राहिला आहे. कांशीरामजीच्या तालमीत तयार झालेले अनेक केडर, कार्यकर्ते नेते झाले होते. ते आता बाहेर पडून स्वतःच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. बहुजन हिताय न राहता सर्वजन हिताय झाली. त्यामुळे ज्या ब्राम्हणवादाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष सुरु केला होता तो संघर्ष कांशीराम यांनी सुरू ठेवला होता. परंतु मायावतींती तो धुळीस मिळवला. 


मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला. सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात त्याचा वापर समाजाला तोडणारे हत्यार म्हणून कसा सारखा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला. त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, संयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करणे म्हणजेच कांशीरामजीच्या शब्दात चमचा. चमचा हा घराघरात वापरले जाणारे हत्यार आहे. जे स्वत: कोणतेही काम करू शकत नाही. पुणे करारानंतर राजकारण्यांनी असेच चमचे मागासवर्गीय समाजात अल्पसंख्याक, पीडित, शोषित, आदिवासी समाजात निर्माण केले. चमचाचा वापर नेहमी आपल्या फायद्यासाठीच होतो. त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत: करीत नाही कोणाच्या सांगण्यावरून करतो. 


कांशीराम यांच्या बसपाची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापरले जाते हे दिसून येते. मायावतींनी स्वत:चे पुतळे उभे करण्यापेक्षा बहुजन समाजातील मुलामुलींच्या शिक्षणावर भर दिला असता तर आजचे चित्र वेगळे असते. केवळ अनेक विद्यालयाला, महाविद्यालयाला महापुरुषांची नावे देऊन वैचरिक समाज क्रांती होत नाही. 


जिल्ह्याचे नाव सर्व महापुरुष संत महामाताच्या नावे केले. त्यामुळे मागासवर्गीय समाजात विशेष र्चकार समाजात काय बदल झाला?  गरीब छोडो, श्रीमंत जोडो हे स्विकारल्या मुळे, जाती तोडो समाज जोडो कही हम भूल न जाये महापुरुषोका मार्ग हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतींनी सत्तास्पर्धेत मातीमोल करून ठेवले. त्यामुळे चमचा युग काय करू शकते २०१२-२०१४ च्या निवडणुकीने दाखवून दिले.  मायावतींनी स्वतःला कितीही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतले तरी त्यांची कुवत एखाद्या राज्यातील आठदहा जिल्ह्यापुरती आहे.


‘मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया’ असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते. पण त्याच ‘पढे लिखे’ लोकांना संघटीत करून बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून पैसा व बुध्दी प्रशासकीय अनुभव समाजास मिळवून दिला. त्यांनी डीएस ४ समिती द्वारे समाजात जनजागृती केली होती. त्याची सुरुवात ही सायकलवरून झाली. पुण्याला असताना त्याची एक दिवस इराणी हॉटेल समोर ठेवलेली सायकल चोरी गेली. त्यामुळे खूप कोध्रीत झाले. त्यांनी हॉटेल मालकावर खूप राग काढला तेव्हा मालकाने आपले लोक कामाला लावले. सायकलचा शोध लावला ती मिळवली, तेव्हा ते खूप खुश झाले. कार्यकर्त्याना सांगितले सायकल ही माझ्यासाठी एकमात्र साधन आहे. ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्वाचे साधन आहे. यावरच त्यांनी भारतभर सायकल यात्रा काढली. 


कांशीराम यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली. देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक, राजकीय नेत्याने असे धाडस केलेले नाही. कांशीरामजी यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई.व्ही. रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे १७ सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारीवरून सुरवात केली. दुसरी कोहिमा,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदरवरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रॅलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली. 


कांशीरामजींनी दिवसरात्र मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमच्या लोकांच्या सल्ल्याने देश भरातील केडर बेस कार्यकर्ते संपविले. कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला होता त्याला काही प्रमाणात तडा गेला आहे. मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातून बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते. तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हितासाठी उभे केले जाते. 


चमचा आपल्या समाजातील सच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समाजातील सच्च्या नेत्याला मजबूत बनवितो. कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे. त्यामुळे ‘कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई’ या घोषणाचा असर आज कमी झालेला वाटत असला तरी हाच मागासवर्गीय समाज देशभरातील विविध क्षेत्रात सत्तेत भागीदार झालेला आहे. त्याला पुन्हा बहुजन समाज पक्षात आणणे ही काळाची गरज आहे. 


मागासवर्गीय बहुजन समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व ही मान्यवर कांशीराम यांची ‘जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागेदारी’ ही  रचनाच करू शकते,  पण बहुजन हिताय बहुजन सुखाय विचारधारा स्विकारली तर!. सर्वजण हिताय म्हटले तर ब्राम्हणवादी बहुजनांचे डोके ठिकाण्यावर ठेवणार नाहीत. हे लक्षात घेऊन पुन्हा म्हणावे लागेल कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई! मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यासाठी येणारा काळ खूप वेदनादायक असेल त्यासाठी आताच सावध होणे शहाणपणाचे ठरेल. मान्यवर कांशीराम यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना कोटी कोटी प्रणाम.


सागर तायडे

9920403859 PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटशी संबधित याचिका फेटाळली
लोकसभा निकालाच्या तोंडावर पेट्रोल-डिझेल दरवाढीची चिन्ह
ईव्हीएम छेडछाडीची चिंता लागल्याचा प्रणव मुखर्जींचा खोट
बोधगया मुक्तीसाठी काऊंटर प्लॅनिंग बनवायला हवे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper