×

रिलायन्सशी जोडलेल्या ए हक एनएल कंपनीने केले अरबो रूपयांचे मनी लॉन्ड्रींग

Published On :    8 Apr 2019  By : MN Staff
शेयर करा:


डच अधिकार्‍यांचा आरोप, तीन माजी अधिकार्‍यांना अटक





नवी दिल्ली : रिलायन्सशी जोडलेल्या ए हक एनएल कंपनीने २००६-०८ या कालावधीत गॅस पाइपलाईनच्या सामुग्रीची वाढीव किंमत दाखवून त्याबदल्यात ११० कोटी सिंगापूरस्थित बायोमेट्रिक्स लिमीटेड कंपनीच्या खात्यावर फिरवले. त्यामुळे या कंपनीने अरबो रूपयांचे मनी लॉन्ड्रींग केल्याचा आरोप नेदरलँडमधील डच अधिकार्‍यांनी केला आहे. 


ए हक एनएल कंपनी रिलायन्स गॅस टान्सपोर्टेशननुसार काम करत आहे. सिंगापूरमधील बायोमेट्रिक्स कंपनीही रिलायन्सशी जोडलेली आहे. रिलायन्स गॅस ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेडचे नाव बदलण्यात आले असून ईस्ट वेस्ट पाईपलाईन लिमीटेड असे करण्यात आले आहे. ही एक खाजगी कंपनी आहे. मनी लॉन्ड्रींग विषयी नेदरलँडमधील गुप्तचर एजन्सीकडून चौकशी केली जात आहे. 


गुप्तचर एजन्सीने याप्रकरणी ए हक एनएलच्या तीन माजी अधिकार्‍यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयातही हजर करण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमीटेड आणि ईडल्ब्यूपीएलने या आरोपांचा इन्कार केला आहे. ए हक एनएलने एकूण १० मिलीयन डॉलर रक्कम प्राप्त केल्याचे एका डच वकीलाने स्पष्ट केले. 


सिंगापूरला पाठवण्यात आलेली रक्कम चार वीमा कंपनीच्या मार्फत पाठवली गेली. त्यासाठी खोटा विमा काढण्यात आला होता. या सर्व प्रकरणात  सिंगापूरस्थित बायोमेट्रिक्स कंपनीचे मालक जेम्स वालफेंजो सहभागी आहेत. वालफेंजो नेदरलँडचे रहिवाशी आहेत. जेम्स वालफेंजो यांचे नाव याअगोदर २००५ मध्ये स्विस लिकमध्ये रिलायन्स समुहाशी जोडले गेले होते.  


रिलायन्स इंडस्ट्रिज लिमीटेडचा कॉर्पोेरेट स्ट्रक्चर जेम्स वालफेंजोने बनवले होते. पॅराडाईज पेपर लिकच्या प्रकरणातही वालफेंजोचे नाव समोर आले होते. गॅस पाईपलाईचे दर वाढवून रिलायन्स आपल्या ग्राहकांकडून सेवेच्या बदल्यात जास्त किंमत वसूल करू शकते. त्यामुळे भारतीयांना त्याचे नुकसान सोसावे लागणार आहे. गॅसची उत्पादन किंमत भारतीयांना चुकवावी लागणार आहे. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शिवसेना, भाजपला मत म्हणजे देशातील हुकूमशाहीला मत
प्रज्ञा सिंहच्या शहीद करकरेंवरील वक्तव्याने पोलीस वर्त
अपयशी लोकप्रतिनिधींमुळेच कोकण पर्यटनात मागे
ब्राम्हणी आतंकवादाचा बेसूर चेहरा
प्रधानमंत्री मोदींना आताच मागास असल्याची जाणीव कशी झाल
जेटनंतर आता एअर इंडियाही संकटात?
दाभोळकरांचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही उमेदवारी
भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नाही
राज्यातील २७ तंत्रनिकेतन संस्थांना टाळे लागण्याची शक्य
सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचा आरोप
साध्वी प्रज्ञा सिंहला निवडणूकबंदी करा!
भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांना बूट फेकून
पतीने एनडीएला मत न दिल्यास त्याला उपाशी ठेवा
या मतदारसंघात ९० टक्के केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाह
जेट एअरवेज बंद पडण्यामागे षड्यंत्र, असोसिएशनचा आरोप
विमानचालन उद्योगाला बुरे दिन, ५ वर्षांत ७ विमान कंपन्यां
प्रसार माध्यम स्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारत १४० व्या
२५ टक्के व्हीव्हीपॅटची तपासणी करून कागजी मतपत्राची मोज
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रनिर्मितीत मोठे योगदान
करकरेंना दहशतवाद्यांनी मारल्याने सुतक झाले दूर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper