×

जयंतीतदिनी महापुरूषांच्या कार्याची समीक्षा व्हायला हवी

Published On :    14 Apr 2019  By : MN Staff
शेयर करा:


भारताचा प्राचीन इतिहास हा दुसरे तिसरे काही नसून बौध्दधम्म आणि ब्राम्हणशाही मधील जीवघेण्या संघर्षाचा इतिहास आहे, असे बाबासाहेब का म्हणतात याचा विचार आज सर्वानी करण्याची वेळ आली आहे.

आम्ही महापुरुषांचे जयंतीदिन, स्मृतीदिन का साजरा करतो यावर विचार व्हावयास हवा. लोकांपासून समाज बनतो. समाजाला सतत मार्गदर्शनाची गरज असते. महापुरुषांचा आदर्श आणि त्यांचे तत्वज्ञान हे समाज कोणत्या पातळीवर आहे, याचे मोजमाप करण्याचे एक परिमाण आहे. महापुरूषांच्या जयंतीदिनी आम्ही त्यांचा वर्तमान काळातील परिस्थिती तपासून बघण्यासाठी उपयोग करीत असतो, जेणेकरून परिवर्तनाच्या मार्गावर समाज किती अग्रेसर झाला याची समीक्षा व्हावी असा सर्वसाधारण दृष्टीकोन असतो.


आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती सर्व जगभर मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. मुळात भारतीय मुळनिवासी लोकांची परंपरा ही उत्सवप्रिय आहे. त्यामुळे उत्सवाचे निरनिराळे प्रकार आजमावून समाजातला प्रत्येक घटक हा आपल्या पध्दतीने जयंती साजरी करीत असतो. कुठे व्याख्यानमाला असते, कुठे मनोरंजनात्मक कार्यक्रम चालतात, कुठे सुशोभित महारैली काढण्यात येते, कुठे प्रभातफेरी काढून विहारात विसर्जित होते. असे विविध प्रकार आपणास जयंतीदिनी बघायला मिळतात. 


या १४ रोजी आम्ही काय विचार करावयास हवा याबाबत प्रकर्षनाने जाणीव होत आहे, कारण प्रतिक्रांतीवाद्याच्या हुकूमशाहीला सर्व बहुजन समाज हा पाच वर्षाच्या काळातच होरपळून निघत आहे. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी इथल्या ब्राम्हणशाहीला गाडण्याचे तंत्र विकसित करून आपल्या सर्वाच्या स्वाधीन केले होते. ते आज प्रतिक्रांतीवाद्याच्या तावडीत सापडले आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती जर आपण समजून घेतली नाही तर बाबासाहेबांचा एकूण संघर्षच आपणास समजणार नाही. 


भारताचा प्राचीन इतिहास हा दुसरे तिसरे काही नसून बौध्दधम्म आणि ब्राम्हणशाही मधील जीवघेण्या संघर्षाचा इतिहास आहे, असे बाबासाहेब का म्हणतात याचा विचार आज सर्वानी करण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय या तत्वाचा जयघोष करण्यारी मंडळी नेमकी इथेच चुकते. ते प्रतिक्रांतीला कमी लेखतात किंवा त्याचा अनुल्लेख करतात. 


बाबासाहेब आपल्या बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील अप्रकाशित प्रस्तावनेतच म्हणतात की बौध्द धम्म चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी इतर दोन ग्रंथाचे अध्ययन करून गंभीरतेने समजून घेतल्याशिवाय बुध्दांची क्रांती समजणार नाही. काय होते ते दोन ग्रंथ. एक होता बुध्द की मार्क्स आणि दुसरा प्राचीन भारतातली क्रांती आणि प्रतिक्रांती. 


बाबासाहेबांच्या काळातच मार्क्सवादाचे वारे जगात वाहत होते. त्यामुळे बौध्द धम्मीय लोकांमध्ये वैचारीक गोंधळ माजविण्याचा ब्राम्हणशाही नक्कीच प्रयत्न करतील, असा बाबासाहेबांचा कयास होता. त्यामुळे मार्क्सवादाच्या कच्छपी समाज लागू नये म्हणून त्यांनी मार्क्सवादाला शार्टकट म्हटले तर बुध्दाच्या मार्गाला लांबचा. पण मानवाला निश्चितपणे सुखी, दुखमुक्त करणारा मार्ग म्हटले आहे. तरी आमची काही मंडळी मार्क्सवादाच्या नादी लागून वेळ, श्रम आणि बुध्दा वाया घालवत बसले आहे. असो.


भारतातील सद्यपरिस्थितीचा विचार केला तर आपण एका प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर पोहोचलो असून आता प्रतिक्रांतीचे वादळ आपल्यावर घोंगावत आहे. ब्राम्हणशाही आणि लोकशाही एकत्र नांदू शकत नाही, असे बाबासाहेबांनी का म्हटले याचा विचार करावा लागेल. भारताची पहिली सार्वत्रिक निवडणुक जेव्हा झाली तेव्हा भारताच्या तथाकथित समाजवादी प्रधानमंत्र्याने अल्पसंख्य ब्राम्हणांचे (३.५%) लांगुलचालन करत त्यांना (६०%) तिकिटे देऊन भारतात ब्राम्हणराज स्थापन केले. 


इतिहासात ज्या प्रकारे पुष्यमित्राने बृहद्रथची हत्या करून दहा मौर्य राज्याच्या साम्राज्याला संपविले होते आणि आपली वैदिक व्यवस्था मनुस्मृती लिहून कायम केली होती अगदी तसाच प्रकार आधुनिक भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंडीत नेहरूनी केला होता. त्यासाठी आम्ही पंडीत जवाहरलाल नेहरूला आधुनिक भारताचा पुष्यमित्र शुंग म्हणतो. हा सर्व प्रकार बाबासाहेबांच्या समोर घडत असतांना त्यांनी ब्राम्हणशाही आणि लोकशाही एकत्र नांदू शकत नाही असे म्हटले आहे. 


दि. १९ मार्च १९५५ ला राज्यसभेत आपल्या संविधान जाळून टाकण्याच्या व्यक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते सर्वानी वाचून गंभीरतेने समजवून घेणे अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेब म्हणतात की आम्ही महत्प्रयासाने लोकशाहीचे मंदीर बांधले आहे, तिथे देवाचा प्रवेश व्हावा असे आम्हाला अपेक्षित होते पण प्रत्यक्षात तिथे असुरांनी कब्जा केला आहे. त्यामुळे मी संविधान जाळून टाकण्याचे व्यक्तव्य केले आहे. पांरपारीक आंबेडकरवादी या विषयावर बोलण्याचे टाळतात. कारण त्यांनी बाबासाहेबांचे विचार वाचलेच नाही किंवा वाचलेच तर त्याचा प्रचार प्रसार केला नाही.


दुसरा विषय बाबासाहेबांच्या स्वातंत्र्योत्तर काळातला लढा आणि स्वातंत्र्यपुर्व संघर्ष याचा बारकाईने अभ्यास केला तर त्यामधले वेगळे पण प्रकर्षानाने दिसून येतो. कोणतेही आदर्श आंदोलन कसे असावे याचा परिपाठच आम्हाला महाडचा मुक्तीसंग्राम आणि काळाराम मंदिर सत्याग्रहातून दिसून येतो. अत्यंंत अभ्यासपुर्ण आणि प्रचंड बौध्दीक क्षमतेने हाताळलेल्या गोलमेज परिषदेतून मिळालेल्या अधिकारातून अस्पृश्यांच्या तसेच तमाम भारतीयांच्या अपेक्षा व्यक्त करताना बाबासाहेब दिसून येतात. एखादा मुत्सद्दी राष्ट्रप्रेमी कसा असावा याचा आदर्शच बाबासाहेबांनी जगाला दाखवुन दिला आहे.


यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे तत्कालीन कॉग्रेसमधली विद्वान ब्राम्हणी मंडळी विदेशी असलेल्या इंग्रजांना आपल्या विदेशी वंशाचा दाखला देऊन सत्ताप्राप्तीसाठी धडपडत होती. हा ब्राम्हणी कावा बाबासाहेबांनी ओळखला होता. तेव्हा त्यांनी ‘शुद्र पूर्वी कोण होते’ हा ग्रंथ लिहून आर्य आणि शुद्र एकाच वंशाचे असून ते वेगवेगळे नाहीत असा तर्क देऊन ब्राम्हणांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले होते. आज त्याच ग्रंथातील तर्क ब्राम्हण आणि त्यांचे पाय चाटण्यात धन्यता मानणारे तथाकथित मुर्ख ब्राम्हणेतर लोक ब्राम्हण हे मुळनिवासी आहेत असा अपप्रचार करतांना दिसतात. यांचा दांभिकपणा उघड पाडण्यासाठी एक उदाहरण देणे आवश्यक वाटते. 


एका मौलवीने आपल्या शिष्यांना एक वाक्य सांगितले की नमाज पढना व्यर्थ है. शिष्य सगळीकडे प्रचार करत फिरू लागले नमाज पढना व्यर्थ आहे. जेव्हा हे शिष्य वयस्कर आणि समजदार व्यक्तीकडे आले आणि याचा खुलासा मागू लागले. त्यांनी मौलवीला बोलावून घेतले आणि ते वाक्य कुठून घेतले यावर विचारणा केली तेव्हा मौलवीने ते वाक्य त्यांना दाखविले. ते वाक्य असे होते ‘गर हो नापाक तो नमाज पढना गैर है.’ अर्थात जर मनात पाप ठेऊन तुम्ही नमाज पडत असाल ते व्यर्थ असते. तर असा प्रकार आमच्या तथाकथित आंबेडकरवादी मौलवीचा झाला आहे.


गोलमेज परिषदेमधून प्राप्त झालेला अधिकारापैकी सर्वात महत्वाचा अधिकार म्हणजे प्रतिनिधीत्वाचा होता. स्वतंत्र मतदारसंघ आणि दुहेरी मताधिकार हा अस्पृश्याची राजकीय संजीवनी होती असे बाबासाहेब म्हणतात. पुणे कराराने स्वतंत्र मतदारसंघ जाऊन संयुक्त मतदार संघ अस्तित्वात आला. इथे एक गोष्ट नमुद करावीशी वाटते. ती म्हणजे प्रतिनिधीत्वासाठी संख्या महत्वाची नसते. स्वतंत्र मतदार संघात अस्पृश्यांना एकूण ७८ जागा मिळणार होत्या तर संयुक्त मतदार संघात १४९. जास्त जागा मिळणे म्हणजे जास्त अधिकार मिळणे असा त्याचा अर्थ होत नाही, हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले आहे. 


आज आमच्या इतक्या जागा निवडून आल्या किंवा तुम्ही एकही जागा निवडून आणु शकत नाही असा जो अपप्रचार केल्या जातो तो अनाठायी आहे. रियल रिप्रेझेटेटिव्ह म्हणजेच खरा प्रतिनिधी संसदेत निवडून जाऊ नये म्हणून प्रतिपक्ष किती काळजी घेतात, हे आम्हाला अद्याप उमजले नाही. राजकारणात अंधभक्ती केल्याने ते सहजासहजी समजून पण येणार नाही. त्याच बरोबर बाबासाहेबांचा ब्रॉडबेस्ड सर्वसमावेशक नाही तर जास्तीत जास्त लोकांना सामावून घेणारी राजनीती पांरपारीक आंबेडकरवाद्यांनी समजावून घेतली नाही, हे दुखाने नमुद करावे वाटते.


दि. १५.१० १९५६ ला श्याम हॉटेलवर आपल्या सहकार्यांना दिलेला शेवटचा राजकीय संदेश सहकार्यांनी समजूनच घेतला नाही किंवा त्यांनी तसा प्रयत्नही केला नाही. परिणामी ते एका संकुचित राजकारणाचे बळी पडलेत. ज्याची कोंडी फोडायला तब्बल २५ वर्षाचा काळ लागला. काय संदेश दिला होता बाबासाहेबांनी हे त्यांच्याच शब्दात वाचलेला बरा !


राखीव जागा नकोत म्हणुन फेडरेशनने जो ठराव केला आहे त्या ठरावास मी चिकटून राहू इच्छितो. त्या ठरावापासुन ढळण्याची माझी इच्छा नाही. राखीव जागा दहा वर्षासाठी आहेत. त्या जागा आता राहणार नाही. आपल्या समाजाचे ऐक्य ही कोणत्याही गोष्टीपेंक्षा अधिक महत्वाची गोष्ट आहे. या राखीव जागा गौण आहेत. आपल्या आजपर्यंतच्या फेडरेशनच्या चळवळीने स्वाभिमान अवश्य निर्माण केला आहे. ही गोष्ट फेडरेशनला भूषणावह आहे. त्यामुळे संघटना झाली. तथापि त्यामुळे एक प्रकारची तटबंदीही निर्माण झाली. 


दुसरे लोक आम्हाला मत देत नाही व आपण लोक त्यांना मत देत नाही. ही एक प्रकारची तटबंदीच होय. दुर्दैवाने आपली लोकसंख्या कमी आहे. आपण केवळ अल्पसंख्याक आहोत. अश्या परिस्थितीत फेडरेशन आहे त्या स्थितीत ठेवणे कठीण आहे. यासाठी आपण इतर समाजातील आमचे दुःख जाणणारे कोण आहेत, हे पाहिले पाहिजे. अशा सर्वाना आपण एकत्रित करून त्यांच्यासह जाण्याची आपली सिध्दता पाहीजे. 


अशा लोकांना एकत्रित करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तो प्रयत्न यशस्वी झाल्यास आपल्याला नविन पक्ष स्थापन करावा लागेल व त्या पक्षात येण्याची इतरांनाही दार मोकळे राहील. तुमच्यातच नव्हे तर या देशात एक विचित्र विकृती दिसुन येते ती ही की आज झाड लावले की त्यास दुसर्‍या दिवशी फळ खावयास आले पाहीजे असे लोकांना वाटते. राजकारणात अशी अपेक्षा धरणे चुक आहे.


मी भंडार्‍यातील निवडणुकीमध्ये पडलो त्याचे मला कधी वाईट वाटले नाही. तरी त्या निवडणुकीत मला बरीच मते पडली. आपली मते सोडली तर इतर समाजाने देखील मला मते दिलेली आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी समाधानाची आहे. मी पडलो की निवडुन आलो हा प्रश्‍न मी विचारात घेत नाही. तुम्हीही अशाचप्रकारे कर्तबगार होण्याचा प्रयत्न करून, इतर समाजाने देखील तुम्हाला मते द्यावीत असे वाटले पाहीजे. माझी खात्री आहे की या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमचे राजकीय कार्यक्रम चालवाल. यापेक्षा आता अधिक काही मी सांगत नाही.


आज पुणे कराराचा सन्मान करणार्‍या तथाकथित विद्वानांनी आणि राजकीय पक्षाला तात्पुरता जुजबी कामचलाऊ बहुजनवाद वापरणार्‍या नेत्यांनी यावर जरूर विचार करावा. पुणे कराराचा धिक्कार केल्याने बाबासाहेबांचा अपमान होतो अशी वल्गना करणार्‍या लोकांनी खोटी आवई उठवून समाजाचे नुकसान होत आहे, याचा विचार करावा.


बहुजन वादानेच या देशाची सत्ता काबीज केल्या जावू शकते याचे सुतोवाच बाबासाहेबांनी लखनऊला १९४८ ला केले होते. त्यानुसार सच्चा आंबेडकरवाद्यानी बहुजनवादाची स्थापना या देशात करून तिला देशातली तिसर्‍या क्रमांकाची शक्ती बनविली होती. पण सक्षम नेतृत्व गेल्यावर तिची वाताहत होते. रिपब्लिकन चळवळीच्या वाताहतीतून तेच दिसून येते. आता बहुजन वादाला पण सर्वजन वादाचे ग्रहण लागलेले आपण बघतो आहे. 


हे राजकीय प्रदुषण दुर करण्यास परत एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. कारण जग परिवर्तनीय आहे. राजकीय प्रवाह जिथे थांबला तिथूनच दुसरा नवप्रवाह आपली दिशा निश्चित करून वेगळ्या मार्गाने प्रवाहीत होत असतो. त्याला कुणी रोखू शकत नाही. रोखण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो दुप्पट जोमाने प्रवाहीत होत असतो. राजकीय सत्ता मिळो अथवा न मिळो सामाजीक आंदोलन सुरूच असले पाहीजे. राजकीय वाद हे पावसाच्या दवबिंदूसारखे असतात. सामाजीक चळवळ गतिमान झाल्यावर हे दवबिंदू विरघळून जात असतात.


आज राजकीय पक्षाचा इव्हिएमच्या आधुनिक ब्रम्हास्त्राने उघडउघड शिरच्छेद केला जात आहे. जाहीरपणे संविधान जाळल्या जात आहे. संविधानात नसलेले आर्थिक निकषावरील आरक्षण सवर्णाना दिल्या जात आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीसाठी असलेले आरक्षण शुन्यवत केल्या जात आहे. आरक्षणावरून जातीजातीत भांडणे लावण्याचा प्रकार होत आहे. 


मुस्लिम, शिख ख्रिश्चन, बौध्द, लिंगायत या धार्मिक अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांच्या दहशतीत ठेवण्यासाठी मॉबलिंचिंग, बॉम्बस्फोट आणि दंगली घडवून आणल्या दात आहे. आरोपीना शिक्षा न होता सही सलामत सोडून देण्यात येत आहे. उच्चशिक्षणातून बहुजनांची मुले खारीज करण्यात येत आहे. विद्यापीठे द्रोणाचार्य चालवित आहेत. तरूण बेरोजगारीमुळे निराश झालेला आहे. शेतकरी, कामगार देशोधडीला लागून आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. एकंदरीत प्रतिक्रांती नंतर उद्भवलेल्या वैदिक अत्याचाराची मालिका परत सुरू झालेली आहे.


या सर्व अन्यायकारी प्रतिक्रांतीचा बिमोड करण्यासाठी सर्वानी आपापसातले मतभेद विसरून एकत्र येवून जनशक्तीचा रेटा उभा करावा लागेल. अल्पसंख्य ब्राम्हणांकडे जनशक्ती नसल्याने ते कपट आणि षडयंत्राचा आणि बहुजनातल्या दलाल चमच्यांची मदत घेत असतात. आमची अर्धी शक्ती यांची कपट कारस्थाने उघड करण्यात खर्ची पडत असते. 


मीडिया बनियांचा असून त्यांनी ब्राम्हणांशी युती केली आहे. त्यामुळे ब्राम्हणांच्या कपट कारस्थानाला प्रसिध्दी मिळत नाही. हे जरी मान्य केले तरी ग्राऊंड लेव्हलला जाऊन पुर्णवेळ काम करणारी जी राष्ट्रव्यापी संघटना आहे त्याला विरोध न करता साथ सहयोग दिला गेला पाहीजे. सर्व समदुखी जातीना जोडण्यावर भर देवून स्वातंत्र्य, समता, बंधूता या तत्वाना प्रत्यक्षात आचरणात आणून एक मोठे व्यापक जनादोलन उभे होईल अशी अपेक्षा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती दिनी व्यक्त करतो.


प्रशांत थुल

मो.७८७५७७६०३९PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शिक्षणाचा ‘विनोद’ आणि बालभारतीची ‘बालबुध्दी’
चार वर्षांत राज्यभरात १२ हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या
रॅगिंगविरोधी कायदा अधिक कडक करणार
आरएसएस आणि मोहन भागवत दहशतवादी
गेल्या १२ वर्षात प्रथमच मान्सूनची धीम्या गतीने वाटचाल!
जेटकडे अडकले प्रवाशांचे ३ हजार २०० कोटी
मुंबई लोकलमधली गर्दी ‘जीवघेणी’
न्यायव्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप नको
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलास अटक
यूट्यूबची साफ-सफाई मोहीम... ९० लाख व्हिडिओ हटवले
पाच वर्षात कुपोषणाने महाराष्ट्रात सर्वात जास्त बालकांच
शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला
स्विस बँकेने ५० भारतीय खातेदारांना बजावली नोटीस
देशभरात डॉक्टरांचा संप सुरुच, रुग्णांचे हाल कायम
राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा अहवाल पुढील आठवड्यात?
मंत्र्यांसमोरच शेतकर्‍याने घेतला विषाचा घोट
१३ टक्के व्याज आकारून शेतकर्‍यांची लुटमार
तापाचा कहर! बिहारमध्ये १०० बालकांचा मृत्यू
ओबीसी, अनुसूचित जाती, जमातींना औटघटकेचे मंत्रिपद देत विध
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर विरोधकांना संशय
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper