×

जयजयकार करण्यापेक्षा बाबासाहेबांचे अपूर्ण काम पूर्ण करा

Published On :    14 Apr 2019  By : MN Staff
शेयर करा:


माझी जयंती साजरी करू नका तर मी आणलेला विकासाचा रथ पुढे नेता आला तर न्या परंतु तो मागे ओढू नका असे बाबासाहेब म्हणाले होते. परंतु आम्ही जयंती साजरी करण्यातच धन्यता मानत आहोत.





डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजाचे उध्दारक आहेत. बहुजन म्हणजे एससी, एस टी, ओबीसी, धर्मपरिवर्तीत अल्पसंख्याक या जातींचा समूह. आजपर्यंत अनेक लोकांनी विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुस्तक, साहित्य, शाहिरी, गायनाच्या माध्यमातून  गौरव केला आहे. जगाच्या पाठीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच एक नाव आहे ज्या नावाने साहित्य, संगीत व प्रबोधन क्षेत्रामध्ये लोकांनी आपली आर्थिक परिस्थिती भक्कम करून घेतली. 


सर्वाधिक साहित्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर करून एक विश्‍वविक्रम केला आहे. सर्वात जास्त गाणे, व्याख्याने ,साहित्य फक्त आणि फक्त एकाच माणसाच्या नावावर आहेत ते म्हणजे विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.  एवढे सर्व असूनही डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजामध्ये पेरले गेले नाहीत. लोकांनी त्यांचा स्विकारच केला नाही हे वास्तव नाकारणे म्हणजे डोळे असून आंधळ्याखसारखे वागणे होय. 


माझी जयंती साजरी करू नका तर मी आणलेला विकासाचा रथ पुढे नेता आला तर न्या परंतु तो मागे ओढू नका असे बाबासाहेब म्हणाले होते. परंतु आम्ही जयंती साजरी करण्यातच धन्यता मानत आहोत. ती जयंती केवळ बौध्द जाती समूहाच्या मर्यादेपर्यंत. येथेच महापुरूषांच्या विरोधात काम सुरू आहे. बौध्द बांधव जयंती साजरी करताना मिरवणूक काढतात, बँड, डीजे लावून नाचतात. यातून साध्य काहीच होत नाही. कारण जयंती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आणि आमची मुलं ‘मुन्नी बदनाम हुई, एक नंबर दिसतेस साडीवर, अशा अश्‍लील गाण्यावर ताल धरतात. 


बहुजन समाजातीलच इतर जातींना उद्देशून घोषणाबाजी केली जाते तेव्हा मात्र माझ्या सारख्या युवकांच्या मनात सल निर्माण होते. प्रचंड राग येतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीच त्यांचे विचार पायदळी तुडविले जातात. स्वतःला सभ्य, वैचारिक आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी समजणारे लोक फक्त बघ्याची भुमिका घेतात. कारण सामाजिकदृष्टीने त्यांच्यावर बंधने असतात. 


जयंतीदिनी भारताच्या संविधानाने दिलेले हक्क व अधिकारांची जाणीव देणे गरजेचे आहे. ओबीसी अधिकार वंचित होते, त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिले, हे प्रत्येक मिरवणुकीमध्ये मिरवले असते तर सर्वांनी वाचले असते. विचार विनिमय केला असता व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्विकार प्रत्येकाने केला असता. परंतु शोकांतिका हीच आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना आम्ही त्यांना एका जातीत बंद करतो. चुकीच्या पध्दतीने बाबासाहेब लोकांसमोर मांडतोय म्हणून आजही एससी, एसटी, ओबीसी समाजात पाहिजे तसे ते पोहचले नाहीत.


बाबासाहेब हे समाजामध्ये पोहचवायचे तर त्यांचे देशहिताचे विचार मांडले गेले पाहिजेत. आंबेडकरी चळवळ ही मनोरंजनावर चालत नाही अथवा मनोरंजनासाठी आंबेडकरी चळवळ नाही. चळवळ ही विचारधारा व सिध्दांत यावर आधारित आहे व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आहे. हे आपल्याकडून बिंबवले गेले पाहिजे. जयंतीदिनी विचारधारा बाजूला सारून आम्ही बाबासाहेबांना अपेक्षित असे नव्हे तर आम्हाला चांगले वाटेल असे वागतो. 


बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी जिवाची बाजी लावा. आम्ही जयंतीतीला नरडा फाटेपर्यंत ‘बाबासाहेब की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ म्हणून दारूच्या नशेत डीजेच्या तालावर नाचायचे आणि पंधरा एप्रिलपासून पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराविरोधात काम करायला तयार. आम्ही प्रत्येक दिवस त्यांच्या विचाराविरोधात वागत आहोत मग कसा जय होईल? याचा विचार करायला हवा. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराविरोधात काम करणार्‍या लोकांकडून जयंतीच्या नावावर पैसे जमा करायचे आणि जयंती झाली की तो सांगेल तसे त्याच्या इशार्‍यावर वागायाचे हे कोणत्या विचारात बसते? झोपडीतून आम्ही बंगल्यात गेलो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे लाखो रूपयांचा पगार कमावतो. परंतु आपण समाजाचे देणेकरी लागतो या भावनेतून काम करत नाही. 


आपल्या उत्पन्नापैकी कितीजण ५ टक्के समाजासाठी खर्च करतात यावर विचार करायला हवा. किमान लाख रूपये खर्च करून जयंती साजरी केली जाते. त्याच लाख रूपयांत स्पर्धा परिक्षा पुस्तके आणून गावातच वाचनालये तयार केले तर अधिकारी, कर्मचारी आपले लोक होणार नाहीत का? दरवर्षी समाजाचा पैसा नाचण्यात घालवण्यापेक्षा वाचण्यासाठी घालवला तर त्याचा फायदा होणार नाही का?  मिरवणुकीमध्ये डिजे न लावता तोच पैसा चळवळीच्या दैनिकाला दिला तर ते दैनिक वाढणार नाही का? काही वेळा खर्च वाचवून गरिब होतकरू विद्यार्थ्यांची फी भरणे सारखे उपक्रम राबवले तर अपेक्षित काम होणार नाही का?


आम्ही फक्त घोषणा देऊन बाबासाहेब आंबेडकर यांनी असे केले तसे केले हेच सांगतो, पण त्यांच्या विचारावर चालून त्यांचा अनुयायी म्हणून मी काय केले हे कोणीच सांगत नाही. कारण माझे वैयक्तिक काहीच काम नसते. म्हणून आता आपण बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेणे बंद करावे जेणेकरून त्यांना डोक्यात घेण्यासाठी वेळ मिळेल. 


बाबासाहेब डोक्यात घेणे म्हणजे त्यांच्या विचारांचा स्विकार करून तसे स्वतः वागणे होय. आपल्या वागण्याचे निरिक्षण लोक करतात व तसे वागण्याचा प्रयत्न करतात. आपणही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे वागले पाहिजे. आपल्या आचरणात बाबासाहेब आले तर बहुजन समाज खूप लवकर त्यांना स्विकारेल. तरच बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित समता समाज व्यवस्था निर्माण होईल. 


स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून प्रस्थापितांची लाचारी स्विकारून विचारधारेतील लोकांच्या विरोधात वागणे हल्ली मोठेपणाचे वाटत असले तरी यात बहुजन समाजाचा अंत नक्कीच आहे. संविधान आमची अस्मिता असताना ते दिल्लीला जाहीर जाळले जाते तरी आम्हांला चिड येत नाही, भिमा-कोरेगावला न्याय भेटत नाही. तरी आम्ही शांत बसतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार शांत बसण्यासाठी दिला की शत्रू सांगेल तेच पोपटपंची करण्यासाठी दिला यावर विचार विनीमय होणे आवश्यक आहे. 


आज आम्ही गुणगान कोणाचे गातो. प्रस्थापित व्यवस्था ही अन्यायकारी आहे असे म्हणतानाच तुकडा मिळाला की चघळत बसतो व प्रस्थापितांचे काम करतो. संविधान पूर्णपणे संपत आले असले तरी आमचे लोक जोरजोरात ओरडत आहेत संविधान बदलणे शक्य नाही. संविधान बदलणे शक्य नाही म्हणणार्‍यांनो झोपेचे सोंग घेऊन शत्रूची पाठराखण करणे सोडून देणे आवश्यक आहे. संविधानाचे कलम क्रमांक एक सांगते इंडिया म्हणजेच भारत. या देशाला इंडिया किंवा भारत याच नावाने संबोधने आवश्यक आहे. 


या दोन नावा व्यतिरिक्त देशाचा उल्लेख कोणत्याही नावाने करता येणार नाही असे असतानादेखील प्रस्थापित लोक भारताला हिंदुस्थान म्हणतात हा राष्ट्रद्रोह नाही का? संविधान बदलणे शक्य नाही म्हणजे अजून काय अपेक्षित आहे. शिक्षण नोकरी बंद करून अडाणी व बेरोजगाराची फौज तयार करण्याचे नियोजन व देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याच्या नावाखाली ब्राम्हण राष्ट्र बनविण्याचे नियोजन सुरू आहे. प्रस्थापितांविरोधात  लढण्याची काय तयारी आहे का? आपल्याकडे नियोजन नाही कारण बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही डोक्यावरच घेऊन मिरवत आहोत. आज डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर खर्‍या अर्थाने जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल.


विनोद पंजाबराव सदावर्ते

मो.९१३०९७९३००





PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शिवसेना, भाजपला मत म्हणजे देशातील हुकूमशाहीला मत
प्रज्ञा सिंहच्या शहीद करकरेंवरील वक्तव्याने पोलीस वर्त
अपयशी लोकप्रतिनिधींमुळेच कोकण पर्यटनात मागे
ब्राम्हणी आतंकवादाचा बेसूर चेहरा
प्रधानमंत्री मोदींना आताच मागास असल्याची जाणीव कशी झाल
जेटनंतर आता एअर इंडियाही संकटात?
दाभोळकरांचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही उमेदवारी
भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नाही
राज्यातील २७ तंत्रनिकेतन संस्थांना टाळे लागण्याची शक्य
सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचा आरोप
साध्वी प्रज्ञा सिंहला निवडणूकबंदी करा!
भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांना बूट फेकून
पतीने एनडीएला मत न दिल्यास त्याला उपाशी ठेवा
या मतदारसंघात ९० टक्के केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाह
जेट एअरवेज बंद पडण्यामागे षड्यंत्र, असोसिएशनचा आरोप
विमानचालन उद्योगाला बुरे दिन, ५ वर्षांत ७ विमान कंपन्यां
प्रसार माध्यम स्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारत १४० व्या
२५ टक्के व्हीव्हीपॅटची तपासणी करून कागजी मतपत्राची मोज
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रनिर्मितीत मोठे योगदान
करकरेंना दहशतवाद्यांनी मारल्याने सुतक झाले दूर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper