×

जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठे मागास

Published On :    11 May 2019  By : MN Staff
शेयर करा:


‘टाईम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग २०१९’च्या अहवालात धक्कादायक माहिती, पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही





पुणे : शिक्षणासाठी भारतातील तरुणांचा परदेशात ओढा का वाढत आहे, याचे कोडे ‘टाईम्स’ने नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीवरून स्पष्ट झाले आहे. या क्रमवारीत पहिल्या २०० विद्यापीठांत एकाही भारतीय विद्यापीठाचा समावेश नाही. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि केम्ब्रिज विद्यापीठ अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या स्थानावर आहे. पहिल्या दहा विद्यापीठांत अमेरिकेच्या ७ विद्यापीठांचा समावेश आहे. 


जगातील उच्च शिक्षणविषयक विद्यापीठांचे दरवर्षी रँकिंग जाहीर करणार्‍या ‘टाईम्स‘ने नुकतेच ‘टाईम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग २०१९’ जाहीर केले. या क्रमवारीत ऑक्सफर्ड विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, एमआयटी विद्यापीठ (अमेरिका), कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आदी विद्यापीठे अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकावर आहेत. ‘टाईम्स’च्या जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चा २५० ते ३०० या दरम्यानच्या क्रमवारीत समावेश आहे, तर आयआयटी, इंदूर (३५१-४००), आयआयआयटी, मुंबई (४०१-५००) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (५०१-६००) अशा क्रमवारीत आहे. सुमार आर्थिक स्थिती, अपुरे स्त्रोत आणि अपुरी साधनसामग्री आदींमुळे भारतीय विद्यापीठे जागतिक दर्जाची ठरण्यात अपयशी ठरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 


केंद्र सरकारने सन २०१५ मध्ये जगातील पहिल्या २०० दर्जेदार विद्यापीठांत देशातील विद्यापीठांचा समावेश व्हावा, म्हणून राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन संरचना (एनआयआरएफ) करण्याचे जाहीर केले होेते. जागतिक रँकिंगमध्ये येण्यासाठी देशातील विद्यापीठांत स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावे; तसेच त्याचे मूल्यांकन व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून तीन वर्षांपासून देशातील विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन जाहीर केले जात आहे. 


परदेशातील विद्यापीठांत मिळणार्‍या पायाभूत सुविधा, प्राध्यापक, शिक्षण कौशल्य तसेच व्यक्तिमत्त्व विकास, करिअरच्या चांगल्या संधी आणि करिअरच्या टप्प्यावर आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा फायदा, तसेच शिक्षणासाठी मिळणारी लाखो रुपयांची शिष्यवृत्ती यामुळे देशातील लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाण्याला पसंती देत आहेत. 


आशिया खंडात देशातील सात संस्था दर्जेदार

आशिया खंडातील विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये पहिल्या शंभरात देशातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू (२९), आयआयटी, इंदूर (५०) आयआयटी, मुंबई (५४), आयआयटी, रुरकी (५४) जेएसएस अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (६२), आयआयटी, खरगपूर (७६), आयआयटी, दिल्ली (९१) या संस्थांचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १०९ वे स्थान पटकावले आहे.


७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी जातात परदेशात!

जागतिक पातळीवरच्या दर्जेदार विद्यापीठांत शिक्षण घेण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी भारतातून सुमारे साडेसात लाख विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. गेल्या दोन वर्षार्ंत परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणार विद्यार्थ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. 





PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला’
महाराज कधीच दिल्लीकरांचे आधीन झाले नाहीत
राज्यसभा खासदार मालामाल!
बलात्कार खटल्यांसाठी १०२३ न्यायालये, केंद्र सरकारचा प्
मॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या
मला चिन्मयानंदच्या रुममध्ये नेण्यात आलं, हे सगळ्या कॉले
८२ माजी खासदारांना अजूनही सोडवेना सरकारी बंगल्याची उब
फडणवीसांच्या ‘महाजनादेश’ला गर्दी जमवण्यासाठी महिलांन
फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेवर ‘कडकनाथ’चा मारा
गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण
शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा
मुलीला त्रास देणार्‍या आरएसएस कार्यकर्त्याची पित्याकड
बोट अपघातात १५ वर्षात तब्बल १० हजार ५८० जणांचा मृत्यू
ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली तरच न्याय
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या डोक्यावर ३ हजार ५८० कोटी
पाणबुडी निर्मितीसाठी निविदा भरल्याने समुद्री सुरक्षाह
‘महाजनादेश ही जनतेवर लादलेली यात्रा’
पैठणगेट येथे‘ईव्हीएम’विरोधात निदर्शने
ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आलेल्यांनी उदयनराजेंना मुख्
बारामतीत राडा, फडणवीसांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper