×

पश्‍चिम बंगालमध्ये सुरक्षा दलांच्या गणवेशात आरएसएसचे कार्यकर्ते

Published On :    13 May 2019  By : MN Staff
शेयर करा:


ममता बॅनर्जींचा आरोप





कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांच्या तैनातीच्या नावाखाली भाजप बळजबरीने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पाठवत आहे. आरएसएसच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा दलांच्या गणवेशात पाठवण्यात येत असल्याचा मला संशय आहे असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. दरम्यान, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची एक्स्पायरी डेट सुरू आहे, त्यामुळे तिथे हिंसेचे तांडव सुरू असल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केली.


पश्‍चिम बंगालमधील मतदारांना प्रभावित करण्यासाठीच आरएसएसचे कार्यकर्ते सुरक्षा दलांच्या गणवेशात येत आहेत असे ममता म्हणाल्या. दक्षिण परगण्यातील एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. केंद्रीय सुरक्षा दलांनी एका केंद्रावर गोळीबार केला. अल्पसंख्याक समाजातील तृणमूल कॉंग्रेसचा एक कार्यकर्ता यात जखमी झाला. तसेच केंद्रीय सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांकडून रांगेतील मतदारांना भाजपला मते देण्यास सांगण्यात येतेय असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 


भाजपला मत द्या हे सांगण्याचे काम सुरक्षा दलांचे आहे का? हे कसे काय होऊ शकत? काही सेवानिवृत्त अधिकार्‍यांचा प्रयोग मोदी सरकारकडून मते देण्यासाठी केला जातोय. हे करताना त्यांना लाज वाटत नाही का ? सुरक्षा दलाचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्यासाठी येथे आले आहेत. आज तुम्ही मोदींसाठी काम करताय, उद्या दुसरा कुणी येईल तेव्हा काय कराल, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय, शत्रुघ्न सिन्हांना संशय
भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय
या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमक
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper