×

‘नेहरूंचा समाजवाद आणि मोदींचा ब्राम्हणवाद’

Published On :    13 May 2019  By : MN Staff
शेयर करा:


अमेरिकेतील जगप्रसिध्द ‘टाइम’ मासिकाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता अशी संभावना करत मोदींच्या ब्राम्हणवादाचा मुखवटा जगासमोर आणला आहे.





अमेरिकेतील जगप्रसिध्द ‘टाइम’ मासिकाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता अशी संभावना करत मोदींच्या ब्राम्हणवादाचा मुखवटा जगासमोर आणला आहे. लेख लिहणार्‍या आतिश तासीर यांनी मोदी हिंदुत्वावर(ब्राहणवाद) आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप केला आहे. 


या लेखात तासीर यांनी मोदींच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगताना पंडीत जवाहरलाल नेहरूंचा समाजवाद आणि भारतातील सध्याची सामाजिक परिस्थिती याची तुलना केली आहे. तासीर यांनी नेहरूंच्या समाजावादाला झुकते माप दिले असले तरी नेहरूंचा समाजवाद व मोदींचा ब्राम्हणवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे विसरून चालणार नाही.


कार्ल मार्क्स व लेलीन यांनी रशियात समाजवादाची पायाभरणी केली. समाजवाद म्हणजे देशातील प्रत्येक साधन-संपत्तीवर सरकारचा जेवढा हक्क तेवढाच नागरिकांचाही हक्क. म्हणजे सर्व घटकांवर सरकारप्रमाणेच लोकांचाही हक्क. येणार्‍या नफ्या-तोट्यातही बरोबरीचा अधिकार होय. समाजवादाची संकल्पना निश्‍चितच चांगली आहे. परंतु प्रत्येक नागरिक जसा आपल्या घरी काम करतो तसा राष्ट्राच्या उन्नतीसाठी करतो का? याचे उत्तर नाही. म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले तरी चालेल अशीच त्याची मानसिकता असते. 


रशियात समाजवाद फोफावला तरी काही कालखंडानंतर तो लयासही गेला. कारण रशियाची समाजवादाने शकले केली हे जगाला माहित आहे. त्यामुळे रशियातील समाजवाद अन्य राष्ट्रात फोफावला नाही. परंतु त्याच रशियाचे समाजवादी धोरण भारताचे प्रथम प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी अंगिकारले. 


जवाहरलाल नेहरूंच्या समाजवादाने लोकांबद्दल भाषा केली असली तरी खरंच लोकांसाठी काम केले आहे का? तर याचे उत्तर नकारार्थी आहे. जर लोकांसाठी काम केले असते तर समाजवादाच्या नावाखाली नेहरूंनी ब्राम्हणवादाचा वरचष्मा राखला असता का? १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत पंडीत जवाहरलाल नेहरूंनी ३.५ टक्के ब्राम्हणांना ६० टक्के उमेदवारी देऊन ४७ टक्के ब्राम्हण निवडून आणले व कायदा बनवणार्‍या संस्थेवर कब्जा केला. हे होते नेहरूंचे तथाकथित समाजवादी धोरण.


आंतरराष्ट्रीय राजकारणात विदेश नीती महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. १९४५ ला दुसरे महायुध्द संपले आणि वेगवेगळे देश दोन गटांमध्ये विभागले गेले, एक गट अमेरिकेचा आणि दुसरा गट रशियाचा, १९४७ ला इंग्रज निघून गेले आणि भारताची सत्ता कॉंग्रेसच्या (ब्राम्हणांच्या) हातामध्ये आली, पंडित नेहरू यांनी दोन्ही गटात न जाता अलिप्तवाद स्वीकारला यालाच अलिप्तवादी धोरण म्हटले गेले. प


रंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर अलिप्त राहण्याच्या विरोधात होते. त्यांनी म्हटले की जर उद्या चीनने आपल्यावर आक्रमण केले तर रशिया मदतीला येणार नाही कारण तो त्या गटाचा भाग आहे आणि अमेरिकासुध्दा मदतीला येणार नाही कारण आपण त्या गटात नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय भविष्य खरे ठरले. नंतर खरंच चीनने आपल्यावर आक्रमण केले आणि आपल्या देशाचा काही भाग चीनने गिळंकृत केला, आपल्या बाजूने ना रशिया आला ना अमेरिका!


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे युध्दासंबंधीचे धोरण असे होते की संपूर्ण कश्मीर ताब्यात घेऊ आणि भारताचे सैन्य लाहोरपर्यंत घेऊन जाऊ तोपर्यंत कश्मीरचा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय न्यायालयात किंवा युनोमध्ये घेऊन जायचा नाही. परंतु पंडित नेहरूंनी ऐतिहासिक घोडचूक करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणाविरोधात जाऊन संपूर्ण कश्मीर ताब्यात घेण्याअगोदरच नेहरूंनी काश्मीर प्रश्‍न युनोमध्ये मांडला आणि जी भीती डॉ.आंबेडकरांना होती तेच झाले. युनोने युध्द थांबवण्याचा आदेश दिला आणि एलओसी अर्थात लाईन ऑफ कंट्रोल तयार झाली आणि कश्मीर प्रश्‍न खितपत पडला. 


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ऐकले असते तर कश्मीर प्रश्‍नाचा त्याच काळात निकाल लागला असता. नेहरूंच्या अलिप्ततावादी व समाजवादी धोरणाच्या चुकीच्या विदेश नीतीमुळे आणि कश्मीरबाबत चुकीचे धोरण ठरवल्यामुळे देश आजही त्याची सजा भोगत आहे. त्यामुळे आमच्या वीर जवानांना सरहद्दीवर शहीद व्हावे लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्या चार कारणांपैकी हे एक प्रमुख कारण होते की नेहरूंचे कश्मीर प्रश्‍नावर चुकीचे धोरण हे आहे. अर्थात नेहरूंचे परराष्ट्र धोरण चुकीचे होते. 


’Hidden enemy is more dangerous than open enemy’ म्हणजे खुल्या शत्रूपेक्षा छुपा शत्रू मोठा घातक असतो. छुपा शत्रू हा अस्तनीतला साप असतो. तो कधी बाहेर येईल, कधी दंश करेल आणि पुन्हा कधी गडप होईल  हे सांगता येत नाही. म्हणून नेहरूंचा म्हणजे कॉंग्रेसचा समाजवाद हा छुपा शत्रू आहे. त्यामुळे कॉंग्रेस जास्त खतरनाक आहे. भाजपा हा लोकांचा खुला शत्रू आहे. ते संविधानाला खुला विरोध करतात. त्यामुळे आपण भाजपासून सावध असतो. कारण भाजपाची संविधान व लोकशाहीविरोधी भूमिका आपल्याला माहित असते. कॉंग्रेसचे तसे नाही, कॉंग्रेस संविधानाची व लोकांची भाषा जरूर करेल मात्र संविधान संपवण्याचे काम कॉंग्रेसनेच केले आहे. याचा अर्थ कॉंग्रेस लोकांचे काम कधीच करणार नाही तर ब्राम्हणाचेच करेल.


तासीर यांना नेहरूंचा समाजवाद चांगला वाटत असला तरी भारतातील समाजवाद व ब्राम्हणवाद एकच आहेत. मोदींनी खुलेआमपणे हिंदुत्ववादाचे (ब्राम्हणवाद) ढोल बडवले आहेत. म्हणजे भाजपा ताकाला जाऊन गाडगे लपवत नाही. कॉंग्रेस ताकाला जाते आणि गाडगे लपवते. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बंधुभाव वाढावा यासाठी मोदींनी काहीच केले नाही अशीही टीका तासीर यांनी केली आहे. हा मुद्दा बरोबर आहे. मात्र या देशात हिंदू कोण आहेत याची माहिती कदाचित तासीर यांनी नसावी. 


हिंदू कोणीच नसून स्वत:च्या स्वार्थासाठी हिंदुत्वाचा बुरखा ब्राम्हणांनी पांघरला आहे. त्याच हिंदुत्वाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ब्राम्हण गोळ्या झाडत असतो. हिंदुत्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ब्राम्हणवाद आहे हे समजून घ्यायला हवे. नेहरूंच्या समाजवादानेच मुस्लिमांची आज अशी वाताहात झाली आहे. याचा पुरावा सच्चर समितीचा अहवाल आहे. 


इंग्रजांच्या कालखंडात ३३ टक्के प्रशासनात असलेले मुस्लिम आज २ टक्क्यांवर आले आहेत. म्हणजे मुस्लिमांना देशोधडीला लावण्याचे काम नेहरूंच्या कॉंग्रेसने केले आहे. परंतु आमच्या मुस्लिम बांधवांना कॉंग्रेस हा सेक्युलर वाटतो, म्हणून भाजपापेक्षा कॉंग्रेस चांगला असे त्यांना वाटते. याचा दुसरा अर्थ दगडापेक्षा वीट मऊ! परंतु डोक्यात दगड घातला काय आणि वीट घातली काय डोके फुटणारच आहे याची जाणीव मुस्लिमांना नाही. त्यामुळे भाजपा नको म्हणून मुस्लिम बांधव कॉंग्रेसला भरभरून मते देऊन स्वत:ची कबर खणत असतो. 


२००४ मध्ये ज्यावेळी संभाजी ब्रिगेडने पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला केला, त्यावेळी समाजवादाचा ढोल बडवणार्‍या डॉ.श्रीराम लागू या ब्राम्हणाने या हल्ल्याला तालीबानी कृत्य असे संबोधले होते. आमच्या महापुरूषांची बदनामी केल्यामुळे ब्राम्हणांचे कान समाजवादी असलेल्या डॉ. लागू यांनी पिरगळायला हवे होते. परंतु तसे त्यांनी केले नाही. 


म्हणजेच एखादा ब्राम्हण समाजावादाची भाषा करतो त्यावेळी समजायचे की तो दुसर्‍या बाजूला ब्राम्हणवादाची खुंटी बळकट करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण पुरोगामी व सनातनी ब्राम्हण या एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत असे विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९३६ लाच म्हणाले होते. म्हणून ब्राम्हण कधी समाजवादी, पुरोगामी, सुधारणावादी, जहाल, मवाळ, कट्टर, नरम, सनातनी नसतोच, तर तो केवळ आणि केवळ ब्राम्हणच असतो. तो त्याची भूमिका शेवटपर्यंत सोडत नाही. 


दिलीप बाईत

९२७०९६२६९८



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय, शत्रुघ्न सिन्हांना संशय
भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय
या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमक
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper