×

सात भारतीय कंपन्यांवर अमेरिकेत भरले खटले!

Published On :    15 May 2019  By : MN Staff
शेयर करा:


काही औषधांच्या किंमती १ हजार टक्के वाढविल्याचा आरोप





मुंबई : व्यापक पातळीवर वापरल्या जाणार्‍या जेनेरिक औषधांच्या किमती संगनमत करून वाढविल्याबद्दल ७ भारतीय कंपन्यांसह जगातील अनेक बलाढ्य औषधी कंपन्यांवर अमेरिकेतील ४४ राज्यांनी खटले दाखल केले आहेत. काही औषधांच्या किमती १ हजार टक्के वाढविल्याचा आरोप या कंपन्यांवर ठेवण्यात आला आहे.


अमेरिकेतील राज्यांनी कनेक्टिकटच्या जिल्हा न्यायालयात १० मे रोजी ५०० पानांचा खटला भरला आहे. खटला भरण्यात आलेल्या कंपन्यांत तेवा, पीफायझर, सँडोज आणि मायलान यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. 


त्याचप्रमाणे सन फार्माची अमेरिकी शाखा तारो, झायडस, लुपीन, अरोबिंदो, डॉ. रेड्डीज, वोक्हार्ट आणि ग्लेनमार्क या भारतीय कंपन्यांवरही खटले भरण्यात आले आहेत. २०१४ मध्ये या कंपन्यांविरुध्द संगनमत करून ३०० जेनेरिक औषधांच्या किमती वाढविल्याचा आरोप करणारी तक्रार दाखल झाली होती. २०१६ नंतर तिचा विस्तार करण्यात आला.


आपल्या विरोधातील आरोपांचा भारतीय कंपन्यांनी इन्कार केला आहे. सन फार्माच्या प्रवक्त्याने सांगितले की, खटल्यात आमच्या विरुध्द करण्यात आलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. आम्ही त्याचा जोरकसपणे प्रतिकार करू. 


अमेरिकेतील या कारवाईमुळे भारतीय औषधी क्षेत्रावर जबर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजारात सोमवारी औषधी कंपन्यांचे समभाग ४ ते ९ टक्क्यांनी घसरले. सन फार्माचा समभाग जवळपास १० टक्क्यांनी घसरून ३९७ रुपयांवर आला.


भारतीय कंपन्यांवर किती परिणाम होईल?

काही जाणकारांनी सांगितले की, भारतीय कंपन्या अमेरिकेत आधीच औषधांच्या किमतीवरील दबाव सहन करीत आहेत. त्यातच हा खटला गुदरला आहे. या प्रकरणात कंपन्या दोषी ठरल्यास कंपन्यांवर मोठा आर्थिक बोजा पडू शकतो. अमेरिकेतील औषधी बाजार सर्वाधिक किफायतशीर समजला जातो. कंपन्यांना अमेरिकेतून मोठा महसूल मिळतो.


काही जाणकारांना मात्र हा खटला फारसा प्रभावी वाटत नाही. प्रभुदास लीलाधरचे सहउपाध्यक्ष सुरजित पाल यांनी सांगितले की, खटला भरण्यात आलेल्या कंपन्यांचा दरवाढीतील सहभाग अत्यल्प आहे. आमच्या मते यात प्रत्येक कंपनीला ५० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आर्थिक झळ बसणार नाही.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय, शत्रुघ्न सिन्हांना संशय
भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय
या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमक
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper