×

अखेरच्या टप्प्यात २९७ उमेदवार गुन्हेगार, एडीआरच्या तपशीलातील माहिती

Published On :    15 May 2019  By : MN Staff
शेयर करा:


उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा तपशील एडीआर ने नुकताच जाहीर केला.





मुंबई : लोकसभेच्या रणसंग्रामचा अखेरचा टप्पा १९ मे रोजी असून यात तब्बल २९७ उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. तर ७८ कोट्यधीश उमेदवार सातव्या टप्प्यामध्ये मतदारांचा कौल आजमावणार आहेत. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या निवडणूक सुधारणा क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेने उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा तपशील नुकताच जाहीर केला.


या कोट्यधीशांमध्ये देखील बिहारचे पाटलीपुत्र लोकसभा मतदार संघातून लढणारे अपक्ष उमेदवार राजेश कुमार पहिल्या क्रमांकावर आहेत. सोबतच, ९६ महिला उमेदवारांनी देखील मतदार राजापुढे  पदर पसरला आहे. राजकीय पक्षांची भूमिका गुन्हेगारी विरोधातील असली तरी उमेदवारी देताना मात्र नैतिकतेचे सारे निकष गुंडाळून ठेवण्यात आल्याचे या टप्प्यातील उमेदवारांच्या आकडेवारीवरून दिसते.  


सातव्या टप्प्यात ९१८ उमेदवार मैदानात असून त्यातील ९०९ उमेदवारांची प्रतिज्ञापत्रेच एडीआरला उपलब्ध होऊ शकली आहेत. या प्रतिज्ञापत्रांनुसार सातव्या टप्प्यातील २९७ उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. त्यातील १७० उमेदवारांवर वेगवेगळ्या गुन्ह्यांचे खटले सुरू आहेत. 


याखेरीज १२७ उमेदवारच्या नावावर तर गंभीर गुन्हे आहेत. पाच वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे गंभीर गुन्ह्यांच्या श्रेणीत येतात. उपलब्ध तपशीलांच्या आधारे आकडेवारीचे विश्‍लेषण करून एडीआरने दावा केला आहे की गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांपैकी १२ उमेदवारांवर हत्येसारख्या संवेदनशील गुन्ह्यांची नोंद आहे. तर हत्येचा प्रयत्न करण्याचे गुन्हा मिरवणार्‍या उमेदवारांची संख्या देखील कमी नाही. असे ३४ उमेदवार रिंगणात असून त्यांचा फैसला २३ मे रोजी होईल. 


२५ वर्षांखालील उमेदवारही मैदानात 

एडीआरच्या म्हणण्यानुसार या लोकसभा निवडणुकीत एकूण ८०३९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ३५ उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये वयाचा खुलासा केलेला नाही. एवढेच नव्हे तर दोन उमेदवारांनी त्यांचे वय २५ वर्षांपेक्षाही कमी असल्याचे दर्शविले आहे. तरीही त्यांचा अर्ज वैध ठरला असून ते निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेले २६०० पक्ष असून त्यातील ३६८ पक्षांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उतरवले आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला’
महाराज कधीच दिल्लीकरांचे आधीन झाले नाहीत
राज्यसभा खासदार मालामाल!
बलात्कार खटल्यांसाठी १०२३ न्यायालये, केंद्र सरकारचा प्
मॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या
मला चिन्मयानंदच्या रुममध्ये नेण्यात आलं, हे सगळ्या कॉले
८२ माजी खासदारांना अजूनही सोडवेना सरकारी बंगल्याची उब
फडणवीसांच्या ‘महाजनादेश’ला गर्दी जमवण्यासाठी महिलांन
फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेवर ‘कडकनाथ’चा मारा
गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण
शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा
मुलीला त्रास देणार्‍या आरएसएस कार्यकर्त्याची पित्याकड
बोट अपघातात १५ वर्षात तब्बल १० हजार ५८० जणांचा मृत्यू
ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली तरच न्याय
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या डोक्यावर ३ हजार ५८० कोटी
पाणबुडी निर्मितीसाठी निविदा भरल्याने समुद्री सुरक्षाह
‘महाजनादेश ही जनतेवर लादलेली यात्रा’
पैठणगेट येथे‘ईव्हीएम’विरोधात निदर्शने
ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आलेल्यांनी उदयनराजेंना मुख्
बारामतीत राडा, फडणवीसांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper