×

पुन्हा होऊ शकतो तुमचा डेटा लीक, फेसबुकने दिला इशारा

Published On :    28 Apr 2018  By : MN Staff
शेयर करा:


भविष्यात फेसबुकवरील डेटा लीक सारख्या आणखी घटना घडू शकतात, असा इशारा सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने युजर्स व गुंतवणूकदारांना दिला आहे.





सॅनफ्रान्सिस्को | भविष्यात फेसबुकवरील डेटा लीक सारख्या आणखी घटना घडू शकतात, असा इशारा सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने युजर्स व गुंतवणूकदारांना दिला आहे. ही प्रकरणे कंपनीच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचवू शकतात. 


फेसबुकने अमेरिकेच्या सिक्युरिटी ऍण्ड एक्सचेंज कमिशनला दिलेल्या रिपोर्टमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे. पण या मध्ये कॅम्ब्रिज ऍनालिटीकाचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. 


युजर्सची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी व माहितीची पडताळणी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली जाते आहे. डेटाचा चुकीचा वापर थांबविण्यासाठी याचा फायदा होईल, असे कंपनीने रिपोर्टमध्ये म्हटले आहे. फेसबुकनुसार, मीडिया आणि थर्ड पार्टीकडून घटना आणि संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत.


डेटा लिकसारख्या आणखीही घटना समोर येऊ शकतात, असा इशारा फेसबुकने गुंतवणूकदारांना दिला आहे. कंपनीच्या धोरणांविरोधात डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. निवडणुकीसाठीची कॅम्पेन, जाहिराती आणि चुकीच्या सूचना पसरविण्यासाठी डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. 


डेटा लीकसारखी घटना पुन्हा घडली तर युजर्सचा कंपनीवरील विश्‍वास कमी होईल तसेच ब्रॅण्ड इमेजवरही फरक पडेल परिणासी व्यावसायावर याचा परिणाम होइल. डेटाचा चुकीचा वापर केल्यामुळे आपल्या पुढील कारदेशीर गोष्टीही वाढत जातील त्यामुळे दंड भरायला लागल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. 


दरम्यान, फेसबुकचे सर्वेसर्वा झुकर्सबर्ग यांचाही डेटा चोरी झाल्याचे समोल आले आहे. अमेरिकेच्या संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी म्हटले की, ज्या युजर्सचा डेटा चुकीच्यापद्दतीने ब्रिटिश पॉलिटिकल कन्सल्टन्सी फर्मबरोबर शेअर केला त्यामध्ये माझेही नाव होते, असे ते म्हणाले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
नोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब
संशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे
सकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श
लाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्
मोहन भागवत हाजिर हो! स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या
राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल
देशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब
दिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ
१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच
जेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच
मोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्
राफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र
भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच
राफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍
स्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण
राष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा! शरद पवार यां
कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे
गडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper