×

अनिल अंबानींच्या रिलायन्समध्ये ५ हजार ५०० कोटींची हेराफेरी?

Published On :    10 Jul 2019  By : MN Staff
शेयर करा:


भारतीय स्टेट बँकेचा ठपका





मुंबई : अडचणीत सापडलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या अन्य कंपन्यांच्या व्यवहारात तब्बल ५ हजार ५०० कोटी रुपयांची हेराफेरी झाली असल्याचे भारतीय स्टेट बँकेला आढळून आले आहे. ही माहिती या प्रकरणाशी संबंधित असलेल्या चार व्यक्तींनी इकॉनॉमिक्स टाइम्स या वृत्तपत्राला दिली आहे.


आरकॉम, रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड आणि रिलायन्स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये फंडाच्या रमकेच्या देवाणघेवाणीदरम्यान पैशांचे संशयास्पद व्यवहार, कर्जाबाबतची कथित एव्हरग्रीनिंग आणि निनावी कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. यात रिलायन्स ग्रुपच्या संचालकांचा सहभाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे. रिलायन्स ग्रुपला या पूर्वी अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप म्हटले जात असे.


तपासादरम्यान मे २०१७ पासून ते मार्च २०१८ दरम्यान झालेल्या पैशांच्या व्यवहारांवर विशेष लक्ष देण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. यात हजारो नोंदीपैकी तीन नोंदी संशयास्पद आढळून आल्या. त्यांचा संबंध फंड वळवण्याशी असू शकतो असे म्हटले जात आहे. दरम्यान, झालेल्या व्यवहारांची प्रामाणिकता तपासण्यासाठी अधिक खोलात जाऊन तपास करण्यावर कर्जपुरवठादार विचार करत आहेत. एसबीआयने फंड पुरवठ्याबाबत अभ्यास करण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये बीडीओ या अकाउंटिंग कंपनीची मदत घेतली होती.

नेटिझेनशी संबंध
नेटिझन या कंपनीला मे २०१७ मध्ये ४ हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम मिळाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही रक्कम नेटिझनला रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांकडून अनेक ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून मिळाली होती. इतक्या मोठ्या रकमेमुळेच संशय बळावला. यानंतर देण्याची प्रक्रिया संपल्याचे दाखवण्यात आले. कंपनीच्या ऑडिटर्सनी कंपनीच्या व्यवहारांमध्ये या देवाणघेवाणीची माहिती द्यायला हवी होती, मात्र ती दिली गेली नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली. ग्रुपच्या एका कंपनीला इंटर-कॉर्पोरेट डिपॉझिटच्या रुपात ६०० कोटी रुपये देण्यावर देखील प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. हे प्रेफरेन्शियल ट्रान्झॅक्शन असू शकते असा आरोप तपासादरम्यान लावण्यात आला आहे.

आरकॉमची प्रतिक्रिया
कंपनी सध्या दिवाळखोरीत असून या बाबतची माहिती रिझॉल्युशन प्रोफशनल अनीश नानावटी यांच्याकडून घेतली जावी, असे आरकॉमच्या प्रवक्त्याने सांगितले. नानावटी यांनी मात्र इकॉनॉमिक्स टाइम्सच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शेतकरी संकटात : सरकारअभावी पीक कर्ज पुनर्गठनाचा निर्णय न
भूकंपाच्या धक्क्याने भुज हादरले
मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
संस्कृतच्या मुस्लीम प्राध्यापकाविरोधात ब्राम्हण विद्
भाजपा सरकारने घाईघाईत निवडणूक बॉंड प्रणाली लादली
मराठा आरक्षण : पुढील सुनावणी जानेवारीमध्ये
देशाचा विकास दर घसरणार, नोकर्‍याही जाणार
भाजपाच्या अंताची सुरूवात महाराष्ट्रातूनच, संजय राऊत या
बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसाठी महत्
महाराष्ट्र राज्याचा गुन्हेगारी अहवाल रखडलेलाच, फडणवीस
राज्यात सत्तासंघर्षाच्या काळात ३०६ शेतकर्‍यांच्या आत्
राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठीचे आरक्षण जाह
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून
रामदेव बाबा नेटकंर्‍याच्या निशाण्यावर, मूलनिवासी संकल्
रस्ते अपघातांच्या बळींमध्ये देशात महाराष्ट्र दुसरा
वाणिज्य बँकांच्या ठेवींमध्ये सरकारचा वाटा सुमारे ४ लाख
अर्थव्यवस्था आणखी ढासळण्याचे संकेत
मराठा आरक्षण सुनावणीत मोठा पेच
योगी सरकार आता आग्रा शहराचे नाव बदलणार
इंधन दरवाढीचा भडका! सलग पाचव्या दिवशी पेट्रोल महागले
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper