×

शपथपत्रात खोटी माहिती दिल्याविरोधातच विविध खासदारांविरोधात खंडपीठात निवडणूक याचिका दाखल

Published On :    11 Jul 2019  By : MN Staff
शेयर करा:


हिना गावितांवर तर राज्यमंत्री रावसाहेब दानवेंविरुध्दही याचिका





औरंगाबाद : बीड लोकसभा मतदार संघापाठोपाठ आता इतरही अनेक लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. बहुतांश निवडणूक याचिकांमध्ये शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नंदुरबार, बीड, नांदेड, परभणी, लातूर आदी मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदारांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत.


निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात खोटी, चुकीची व दिशाभूल करणारी माहिती नमूद केल्याप्रकरणात बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या निवडीला सर्वप्रथम आव्हान देण्यात आले. या निवडणुकीतील पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी याचिका सादर केली आहे. 


निवडणूक आयोगाच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १२५-अ नुसार खोटी माहिती सादर करणे हा गुन्हा असून, त्या अंतर्गत ही याचिका सादर केली. दोन मतदार यादीत नाव असणे, आर्थिक व्यवहार लपवून ठेवणे, भावनिक मुद्याच्या आधारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वडील गोपीनाथ मुंडे यांचे नाव लावणे, वैद्यनाथ अर्बन को ऑप. बँकेच्या त्या संचालक असून त्यांच्या विरोधात बोगस कर्ज वाटप केल्याप्रकरणी परळीत फसवणुकीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. त्याचीही माहिती मुंडे यांनी सादर केली नसल्याचे आक्षेप घेतले.


हिना गावितांवर माहिती लपवल्याचा आरोप
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून विजयी डॉ. हिना गावित यांच्या विरोधात शंकर वसावे यांनी ऍड. ज्ञानेश्‍वर बागुल यांच्यातर्फे निवडणूक याचिका दाखल केली. बॉण्ड पेपरवर शपथपत्र सादर केले, त्यांनी शपथपत्र पूर्ण भरलेले नाही. अनेक जागा रिकाम्या सोडल्या आहेत. आपल्यावर अवलंबित्वाची नावे चुकीची दिली असून, यात वडील माजी मंत्री विजयकुमार गावित आणि आई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा होत्या, हे दाखवून देण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोत उघड केलेले नाहीत आदी आक्षेप घेण्यात आले आहेत.

राज्यमंत्री रावसाहेब दानवेंविरुध्दही याचिका
या आणि अशाच कारणांवरून डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात विष्णू जाधव यांनी याचिका दाखल केली आहे. उस्मानाबाद मतदारसंघातील खा. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मनोहर पाटील, जालना मतदारसंघात खा. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात डॉ. शरदचंद्र वानखेडे, नांदेड येथील खा. प्रतापराव चिखलीकर यांच्या विरोधात यशपाल शिंदे, हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांच्या विरोधात मोहन फत्तूसिंग राठोडनी याचिका दाखल केली. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधातही याचिका दाखल केली आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आमदार फोडण्यासाठी २ कोटी, पेट्रोलपंपाची ऑफर
इराणने अमेरिकेचे १७ हेर पकडले
‘जय श्रीराम’च्या घोषणांची सक्ती करत औरंगाबादमध्ये झोमॅ
‘धार्मिक हिंसाचारातील पीडितांचा संघर्ष मोठा’
पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलायला हवी
शाळेचे दप्तर मागितलं म्हणून बापाने आपल्या दोन मुलांना प
भारताच्या आर्थिक वृध्दीदरात आशियाई विकास बँकेने केली घ
पोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला
ऐन विधानसभेच्या तोंडावर काढलेली यात्रा काय कामाची?
मुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला आग
वाचाळ प्रज्ञा ठाकूरला भाजपाने फटकारले
हिमा दासची सोनेरी दौड
२०३० पर्यंत ४० टक्के जनतेची पाण्यासाठी मारामार; देशभरात
सत्तेत असणार्‍यांनी मोर्चा काढायचा नसतो
‘एसटी’ला चांगले दिवस येण्यासाठी शासनात विलीन करा
सहा महिन्यांत १३०० शेतकरी आत्महत्या
महिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशामध्ये आइसलँड प्रथम तर
विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात
उपासमारीमुळे ग्रामस्थांनी गाव काढले विक्रीला!
मुंबई विद्यापीठाचे ११३ परीक्षांचे निकाल रखडलेलेच
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper