×

भारतातून बौध्द धम्म का संपला याची समीक्षा करावी लागेल

Published On :    12 Jul 2019  By : MN Staff
शेयर करा:


बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या पुणे जिल्हा अधिवेशनात डी.आर.ओहोळ यांचे प्रतिपादन

पिंपरी-चिंचवड : आपण फक्त परिणामांवर चर्चा करत आहोत कारणांवर चर्चा करत नाही. त्यामुळे समस्यांचे निवारण होत नाही. समस्यांचे निवारण करायचे असेल तर कारणांवर चर्चा करायलाच हवी. पूर्वी अखंड बौध्दमय असलेल्या भारतातून बौध्द धम्म का संपला? याची समीक्षा करावी लागेल. समीक्षा केल्याने आपल्यात मजबुती व कमजोरी कशात आहे याचे आकलन होईल. त्यामुळे आपल्याच निर्णयाची आपण समीक्षा केली पाहिजे असे प्रतिपादन बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संयोजक डी.आर.ओहोळ यांनी केले.


बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्यावतीने पुणे जिल्ह्याचे द्वितीय अधिवेशन पिंपरी-चिंचवड येथे संत तुकाराम नगरात पार पडले त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन धम्मचारी आनंदबोधी यांनी केले. तर प्रास्ताविक गौतम भुंजग यांनी केले. यावेळी ओहोळ यांनी  बुध्द धम्माची तत्वे काय आहेत यावर भाष्य केले. खरं म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम हा चिंतनाचा असतो. त्यामुळे चिंतन व्हायला हवे. आज भारतात शत्रूचे नियंत्रण कसे झाले? यावर विचारमंथन करायला हवे. 


भारतातील ब्राम्हण कुणाला घाबरतात तर ते बौध्द धम्माला घाबरतात. धम्म हा तर्कावर आधारित आहे. ब्राम्हण, यहुदी आणि पारशी हे धर्म विषमतेला मानणारे आहेत. तर जैन, शिख, लिंगायत, ख्रिश्‍चन, इस्लाम व बौध्द हे धम्म समतेला मानणारे आहेत. बौध्द धम्माचे इतर जातीशी व धम्माशीही लिंक आहे हे नाकारता कामा नये. हिंदू हा शब्द कुठल्याच धर्मग्रंथात नाही. त्यामुळे हिंदू धर्माला ब्राम्हणी धर्म म्हटले पाहिजे. श्रृती, मनुस्मृती, रामायण, महाभारत, वेद, पुराणे हे सर्व ब्राम्हणी साहित्य आहे असे विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे या साहित्यातून काहीच हाती लागणार नाही.


विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारित राष्ट्रनिर्माण करावयाचे आहे असे म्हटले आहे. मग या देशात या चतु:सुत्रीवर आधारित राष्ट्र निर्माण झाले आहे का? याचा विचार व्हायला हवा. ९ ऑगस्ट २०१८ ला दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर ११ ब्राम्हणांनी संविधान जाळले. त्यावेळी कुणीच आवाज उठवला नाही. काही रक्ताच्या नातेवाईकांनीही याबाबत बोलण्याचे टाळले. म्हणजे त्यांचे बोलणे व कृती वेगळी होती. यावरून संविधान लोकांपर्यंत पोहचले का? असाही प्रश्‍न उपस्थित होतो. 


एका हातात मनुस्मृती आणि दुसर्‍या हातात संविधान घेतल्याशिवाय संविधान काय म्हणत आहे हे लक्षात येणार नाही. तेव्हा कुठे थोडे संविधान समजेल. कुठल्याही वकीलांनी कुठल्याही देशाचे संविधान लिहले नाही तर ज्यांनी सामाजिक आंदोलने चालवली त्याच लोकांनी संविधान लिहले आहे. १९५० पूर्वी आपल्याला कोणी अधिकार नाकारले होते? ते संविधानात आपल्याला कसे देण्यात आले याचे चिंतन करायला हवे. संविधान पूर्णपणे संपले असून शत्रूला दोष देण्यापेक्षा आपणही त्याला कारणीभूत आहोत असे ओहोळ यांनी स्पष्ट केले.


जे लोक आपल्या निर्धारित कार्याची निरंतर समीक्षा करत नाहीत, ते सामूहिक आत्महत्या करतात असे डॉ.आंबेडकरांनी म्हटले आहे. केवळ आवाहन केल्याने भारत बौध्दमय होणार आहे का? असा सवाल उपस्थित करतानाच ओहोळ यांनी काही इतिहासाचे दाखले दिले. ज्यांचा इतिहास महान त्यांच्या प्रेरणा महान असतात. ज्यांचा इतिहास छोटा त्यांच्या प्रेरणाही छोट्या असतात. जी लोकं इतिहासपासून धडा घेत नाहीत त्यांना इतिहास धडा शिकवतो. 


आपण इतिहासापासून धडा घेतलेला नाही, म्हणून आपल्याला इतिहासाने धडा शिकवला. पार्श्‍वभूमी, क्रांती, प्रतिक्रांती, बाबासाहेबांची त्रिसुत्री, आजची परिस्थिती, उपाय यावर विचार करायला हवा. तथागत बुध्दांनी ४६ वर्षे पायी प्रचार करून बुध्द धम्म वाढवला. जगातील पहिले वैज्ञानिक बुध्द आहेत. जगातील ६६ वैज्ञानिकांनी बुध्दांना गुरू मानले आहे. त्यामध्ये आईनस्टाईन तर भारतातील अमर्त्य सेन यांचाही समावेश आहे. जागतिक कुशल संघटक म्हणूनही जगाने बुध्दांची नोंद घेतली आहे असे ओहोळ यांनी सांगितले.


विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एकच घोषणा चारवेळा केली आहे. २० मार्च १९२७ महाड, १३ ऑक्टोबर १९३५ येवला-नाशिक, २६ नोव्हेंबर १९४९ नवी दिल्ली व १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दिक्षाभूमी नागपूर येथे एकच घोषणा चारवेळा केली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारित नवा भारत निर्माण करण्याचा माझा उद्देश आहे असे सांगितले होते. बाबासाहेबांच्या स्वप्नातला नवा भारत निर्माण झाला आहे का? असा सवाल ओहोळ यांनी केला. त्याला निरक्षर लोक कारणीभूत नसून जास्त शिकलेले लोक कारणीभूत आहेत. 


मी सारा भारत बौध्दमय करीन अशी बाबासाहेबांनी घोषणा केली होती. मग भारत बौध्दमय करण्याची त्यांच्याकडे काय रणनीती होती? काय भारत बौध्दमय झाला आहे? असा सवालही त्यांनी विचारला. बाबासाहेबांच्या आगोदर भारत बौध्दमय झाला होता. याचे अनेक दाखले त्यांनी दिले. बुध्द हे मराठा-कुणबी ओबीसी होते. त्यांनी अत्युच्च असा धम्म दिला. जो विज्ञानावर आधारित आहे. आम्ही बुध्द झालोच नाही तर बुध्दालाच महार केले अशी कोपरखळी ओहोळ यांनी मारली.


मूलगामी परिवर्तन हवे असेल तर आपला इतिहास आपल्याला माहित असायला हवा. ज्यांनी इतिहास निर्माण केला नाही त्यांनी तो लिहला. त्यामुळे त्यांना हवा असलेला त्यांच्या सोयीचा इतिहास लिहला. जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की, भारतात खोटा इतिहास शिकवण्यासाठी प्राध्यापकाला पगार दिला जातो. विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये, शिक्षणमंत्री आमचे परंतु शिक्षण मात्र सदाशिव पेठेतला असतो. त्यामुळेच आज सत्यानाश झाला आहे. शिकले-सवरलेले लोकच समस्या आहेत. विद्यापीठात शिकवलेल्या अभ्यासक्रमाला प्रमाण मानून ते आपले मत बनवतात. 


सामाजिक शिक्षणामुळे सामाजिक प्रामाणिकपणा येतो. सामाजिक प्रामाणिकतेमुळे सामाजिक चळवळ निर्माण होते. परंतु भारताचा इतिहास हा हिंदू-मुस्लिम संघर्षाचा असल्याचे ब्राम्हणांनी खोटेच लिहले. भारताचा इतिहास वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, आरक्षण समर्थक व विरोधक असा आहे. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा इतिहास तपासावा लागेल. बुध्दांनी परिव्रजा घेतली तीदेखील ब्राम्हणांनी खोटी सांगितली. त्रिपीटकचा सार म्हणजे बुध्द ऍन्ड हीच धम्म आहे. त्यानंतर २२ प्रतिज्ञा दिल्या. त्यातील पहिल्या सहांचे पालन केले तरी चालेल अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. 


रोहिणी नदीच्या पाणीवाटपावरून वाद झाला. या पाणीवाटपाच्या वादावरून बुध्दांना राजगादी सोडावी लागली. त्यांनी आपले वडील सिध्दोधन यांना त्रास होऊ नये म्हणून गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला. आपली पत्नी यशोेधरा, मावशी गौतमी, मुलगा राहुल, वडील सिध्दोधन यांना समाजावले व आपण गृहत्यागाचा निर्णय का घेत आहोत याची कारणमीमांसा स्पष्ट केली. सर्वांना विश्‍वासात घेऊन त्यांनी गृहत्याग केला. परंतु आपल्या बायका-मुलांना वार्‍यावर सोडून बुध्दांनी गृहत्याग केल्याचा खोटा इतिहास ब्राम्हणांनी लिहला. 


बुध्दगया येथे त्यांनी चिंतन केले. ब्राम्हणांनी सांगितलेले क्रियाकर्म केले. त्यानंतर त्यांना समजले की हे सर्व खोटे आहे. त्यांनी ब्राम्हणी धर्माला विरोध करत स्वत:चा दृष्टीकोन विकसित केला. पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी चिंतन केले. पिंपळ हे झाड दोन्ही वेळा ऑक्सिजन देते. म्हणजे बुध्द किती मोठे वैज्ञानिक होते हे लक्षात येते. परंतु ब्राम्हणांनी पिंपळाला काऊंटर करण्यासाठी वडाचे झाड आणले. आज अनेक ठिकाणी वडाचे झाड दिसतात, परंतु पिपळाचे दिसत नाही. यावरून ब्राम्हणांची काऊंटर पॉलिसी यशस्वी झाली असे ओहोळ यांनी सांगितले.


बुध्दांनी तीन प्रकार दु:खाचे असल्याचे सांगितले. एक व्यक्तीगत, दुसरे सामूहिक आणि तिसरे नैसर्गिक! व्यक्तीगत दु:खावर पंचशील, सामूहिक दु:खावर अष्टांगिक मार्ग व नैसर्गिक दु:खावर मात करण्यासाठी दहा पारमिता आहे. जपान हा भूमीहीन असलेला देश दहा पारमिताचे पालन करतो म्हणून एवढे भूकंप होऊनही जागतिक नकाशावर टिकून आहे. पंचशील जगाने स्विकारला तर जग दु:खमुक्त होईल असा आशावादही ओहोळ यांनी व्यक्त केला. 


भारतातील पहिला एड्सग्रस्त इंद्र असून भारतातून परदेशात एड्स गेल्याचा दावाही त्यांनी केला.बुध्दांचे तत्वज्ञान हे पाली भाषेत आहे. कारण त्यावेळी पाली ही बोलीभाषा होती. आता पाली बोलीभाषा राहिली नाही म्हणून ते तत्वज्ञान मराठीत आणणे आवश्यक आहे. लोकांना दु:खमुक्त करण्यासाठी बुध्दांनी भिक्खू संघाची स्थापना केली. जगाला दु:खमुक्त करणे व विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हीच भिक्खू संघाची वैशिष्ट्ये आहेत. 


भिक्खू संघ जगातील केडर बेस ऑर्गनायझेशन होते. बुध्दांनी स्वत: केशवपन केले होते. भगवे चिवर धारण केले होते. भिक्षापात्रही एकवेळचे जेवण राहिल एवढेच होते. परंतु आता भिक्षापात्राऐवजी झोळीच आणली असा टोला ओहोळ यांनी आजच्या भिक्खूंना लगावला.भूक लागली तरच प्रचार व प्रसार होईल अशी त्यामगाची भूमिका होती. प्रचार व प्रसार करून थकल्यावर विहारात थांबा. परंतु आताचे भिक्खू विहारात थांबूनच थकतात. प्रचार व प्रसार करायला त्यांच्याकडे वेळच नसतो. लोकांची लढाई लढली पाहिजे. म्हणून बुध्दांनी पशुहत्येचा आंदोलनाचा मुद्दा बनवला. त्यामुळे लोक बुध्दांशी जोडत गेले असे ओहोळ यांनी सांगितले.


बुध्दांनी बहुजन हिताय, बहुजन सुखाय असा सिध्दांत मांडला. परंतु आजच्या काही राजकीय नेत्यांनी सर्वजन हिताय सर्वजन सुखाय करत आपण महान असल्याचा अप्रत्यक्ष टोला  मायावतींचे नाव न घेता ओहोळ यांनी लगावला. ज्यावेळी सर्वजन शब्द येतो त्यावेळी समजायचे की, केवळ ब्राम्हणांचेच हीत आहे असे समजायचे. सर्वजन शब्द ब्राम्हणांसाठी कवच आहे असे बाबासाहेब म्हणाले होते. परंतु लढाई आता समोर आली आहे. तुम्ही विदेशी तर आम्ही मूलनिवासी, तुम्ही अल्पजन तर आम्ही बहुजन अशी लढाई सुरू झाली आहे. 


बुध्दांनी तर्कसिध्दांत आणला. तर्क शोधाची जननी आहे. बुध्दांच्या कालखंडात ११ विश्‍वविद्यालये भारतात होती. ६३ विषय शिकवले जात होेते. भारत हा जागतिक ज्ञानाचा केंद्रबिंदू होता. मग आता हा केंद्रबिंदू कुणी नष्ट केला याचाही विचार व्हायला हवा. बुध्दांनी ब्राम्हणांना पराभूत करण्यासाठी रणनीती बनवली. ब्राम्हणांना चर्चेत हरवले. तुमचे अज्ञान हीच ब्राम्हणांची ताकद आहे असे स्पष्ट करतानाच बुध्द कमीतकमी ३ वेळा तर जास्तीत जास्त १५ वेळा एका प्रश्‍नाचे उत्तर द्यायचे हे बुध्द ऍन्ड हीज धम्म यामध्ये बाबासाहेबांनी लिहले आहे. परंतु आपले लोक वाचत नाहीत हीच मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले.


बुध्दांच्या क्रांतीचा परिणाम असा झाला की, शुद्र राजे झाले. महिलांना मुक्ती मिळाली. ज्ञानबंदी उठली. भय आणि ब्राम्हणी व्यवस्था नष्ट झाली. ३७ देशात बुध्द धम्माचा विस्तार झाला. आज अनेक बुध्दीस्ट राष्ट्रे सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. परंतु ज्या भारतात बुध्द धम्माचा उगम झाला त्याच भारतात आज बुध्द धम्म संपला. तो कोणी संपवला यावर विचारमंथन करावे लागणार आहे. सामाजिक, धार्मिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही. 


ब्राम्हणांनी भिक्खू संघात घुसखोर केली. विचारधारा, सैन्यात, प्रशासनात घुसखोरी केली. पुष्यमित्र शुंगाच्या रक्तरंजित प्रतिक्रांतीमुळे झालेले शुद्र राजे पुन्हा गुलाम झाले. जातीव्यवस्था निर्माण झाली. क्रमिक असमानता व अस्पृश्यता निर्माण करण्यात आली. ओबीसींना शुद्र म्हणून घोषित करण्यात आले. आज ब्राम्हण दिसतात, परंतु बुध्दाचे अनुयायी कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुन्हा बुध्द धम्माला चांगले दिवस आणावयाचे असतील तर आपला झेंडा, दंडा, अजेंडा घेऊन या. आपला इगो बाजूला ठेवून एकत्रित ऍक्शन करू या, त्यातून चांगला निकाल हाती येईल असे ओहोळ यांनी शेवटी सांगितले.यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ-पाटील म्हणाले, भारतातील बौध्दांचे इंटरलिंक काय आहे यावर भाष्य केले. ‘जान जो छान जो पछी मान जो’ असा संत सेवालाल महाराजांचा दाखला देत आजचे वारकरी पूर्वाश्रमीचे बुध्द आहेत. बुध्द धम्माची इंटर लिंक शोधावी लागेल. त्यादृष्टीने संबंध प्रस्थापित करावे लागतील असे सांगितले. यावेळी प्रा.अजय चव्हाण, शरद जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अर्जुन गुडसुरकर, संभाजीराव मोरे, अण्णासाहेब बोदडे, डॉ.मिलींद काळबांडे, भीमराव गेडाम, प्रा.दिलीप इंगोले, बाळासाहेब धावारे, डॉ.पंकज वाव्हळ, रामहरी ओव्हाळ, विशाल तुळवे, राजेश लिगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला लोकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ब्राम्हणवादी भाजपा सरकारने भारताला लोटले भूकेच्या खाईत
भाजपाच्या संकल्पपत्रात नुसतीच रंगरंगोटी
पेशवा फडणवीसांच्या मंत्र्यांना अच्छे दिन, पाच वर्षात १४
दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद, आरबीआयची कबुली
व्यापारयुध्दामुळे जगापुढे भीषण संकट, आंतरराष्ट्रीय नाण
गायींची गणना झाली ओबीसींची कधी होणार?
धक्कादायक: संयुक्त राष्ट्रांवरच आलीय दिवाळखोरीत जाण्या
देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही
संविधान न मानणारे सावरकर भारतरत्न कसे होऊ शकतात?
सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यूनंतर रुग्णाच्या डोळ्याला ल
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांवर शाईफेक
बाबरी मशीदच्या जागेवरील सुन्नी वक्फ बोर्डाने दावा सोडल
४ हजार ५०० कुटुंबीयांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा
शिवसेनेच्या स्वस्त वीज योजनेसाठी तिजोरीवर ४ हजार ८०० को
उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी शाळेच्या संरक्षक भिंतीची तोडफ
योगी सरकारच्या निर्णयामुळे २५ हजार होमगार्डवर बेरोजगार
‘भारतीय अर्थव्यवस्थेची खराब कामगिरी’
भाजपच्या संकल्पपत्रात एक कोटी नोकर्‍यांचे आमिष
आधी ‘जेट’मधली नोकरी गेली, मग पीएमसीमध्ये ९० लाख अडकले
देशाचे विभाजन केलेल्या आरएसएसवर बंदी घाला
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper