×

फ्लड रिपोर्ट: जगण्याची लढाई, मदतीचा महापूर

Published On :    11 Aug 2019  By : MN Staff
शेयर करा:


सहा दिवसांपासून जवान पाण्यात, पाय चिघळले





सांगली : पुराने वेढलेले घर.. सहा दिवस मृत्यूशी एकाकी झुंज.. अन् देवदूतांसारखे बोटींतून धावून आलेले जवान.. यानंतर प्रत्येकाच्या चेहर्‍यावरचे विदारक आणि आगतिक भाव. अंगावरचे ओलेचिंब कपडे, छातीशी अन् पाठीशी जिवापाड कवटाळलेली एक पिशवी.. कुणाच्या कडेवर कुडकुडणारं तान्हुलं बाळ, तर कुणाच्या खांद्यावर थरथरणार्‍या आजीचा हात... कुणी सहा दिवस घरात अडकून पडलेले, तर कुणी मदत मिळावी म्हणून जिवाच्या आकांताने मानेपर्यंतचे पाणी कापत निघालेले... अहो, आमचे म्हातारे आजोबा घरात आहेत, त्यांच्यासाठी फूड पॅकेट्स द्या, अशी आर्जवं करणारे काही जण, तर साडीची दोरी करून घरच्या सज्जावर उतरून, ‘मला आणि माझ्या नवर्‍याला पहिल्यांदा बोटीत घ्या, नाही तर मी इथून उडी टाकीन’ असं धमकावणारी महिला ... सांगली शहराजवळच्या हरिपूरमधली ही दृश्यं पुराच्या रौद्रतेची साक्ष देत आहेत. 


परतून बाहेर येताच एक सुटकेचा नि:श्‍वास टाकतात. तेवढ्यात फोर व्हील ड्राइव्हच्या जीप येतात आणि त्यांना शहरातील शाळांमध्ये सुरू केलेल्या कॅम्पमध्ये घेऊन जातात. सार्‍यांच्या मनाशी एकच प्रश्न आहे, पुढे काय? आता सांगली व परिसरात दिसतेय ती जगण्याची लढाई. प्रत्येक जण बचाव दलातील अधिकार्‍यांना एकच प्रश्न करतोय.. होतं-नव्हतं सगळं गेलं.. सांग साहेबा काय करावं? सतत पाण्यात राहिल्यामुळे जवानांचेही पाय चिघळले आहेत. त्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे.


मागील काही दिवसांत इथल्या ७० हजार लोकांना पुरातून बाहेर काढले, तरी २ हजार लोक ठिकठिकाणी अडकल्याचे स्थानिक सांगताहेत. हरिपूर हे सांगलीचेच उपनगर. हरिपूरच्या शिवाजी मोहितेंच्या फोनवर काल दिवसभरात एक हजार फोन आले. कोणत्या घरात किती लोक अडकले आहेत याची माहिती देणारे ते फोन. गेल्या आठवडाभरापासून लाइट नसल्याने शेवटच्या घटका मोजणार्‍या बॅटरीच्या मदतीने केलेले. हे निरोप येताच शिवाजी मोहितेंसारखे हरिपूरचे तरुण एन. डी. आर. एफ.च्या टीमशी त्वरित संपर्क करतात. 


फूड पॅकेट्सने भरलेली टीमची बोट या स्थानिक स्वयंसेवकांना घेऊन त्वरित फोन आला त्या ठिकाणासाठी निघते. दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍यांनी बाल्कनीतून खाली सोडलेल्या बादल्यांमधून पाणी, दूध, औषधं, बिस्किटे आणि फूड पॅकेट्स पोहोचवते. मग रिकामी बोट दुसर्‍या घरांकडे मोर्चा वळवते. पहिल्यांदा लहान मुले, वृध्द, आजारी, महिला या प्राधान्यक्रमाने सखल भागांतील घरांमध्ये अडकलेल्यांना खांद्यावर उचलून बोटीत आणतात. 


प्रत्येकाला लाइफ जॅकेट्स घालून सुरक्षित जागी आणले जाते. पथकाच्या मदतीने जमिनीवर पाऊल पडते आणि सगळ्यांंच्या पापण्या नवीन जन्म मिळाल्याच्या समाधानाने पुन्हा ओल्या होतात. सांगली शहरातील स्टेशन रोड, हरिपूर, पत्रकार कॉलनी या ठिकाणी सुरू असलेल्या बचाव कार्यात सध्या हेच दृश्य दिसत आहे. या ठिकाणी एनडीआरएफची १५ पथके २५ बोट्स घेऊन बचाव कार्य करत आहेत. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर इथली पाण्याची पातळी घटत आहे.





PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
एनआरसीमध्ये स्थान मिळण्यासाठी मुस्लिमांपेक्षा ब्राम्
भाजपा नेत्यांचा शिरच्छेद करावासा वाटतो
मुस्लिम पोलिसाला जमावाकडून मारहाण व ठार मारण्याची धमकी
संत रविदास मंदिर पाडल्याप्रकरणी केजरीवाल सरकार सर्वोच्
मृत गायींच्या मालकांना नुकसान भरपाई न दिल्यास दगडफेक
रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था कोण वाचवेल?
डॉलरच्या तुलनेत रुपया ५८ पैशांनी घसरला
भ्रष्ट २२ वरिष्ठ कर अधिकार्‍यांना सक्तीने सेवानिवृत्ती
विरोधकांनी वाईट शक्तींचा वापर केल्याने भाजपच्या नेत्या
मनसेची ईव्हीएम हटाव हंडी पोलिसांनी केली जप्त
महिलांना घाबरवण्यासाठी त्यांनी खोटा खटला दाखल केला
मुलांना मध्यान्ह भोजनात खावी लागतेय मीठासोबत चपाती
एअर फोर्सचे हेलिकॉप्टर भारतानेच पाडले, पाच अधिकारी दोषी
आसाममधील अंतिम एनआरसीत २ लाख लोकांची नावेच नाहीत
दुष्काळाची दाहकता सहन होत नसल्याने शेतकर्‍याचा अन्नत्य
मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात
बाल शोषण आणि लैंगिक छळाची ७ हजार २७७ प्रकरणे प्रलंबित
नरेश गोयल यांचा ‘गोलमाल’; ‘ईडी’च्या हाती पुरावे
ईडी आीण सीबीआयची नोटीस बजावून दाखवा
प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper