×

मुख्यमंत्री फडणवीस दुसरे बाजीराव पेशवे

Published On :    11 Aug 2019  By : MN Staff
शेयर करा:


नाना पटोले यांनी घेतला खरपूस समाचार





अकोला : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे बाजीराव पेशवे यांचे कृत्य सारखेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस दूसरे बाजीराव पेशवे आहेत अशा शब्दात माजी खासदार नाना पटोले यांनी फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला. शनिवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  फडणवीस यांच्या सारखा खोटारडा मुख्यमंत्री पहिल्यांदाच बघितल्याचे पटोले यावेळी म्हणाले.


सांगली, कोल्हापुरात महापूर आलेला असल्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस जनतेच्या पैशातून महाजनादेश यात्रा काढण्यात मग्न होते. त्यांना शेतकरी, गरिबांची चिंता नव्हती. भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी यात्रा थांबविली. त्यानंतर महापूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनादेश (जीआर) काढला. 


त्यामध्ये दोन दिवस शेती पाण्याखाली असल्यास दहा किलो धान्य व शहरी क्षेत्रातील रहिवाशाचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेल्यास ७ हजार ५०० आणि ग्रामीण क्षेत्रातील रहिवाशासाठी पाच हजार रुपये मदत जाहीर केली. परंतु ज्या व्यक्तीकडे शेतजमीन नाही त्याला कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केली नाही. त्यामुळे ज्या प्रमाणे दूसर्‍या बाजीराव पेशव्याने बहुजन, गरिबांवर अन्याय केला. त्याच प्रमाणे मुख्यमंत्रांनी काढलेला शासन निर्णय सुध्दा गरिबांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस व दुसरे बाजीराव पेशवे यांचे कृत्य सारखेच सारखेच आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 


जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्डी व्हीडीओ व फोटोसेशनवरही पटोले यांनी भाजपचा समाचार घेतला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे इतर मंत्री वागत असल्याची टिका त्यांनी केली. पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे हिदायत पटेल, बबनराव चौधरी, मदन भरगड, लक्ष्मणराव तायडे व इतर नेता उपस्थित होते.


जनहित याचिका दाखल करणार

पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह इतरही ठिकाणच्या पूर परिस्थितीला सरकार जबाबदार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला. याप्रकरणी लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार सरकार व संबंधित यंत्रणा गुन्हेगार ठरतील, असा दावा नाना पटोले यांनी पूर परिस्थितीवर जनहित याचिकेवर भाष्य करताना केला. 








PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
एनआरसीमध्ये स्थान मिळण्यासाठी मुस्लिमांपेक्षा ब्राम्
भाजपा नेत्यांचा शिरच्छेद करावासा वाटतो
मुस्लिम पोलिसाला जमावाकडून मारहाण व ठार मारण्याची धमकी
संत रविदास मंदिर पाडल्याप्रकरणी केजरीवाल सरकार सर्वोच्
मृत गायींच्या मालकांना नुकसान भरपाई न दिल्यास दगडफेक
रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था कोण वाचवेल?
डॉलरच्या तुलनेत रुपया ५८ पैशांनी घसरला
भ्रष्ट २२ वरिष्ठ कर अधिकार्‍यांना सक्तीने सेवानिवृत्ती
विरोधकांनी वाईट शक्तींचा वापर केल्याने भाजपच्या नेत्या
मनसेची ईव्हीएम हटाव हंडी पोलिसांनी केली जप्त
महिलांना घाबरवण्यासाठी त्यांनी खोटा खटला दाखल केला
मुलांना मध्यान्ह भोजनात खावी लागतेय मीठासोबत चपाती
एअर फोर्सचे हेलिकॉप्टर भारतानेच पाडले, पाच अधिकारी दोषी
आसाममधील अंतिम एनआरसीत २ लाख लोकांची नावेच नाहीत
दुष्काळाची दाहकता सहन होत नसल्याने शेतकर्‍याचा अन्नत्य
मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात
बाल शोषण आणि लैंगिक छळाची ७ हजार २७७ प्रकरणे प्रलंबित
नरेश गोयल यांचा ‘गोलमाल’; ‘ईडी’च्या हाती पुरावे
ईडी आीण सीबीआयची नोटीस बजावून दाखवा
प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper