×

३७० हटवून देशभक्त झालात का?

Published On :    13 Aug 2019  By : MN Staff
शेयर करा:


तुम्ही तर देशद्रोही आहात- वामन मेश्राम यांचा केंद्र सरकारला खडा सवाल





नाशिक : ईव्हीएम घोटाळा करून भाजपा सरकार संसदेत बहुमतात परंतु जनतेत अल्पमतात आहे. दिवसेंदिवस ईव्हीएम घोटाळ्याविरोधात जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. सरकारवर दबाव बनत चालला आहे. ६ महिन्यात ईव्हीएमविरोधात जनआंदोलन निर्माण होऊ शकते. त्यामुळे भाजपा सरकार चालणार की नाही चालणार याची काहीच शाश्‍वती नाही. 


ईव्हीएम घोटाळ्यावरील लक्ष हटवण्यासाठी ३७० हटवण्यात आले. अरे...३७० कलम पंडीत जवाहरलाल नेहरू म्हणजे ब्राम्हणांनी निर्माण केलेला मुद्दा आहे. अरे...तुम्ही तर देशद्रोही आहात. ३७० हटवून देशभक्त झाला आहात का? असा खडा सवाल बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. ३३ वे बामसेफचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नाशिक येथे पार पडले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.



ते म्हणाले, काही भाजपाचे लोक विचारतात की, २००७ मध्ये मायावती तर २०१२ मध्ये अखिलेश यादव जिंकले तेव्हा का म्हणालात नाही की हे ईव्हीएममध्ये घोटाळा करून जिंकले. आताच का म्हणत आहात? अरे..बाबांनो सवाल हा टेक्निकल आहे. मग त्याचे उत्तरही टेक्निकल हवे. तुम्ही पॉलिटीकल बोलत आहात. ईव्हीएममध्ये मत कुणाला गेले हे डोळ्यांनी दिसते का? याचे काही उत्तर आहे का? ते सांगावे. आमच्याकडे ईव्हीएम घोटाळ्याचे लिखीत पुरावे आहेत. 


आम्ही २०१४ मध्येच राज ठाकरे यांना जागे केले होते. त्यावेळी झोपा काढत बसले. रट्टा मारल्यानंतर त्यांना जाग आली. आता पोपटासारखे बोलत आहेत. कुंभकर्ण हा सहा महिने झोपत होता. राज ठाकरे पाच वर्षे झोपले, म्हणजे ते कुंभकर्णापेक्षाही महान आहेत अशा शब्दात मेश्राम यांनी खरपूस समाचार घेतला. ईव्हीएम फॉल्टी आहे हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. मग आणखी बोलायला हवे का? असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग केवळ नौटंकी करत आहे अशी टीका त्यांनी केली.


ईव्हीएममध्ये घोटाळा होतो याचे दस्ताऐवज डॉ.सुब्रमण्यम स्वामी व जी.व्ही.एल.नरसिंहराव यांनी सर्वोच्च न्यायालयात दिले. ईव्हीएममध्ये चार मोठे दोष आहेत असे त्यांनी सांगितले. यावरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली. त्याचे उत्तर त्यांनी दिले नाही. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट लावावे असे आदेश देण्यात आले. व्हीव्हीपॅटचा पहिला प्रयोग नागालँडमध्ये करण्यात आला. 


८ ऑक्टोबर २०१३ ला दिलेल्या आदेशात पॅरा २८ मध्ये विवादास्पद स्थितीत १०० टक्के व्हीव्हीपॅटची गणना व्हायला हवी असे स्पष्ट करण्यात आले. ईव्हीएम फॉल्टी व तर व्हीव्हीपॅट दुरूस्त असलेली मशिन आहे. ईव्हीएममध्ये इलेक्ट्रॉनिक तर व्हीव्हीपॅटमध्ये कागदी रेकॉर्ड जमा होतो. ईव्हीएममध्ये घोटाळा होतो याचा सर्वप्रथम अभियान जून २०१४ पासून सार्‍या देशभरात आम्ही सुरू केले. नरेंद्र मोदी घोटाळा करून निवडून आलेले प्रधानमंत्री आहेत असा आरोप मी त्यावेळी केला होता. माझ्याविरोधात खटला दाखल करा असेही बजावले होते. उलट मीच निवडणूक आयोगाविरोधात खटला दाखल केला. 


व्हीव्हीपॅट खरेदी करण्यासाठी मोदी सरकार पैसे देत नव्हते? प्रधानमंत्री हा काही मालक नाही तो जनतेचा विश्‍वस्त आहे. त्यामुळे कसे काय देत नाही असा रट्टा पडल्यानंतर व्हीव्हीपॅट खरेदीसाठी पैसे देण्यात आले. निवडणूक आयोगाने कॉंग्रेस सरकारला प्रस्ताव पाठवला. पेपर ट्रेल मशीनची गणती होता कामा नये. गणती झाल्यास घोटाळा पकडला जाऊ शकतो. फेब्रुवारी २०१४ मध्ये ५६ (सी) हा नवीन रूल बनविण्यात आला. म्हणजे गणती करण्यापासून रोखण्यात आले.


लालकृष्ण अडवाणी व चंद्राबाबू नायडू ईव्हीएम घोटाळ्याविरोधात रॅली काढणार होते. परंतु कॉंग्रेसनेच आरएसएसशी गुप्त समझोता करून अडवाणींना गप्प बसवण्यात आले. तुम्ही दोनवेळा जिंकलात आम्हीही दोनवेळा घोटाळा करून जिंकणार असा गुप्त समझोता कॉंग्रेस व आरएसएसमध्ये झाला. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप दोनो चिडीचूप’ रहायचे. २०१९ ची लोकसभा निवडणूक फिक्स आहे हे मी आधीच सांगितले होते. त्याचे पुरावेही दिले होते. 


दूरदृष्टी आणि इमानदारी असेल तर पुढे काय होणार आहे हे समजून येते. मी दुसरा खटला दाखल केला. त्यावेळी पेपर ट्रेल मशीन लावण्यात आली. मतांची चोरी होत नाही तर ५६ (सी) रूल का बनविण्यात आला? असा सवालही त्यांनी केला. हा रूल मौलिक अधिकाराचे हनन करत आहे. निवडणूक आयोग मौलिक अधिकाराविरोधात कुठलाही प्रस्ताव पाठवू शकत नाही. आमचे महाराष्ट्रातील लोक म्हणतात, ‘संविधानाला हात लावा तर’ अरे बाबांनो संविधान संपवण्यात आले आहे अशा शब्दात यांनी कान टोचले.


१८ जानेवारी २०१९ आपला खटला सुनावणीला आला. त्याचवेळी देशातील २१ राजकीय पक्षांनी एक खटला दाखल केला. अभिषेक मनु संघवी या कॉंग्रेसच्या नेत्याने ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने १०० टक्केचा निर्णय दिला आहे आणि हे ५० टक्केची मागणी करतात. आपल्या आदेशाची अंमलबजावणी करायला सांगा असा आपला खटला होता. सरन्यायाधीशांसमोर आपल्या खटल्याची सुनावणी समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाचा वकील तिवारी नावाचा ब्राम्हण होमवर्क करून आला नव्हता. सरन्यायाधीशांनी निवडणूक आयुक्तांनाच पाचारण करावे असा लिखीत आदेश दिला.


दरम्यान, त्याचवेळी सरन्यायाधिशांवर चारित्र्यहननाचे आरोप करण्यात आले. त्यामुळे जो सरन्याधिश आपल्या बाजूने होता तो पलटला आणि त्यांनी २१ पार्ट्यांनी दाखल केलेल्या खटल्यावर निर्णय दिला. पाच केंद्रांवर व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याचे आदेश दिले. आपण दाखल केलेला खटला आणि २१ पार्ट्यांचा खटला हा क्लब करण्यात आला. ‘५६ सी शाल बी कन्टीन्यू’ हा संविधानाच्या मौलिक अधिकाराचे उल्लंघन करणारा आदेश आहे. 


सरन्याधिशांनी जजगिरी न करता दादागिरी केली. जे.चेलमेश्‍वर यांनी बारकाऊन्सिलमध्ये मीटिंग घेत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०१३ च्या निर्णयावर ठाम राहायला हवे होते. परंतु चारित्र्यहननापासून वाचण्यासाठी सरन्याधिशांनी आपला निर्णय बदलला. मी दाखल केलेली केस ऐतिहासिक होती. पेपर ट्रेलची १०० टक्के गणना झाली असती तर चोरी पकडली गेली असती. त्यामुळे भाजपा बहुमतात आली नसती. परिणामी नरेंद्र मोदी प्रधानमंत्रीही झाले नसते, असे मेश्राम यांनी सांगितले.


ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात २३ मे च्या निकालाच्या दिवशी ७ वाजल्यापासून २१ पार्ट्यांचे आंदोलन सुरु होणार होते. परंतु ही खबर लिक करण्यात आली. २२ मे रोजी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी देशभरात हायअलर्ट जारी केला. देशव्यापी हिंसा होऊ शकते असे हायअलर्टमध्ये सांगण्यात आले होते. कॉंग्रेसही ईव्हीएमविरोधी आंदोलनात सामील होणार आहे हे आरएसएसला कळले. त्यांनी कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना दम भरत तुम्ही जर या आंदोलनात सामील झालात तर ईव्हीएम घोटाळा केल्याचा भंडाफोड केला जाईल, असा इशारा दिला. त्यामुळे कॉंग्रेस मागे हटली आणि निकाल येण्याअगोदरच कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदोजी जित की बधाई हो असे सांगितले. 


परंतु अंतर्गत सोनिया गांधी व मनमोहन सिंह यांनी गुप्त समझोत आरएसएसशी केला होता. त्याची माहिती राहुल गांधी यांना नव्हती. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पलायन केले. कॉंग्रेसने आंदोलनातून माघार घेतल्याने प्रादेशिक पक्षही मागे फिरले. आज देशात कॉंग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यांच्याकडे ५३ जागा आहेत. संसदेत हंगामा केला तर ईव्हीएम देशात राहू शकत नाही. परंतु कॉंग्रेसची ही मानसिकता नाही. आज खासदार, आमदार ईव्हीएमच्या माध्यमातून निवडल्या जात आहेत. त्यामुळे ज्या समस्यांचे समाधान झाले होते त्या समस्या पुन्हा निर्माण झाल्या आहेत. 


माझ्याकडे आणखी एक गुप्त माहिती आहे की, एका छोट्या पार्टीला फडणवीस यांनी चार पाच जागांवर निवडून आणू शकतो, असे आश्‍वासन दिले आहे. याचा अर्थ ईव्हीएम घोटाळा कसा करायचा हे त्यांना माहीत आहे. ईव्हीएममुळे संविधान समाप्त झाले आहे. त्यामुळे लोकतंत्र संपले आहे. मताधिकार संपला आहे. देशातील ६४ माजी आयएसएस अधिकारी व ८३ मिलिट्री अधिकार्‍यांनी ही निवडणूक सर्वात भ्रष्ट होती असे पत्र लिहिले आहे.


इंदिरा गांधी यांनी बांग्लादेश वेगळा केला. त्यावेळी त्यांच्याकडे ३६८ जागा होत्या. नरेंद्र मोदींपेक्षा इंदिरा गांधी सक्षम नेत्या होत्या. भाजपकडे आज ३०३ जागा आहेत. देशभरात ईव्हीएमविरोधात दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या ६ महिन्यात जनआंदोलन निर्माण होऊ शकते. त्यामुळे जसे इंदिरा गांधीचे सरकार चालले नाही तसेच मोदींचेही सरकार चालेल की नाही याची शाश्‍वती देऊ शकत नाही. हे सरकार संसदेत बहुमतात असले तरी लोकांमध्ये अल्पमतात आहे, असा हल्लाबोल मेश्राम यांनी केला.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
एनआरसीमध्ये स्थान मिळण्यासाठी मुस्लिमांपेक्षा ब्राम्
भाजपा नेत्यांचा शिरच्छेद करावासा वाटतो
मुस्लिम पोलिसाला जमावाकडून मारहाण व ठार मारण्याची धमकी
संत रविदास मंदिर पाडल्याप्रकरणी केजरीवाल सरकार सर्वोच्
मृत गायींच्या मालकांना नुकसान भरपाई न दिल्यास दगडफेक
रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था कोण वाचवेल?
डॉलरच्या तुलनेत रुपया ५८ पैशांनी घसरला
भ्रष्ट २२ वरिष्ठ कर अधिकार्‍यांना सक्तीने सेवानिवृत्ती
विरोधकांनी वाईट शक्तींचा वापर केल्याने भाजपच्या नेत्या
भारतीय नागरिकांविरोधातच लष्कराचा वापर
एकाच व्यक्तीला तीन सरकारी नोकर्‍या; ३० वर्षे मिळायचे तीन
मनसेची ईव्हीएम हटाव हंडी पोलिसांनी केली जप्त
महिलांना घाबरवण्यासाठी त्यांनी खोटा खटला दाखल केला
मुलांना मध्यान्ह भोजनात खावी लागतेय मीठासोबत चपाती
एअर फोर्सचे हेलिकॉप्टर भारतानेच पाडले, पाच अधिकारी दोषी
आसाममधील अंतिम एनआरसीत २ लाख लोकांची नावेच नाहीत
दुष्काळाची दाहकता सहन होत नसल्याने शेतकर्‍याचा अन्नत्य
मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात
बाल शोषण आणि लैंगिक छळाची ७ हजार २७७ प्रकरणे प्रलंबित
नरेश गोयल यांचा ‘गोलमाल’; ‘ईडी’च्या हाती पुरावे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper