×

...तोपर्यंत देशातलं आरक्षण कायम ठेवावं, संघाला सुटला आरक्षणाचा पुळका

Published On :    10 Sep 2019  By : MN Staff
शेयर करा:


ज्यांना अरक्षणाचे फायदे मिळतात व ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यात सलोख्याच्या वातावरणात चर्चा-संवाद व्हायला हवा, असे सरसंघचालक मोहन भागवत यापूर्वी म्हणाले होते.





पुष्कर : यापूवी बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की आता आरक्षण संपालया हवे, यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपाला सपाटून मार खावा लागला होता. त्यापूर्वी ही संघाकडून आरक्षण आणि संविधाना विरोधात बयान आलेले आहेत. 


मात्र आता महाराष्ट्रासह इतर राज्यांची विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवून संघ आरक्षणावरून सावध पवित्रा घेत असल्याचे दिसून येत असून संघाला आरक्षणाचा पुळका सुटल्याचे दिसून येत आहे. असाच एक बयान संघाकडून आला आहे. समाजात अजूनही सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम असल्याने त्याआधारे दिले जाणारे आरक्षण लाभार्थींना त्याची गरज वाटते तोपर्यंत सुरु ठेवायला हवे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोमवारी म्हटले.


संघाची ही भूमिका एका पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी असेही सांगितले की, मंदिरे, स्मशानभूमी व विहिरी आणि पाणवठे कोणत्याही एका समाजवर्गासाठी नव्हे तर सर्व जाती-धर्मांसाठी खुले असायला हवेत. होसबळे म्हणाले की, समाजात अजूनही विषमता असल्याने राज्यघटनेनुसार ठरलेल्या आरक्षणास संघाचा संपूर्ण पाठिंबा आहे.


ज्यांना अरक्षणाचे फायदे मिळतात व ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यात सलोख्याच्या वातावरणात चर्चा-संवाद व्हायला हवा, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलिकडेच सुचविले होते. त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरु झाली होती. आरक्षण अनिश्चित काळ सुरु राहावे, असे संघाला वाटते का, असे विचारता होसबळे यांनी सांगितले की, या व्यवस्थेचा ज्यांना लाभ मिळतो त्यांनी याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यांना गरज वाटते तोपर्यंत आरक्षण सुरु राहायला हवे.


एकीकडे संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपाने कांग्रेसचे खाजगीकरणाचे धोरण सुरूच ठेवले असून त्याची गती देखील वाढविली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या तोटयात असल्याचे कारण पुढे करून या कंपन्या खाजगी क्षेत्राला दिल्या जात आहेत. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यां खाजगी क्षेत्राच्या घशात घालून त्या कंपन्यात मिळणारे आरक्षण समाप्त करत आहेत. इतकेच नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील आरक्षण संपवून प्रतिनिधित्वाच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. भाजप सार्वजनिक क्षेत्रातील आरक्षणाची वाट लावत असतानाही संघाकडून आरक्षण सुरू ठेवण्याचे बयान येत आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला’
महाराज कधीच दिल्लीकरांचे आधीन झाले नाहीत
राज्यसभा खासदार मालामाल!
बलात्कार खटल्यांसाठी १०२३ न्यायालये, केंद्र सरकारचा प्
मॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या
मला चिन्मयानंदच्या रुममध्ये नेण्यात आलं, हे सगळ्या कॉले
८२ माजी खासदारांना अजूनही सोडवेना सरकारी बंगल्याची उब
फडणवीसांच्या ‘महाजनादेश’ला गर्दी जमवण्यासाठी महिलांन
फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेवर ‘कडकनाथ’चा मारा
गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण
शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा
मुलीला त्रास देणार्‍या आरएसएस कार्यकर्त्याची पित्याकड
बोट अपघातात १५ वर्षात तब्बल १० हजार ५८० जणांचा मृत्यू
ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली तरच न्याय
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या डोक्यावर ३ हजार ५८० कोटी
पाणबुडी निर्मितीसाठी निविदा भरल्याने समुद्री सुरक्षाह
‘महाजनादेश ही जनतेवर लादलेली यात्रा’
पैठणगेट येथे‘ईव्हीएम’विरोधात निदर्शने
ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आलेल्यांनी उदयनराजेंना मुख्
बारामतीत राडा, फडणवीसांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper