×

उन्नाव बलात्कार प्रकरण : आजपासून एम्स रुग्णालयातच सुनावणी

Published On :    11 Sep 2019  By : MN Staff
शेयर करा:


ट्रामा सेंटरमध्ये तात्परते न्यायालय





उत्तर प्रदेश : उन्नाव बलात्कार प्रकरणाची नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातच सुनावणी घेण्यात येणार आहे. खटला सुरू करण्यासाठी पीडितेचा साक्ष नोंदवण्यासाठी रूग्णालयात सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रामा सेंटरमध्ये तात्पुरते न्यायालय सुरू करण्यास परवानगी दिली. दरम्यान, आजपासून (११ सप्टेंबर) पीडितेचा जबाब नोंदवण्यासाठी जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांच्यासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे.


उन्नावमधील एका अल्पवयीन मुलीवर २०१७ मध्ये  बलात्कार करण्यात आला होता. भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदार कुलदीप सेनगरने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी सेनगरविरूध्द गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, तक्रार मागे घेण्यासाठी सेनगर याच्याकडून धमक्या येत असल्याची माहिती पीडितेने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना दिली होती. त्यानंतर सरन्यायाधीशांनी यांची गंभीर दखल घेत खटला लखनऊ येथून दिल्ली येथे हलवला होता.


दरम्यान, आमदार सेनगरविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी पीडितेच्या कारला अपघात झाला होता. यात तरूणीच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पीडितेसह तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. हा अपघात नसून, हल्ला असल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला होता. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते.


पीडितेला दिल्लीत हलवल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. पीडितेवर अजूनही ‘एम्स’मधील ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. त्यामुळे पीडितेची साक्ष झालेली नाही. पीडितेला स्ट्रेचरवरून न्यायालयात आणणे धोकादायक ठरू शकते. तसेच तिची ओळख सार्वजनिक होऊन वैयक्तिक आयुष्यही धोक्यात येऊ शकते, असे मत नोंदवत न्यायालयाने एम्स ट्रामा सेंटरमध्ये तात्पुरते न्यायालय उभारण्यास परवानगी देऊन तसे निर्देश दिले होते. 


रूग्णालयात सुनावणी झाल्यामुळे पीडिता कोणतीही भीती न बाळगता साक्ष देईल, असे मतही न्यायालयाने नोंदवले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आजपासून (११ सप्टेंबर) जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांच्यासमोर रुग्णालयातच सुनावणी होणार असून पीडितेची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला’
महाराज कधीच दिल्लीकरांचे आधीन झाले नाहीत
राज्यसभा खासदार मालामाल!
बलात्कार खटल्यांसाठी १०२३ न्यायालये, केंद्र सरकारचा प्
मॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या
मला चिन्मयानंदच्या रुममध्ये नेण्यात आलं, हे सगळ्या कॉले
८२ माजी खासदारांना अजूनही सोडवेना सरकारी बंगल्याची उब
फडणवीसांच्या ‘महाजनादेश’ला गर्दी जमवण्यासाठी महिलांन
फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेवर ‘कडकनाथ’चा मारा
गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण
शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा
मुलीला त्रास देणार्‍या आरएसएस कार्यकर्त्याची पित्याकड
बोट अपघातात १५ वर्षात तब्बल १० हजार ५८० जणांचा मृत्यू
ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली तरच न्याय
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या डोक्यावर ३ हजार ५८० कोटी
पाणबुडी निर्मितीसाठी निविदा भरल्याने समुद्री सुरक्षाह
‘महाजनादेश ही जनतेवर लादलेली यात्रा’
पैठणगेट येथे‘ईव्हीएम’विरोधात निदर्शने
ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आलेल्यांनी उदयनराजेंना मुख्
बारामतीत राडा, फडणवीसांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper