×

मोदी सरकारच्या काळात ७१ हजार कोटींचे बँक घोटाळे

Published On :    11 Sep 2019  By : MN Staff
शेयर करा:


पाच टक्के विकास दराचा दावाही फसवा; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप





मुंबई : सरकारचा कारभार पारदर्शक असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात असला तरी गेल्या पाच वर्षांत बँकांमध्ये ७१ हजार ५४३ कोटींचे घोटाळे झाले असून, या प्रकरणी संबंधितांच्या विरोधात कारवाई झालेली नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. पहिल्या तिमाहीत पाच टक्के विकासदर असल्याची केंद्राची माहिती फसवी आहे. प्रत्यक्षात अडीच टक्क्यांच्या आसपासच विकास दर राहिल्याचाही दावा त्यांनी केला.


केंद्र आणि राज्याची ढासळती अर्थव्यवस्था तसेच मोदी आणि फडणवीस सरकारांच्या कारभारांवर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. बँकांचे विलीनीकरणामागे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत बँकांचे विलीनीकरण करून काय साधणार, असा सवाल चव्हाण यांनी केला. देशातील बँकांमध्ये ७१ हजार ५४३ कोटींचे घोटाळे झाले आहेत. यापैकी ९० टक्के घोटाळे हे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये झाले आहेत. एवढा घोटाळा होऊनही वरिष्ठ पातळीवरील अधिकार्‍यांच्या विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. एवढ्या रकमेच्या घोटाळ्यास जबाबदार कोण आणि त्यांच्याविरोधात कोणती कारवाई केली याची माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केली पाहिजे.


बँकांमध्ये २०१४ मध्ये १०,१७१ कोटींचा घोटाळा झाला होता. २०१५ मध्ये १९,४५५ कोटी, २०१६ मध्ये १८,६९९ कोटी, २०१७ मध्ये २३,९३४ कोटी, २०१८ मध्ये ४१,१६७ कोटी आणि २०१९ मध्ये बँक घोटाळ्यांची रक्कम ही ७१ हजार कोटींवर गेली. मोदी सरकारच्या काळात बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. गतवर्षांच्या तुलनेत यंदा ३० हजार कोटींचा बँक घोटाळा झाला. आर्थिक पातळीवर आम्ही कठोर भूमिका घेतो, असा दावा प्रधानमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून केला जातो. मग बँकांमधील घोटाळा वाढला कसा, असा सवालही चव्हाण यांनी केला. नोटाबंदीनंतर व्यवहारात आलेल्या दोन हजार आणि ५०० रुपयांच्या ८२ टक्के नोटा व्यवहारांमध्ये आहेत. मग काळ्या पैशाला आळा कसा बसला, असा सवालही त्यांनी केला.


वाहन उद्योगांत मंदी आहे. रोजगार कमी होऊ लागले आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरांत मोटार विक्रीची १००च्या आसपास दुकाने बंद करावी लागली. कारण वाहनांची  विक्रीच होत नाही. बेरोजगारीचा दर ४५ वर्षांत सर्वात अधिक असल्याचा अहवाल केंद्र सरकारच्या ‘एनएसएस’ संस्थेने तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अहवाल दडवून ठेवण्यात आला होता. 


मुद्रा योजनेत फक्त २० टक्के लाभार्थीनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. सूतगिरणी उद्योगाने जाहिरात देऊन मदतीचे आवाहन केले. चहा उद्योगानेही सरकारी धोरणामुळे मंदी आल्याचे जाहीर केले. पाच रुपयांमध्ये पुडे विकणारी बिस्किट कंपनी अडचणीत येणे हे सारे फार सूचक मानावे लागेल. रिझर्व्ह बँकेकडून मिळणारी १ लाख ७६ हजार कोटींची रक्कम कशासाठी वापरणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. बहुधा आर्थिक तूट कमी करण्याकरिताच या रकमेचा वापर केला जाईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

बेरोजगारीबाबत माहिती दडवली
राज्यात गेल्या पाच वर्षांत प्रत्येक जिल्हानिहाय किती जणांना रोजगार उपलब्ध झाला याची माहिती वारंवार मागूनही दिली जात नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये ‘मिहान’ प्रकल्पातून आठ मोठ्या उद्योगांनी जागा परत केली आहे. राज्याने एक लाख कोटींची अर्थव्यवस्था साधण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी ते अशक्यप्राय असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

विकासाची आकडेवारी फसवी

चालू आर्थिक वर्षांत पहिल्या तिमाहीत पाच टक्के विकास दर गाठल्याची माहिती जाहीर करण्यात आली. प्रत्यक्षात विकास दर अडीच टक्क्यांच्या आसपासच असावा, अशी शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली. मंदी, उत्पादन क्षेत्रात ०.६ टक्के वाढ, आठ मूलभूत उद्योगांमध्ये २.१७ टक्के विकास दर हे सारे लक्षात घेता पाच टक्के विकास दर गाठणे अशक्यप्राय आहे. विकासाचा हा दर लक्षात घेता पाच लाख कोटींची अर्थव्यवस्थेचे लक्ष्य २०२५ पर्यंत गाठणे कठीण आहे. अर्थव्यवस्था याच दराने पुढे गेल्यास हे लक्ष्य गाठण्यास २०२८ किंवा २०३० साल उजाडेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला’
महाराज कधीच दिल्लीकरांचे आधीन झाले नाहीत
राज्यसभा खासदार मालामाल!
बलात्कार खटल्यांसाठी १०२३ न्यायालये, केंद्र सरकारचा प्
मॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या
मला चिन्मयानंदच्या रुममध्ये नेण्यात आलं, हे सगळ्या कॉले
८२ माजी खासदारांना अजूनही सोडवेना सरकारी बंगल्याची उब
फडणवीसांच्या ‘महाजनादेश’ला गर्दी जमवण्यासाठी महिलांन
फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेवर ‘कडकनाथ’चा मारा
गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण
शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा
मुलीला त्रास देणार्‍या आरएसएस कार्यकर्त्याची पित्याकड
बोट अपघातात १५ वर्षात तब्बल १० हजार ५८० जणांचा मृत्यू
ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली तरच न्याय
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या डोक्यावर ३ हजार ५८० कोटी
पाणबुडी निर्मितीसाठी निविदा भरल्याने समुद्री सुरक्षाह
‘महाजनादेश ही जनतेवर लादलेली यात्रा’
पैठणगेट येथे‘ईव्हीएम’विरोधात निदर्शने
ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आलेल्यांनी उदयनराजेंना मुख्
बारामतीत राडा, फडणवीसांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper