×

ब्राह्मणांसाठी आठवले पुतळाच!

Published On :    19 May 2018
शेयर करा:


-



केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. कविता बोलतील तेच आठवले, अशी टिप्पणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर हास्यफवारे उडाले. एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांची ही टिपण्णी रामदास आठवले केवळ कविताच बोलतात. त्यांच्याकडे गांभिर्य नाही. असे त्यांना अप्रत्यक्षरित्या सांगायचे आहे. लढाऊ असलेला हा पँथर मांजर कधी झाला हे कळलेच नाही. म्हणजेच आठवले यांचा मेणाचा पुतळा उभा करुन ब्राह्मणांसाठी आठवले केवळ पुतळाच! कारण पुतळा हा काही बोलत नाही. तशीच भूमिका आठवलेंची राहिली आहे. 


रामदास आठवले म्हणजे एकेकाळचा लढाऊ पँथर नेता. आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. सत्तेत सहभागी झाल्याने आता ते मेणासारखे मऊ झाले आहेत. त्यामुळेच आता त्यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. आठवले हे संघर्षांतून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांच्या जे पोटात असते तेच ओठात असते. मात्र लढाऊ पँथर असलेल्या या नेत्याचे मांजर कधी झाले हे समजलेच नाही. कारण सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. ज्या मुशीतून ते तयार झाले त्याची नाळ त्यांनी तोडली आणि विषमतावादी विचारधारा असलेल्या भाजपसारख्या ब्राह्मणी पक्षाचे कमळ फुलविण्यात ते मग्न झाले. 


आठवलेंनी जरुर संघर्ष केला परंतु चुकीच्या निर्णयामुळे हा संघर्ष पाण्यात गेला आहे. पँथरच्या कालखंडात पद्मश्री नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि.पवार, रामदास आठवले यांच्यासारखे अनेक नेतृत्व पुढे आले. एससी समुदायावर झालेल्या अन्यायाविरोधात पँथर पेटून उठत होते. त्यावेळी शिवसेना आणि पँथरचा मोठा संघर्षही झाला होता. एका सघर्षशील नेतृत्वाला पुढे आणण्याचे काम शरद पवार यांनी केले. त्यांच्या मंत्री मंडळात त्यांना समाजकल्याणमंत्री पद मिळाले. त्यानंतर आठवले यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 


पवारांशी घरोबा असतानाच आठवले यांनी आपली राजकीय भूमिका बदलली आणि शिवसेना भाजपच्या कंपुत ते कधी दाखल झाले हे कळलेच नाही. शिवसेना भाजपच्या कंपुत आणण्यात भाजपचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांचा हातभार होता. कॉंग्रेसने त्यांना मंत्रीपद नाकारले. म्हणून त्यांचा शिवसेना-भाजप या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षांकडे कल वाढला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती फिस्कटली. आठवले यांनी भाजपच्या कळपात जाणे पसंत केले. त्याची पोचपावती?म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना समाजकल्याण राज्यमंत्री पदाचे हाडूक चघळायला दिले. तसे म्हटले तर राज्यमंत्री पदाला काहीच पॉवर नसते. हे पद केवळ नामधारी असते. 


भाजप बरोबर सत्तेचा सारीपाट मांडल्यानंतर आठवलेंचा पँथर जागचा हललाच नाही. या पँथरचा पूर्णपणे मांजर झाला. पर्याप्त प्रतिनिधित्व (आरक्षण) मोदी सरकारकडून संपविले जात नाही. त्याचबरोबर आर्थिक निकषावर आरक्षण दिले गेले पाहिजे, अशा तर्‍हेचे आठवले यांनी वक्तव्य केले. परस्परविरोधी विचारधारा असतानाही त्यांनी भाजपजवळ मांडवली केली. यातून आठवले यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट होते. 


आठवलेंना पंढरपूर लोकसभा मतदार संघातून लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. त्यावेळचा तो किस्सा आम्हाला फार आठवतो. त्यावेळी लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी होते. जोशी यांनी आठवले यांना आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली. त्यावेळी आठवले यांनी कुठलेही अभ्यासपूर्ण विचार न मांडता त्यांनी लोकसभेत कविता म्हणायला सुरुवात केली. कविता करताच आठवले यांना जोशी म्हणाले, आठवलेजी ही लोकसभा आहे. इथे कविता करु नका, असे बजावले. असा दट्टा पडूनही कविता करणे त्यांनी सोडून दिलेले नाही. 


आता तर भाजपमधील ब्राह्मणांनी आठवले यांचा मेणाचा पुतळा उभा करुन तुम्ही पुतळाच आहात, असा अप्रत्यक्षरित्या संदेश दिला आहे. कारण पुतळा हा काही बोलत नाही. तो फक्त एखाद्या व्यक्तीचे अबोल प्रतिनिधित्व करतो. मेणाच्या पुतळ्यात अडकवून आठवले यांना वैचारिक दृष्टी मिळू नये म्हणून ही चाल खेळण्यात आली आहे. आठवले सत्तेच्या सारीपाटात सर्वच विसरले. महापुरुषांचा संघर्ष काय असतो याची जाणीव न ठेवता पॉवर नसलेल्या राज्यमंत्री पदासाठी एवढे व्याकूळ होताना आठवले यांना पाहिलेले आहे. सत्ता म्हणजे सर्वस्व नाही. तर आपली मानसिक गुलामगिरी जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत त्या सत्तेला काहीही अर्थ नाही. 

धड आठवलेंचे आणि डोके ब्राह्मणांचे असेल तर ते काय कामाचे? राज्यमंत्रीपद हे ब्राह्मणांनी दिले आहे. त्यामुळे ब्राह्मण सांगतील त्यानुसार आठवले यांना वागावे लागेल. कारण ते नामनिर्देशित आहेत. याचा अर्थ आठवले यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उच्च न्यायालयाचा सरकारला दणका
बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह ६ जणांना आजन्म तुरुंगवा
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटींचे बक्
गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणार्‍यांकडून काय अपेक्षा
‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच हादरे
मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळीत मोठी वाढ
राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती
महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होण्याची चिन्हे!
बालकांची तस्करी करणार्‍या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
१.५ वर्षात १ हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत
जगाच्या एक तृतीयांश दृष्टिहीन लोक भारतात
मराठा क्रांती मोर्चाचा २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव!
मुलायम सिंहांच्या कुटुंबाला फुटीचे ग्रहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याच
‘वाडा कोलम’ वाचवा, उत्पादक शेतकर्‍यांची हाक
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची लूटमार
सरकारकडून ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रचार, प्रसार नाह
पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर उद्या श्रमिक महासंघाचा
संघाच्या अवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे?
दसर्‍यापर्यंत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा अन्यथा आंदोल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper