×

बहुजन क्रांती मोर्चाची मशाल

Published On :    23 May 2018
शेयर करा:


-



संघटनेच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा घटनेच्या कलम क्र. १९ नुसार मोैलिक अधिकार असताना महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची गळचेपी केली. सर्व बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेला ब्रेक लावण्याचे काम पेशवा ब्राम्हणांनी केले. त्यामुळेच बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी फडणवीस म्हणजे हिजडो के सरदार अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली. मेश्रामसोहबांच्या आदेशानुसार सार्‍या महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करण्यात आले. साहेबांच्या एका आदेशावर हजारो कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले, हीच खरी बामसेफ व बहुजन क्रांती मोर्चाची ताकद आणि शक्ती आहे.


कार्यक्रमातून विचारांची निर्मिती होते, विचारांतून ज्ञानप्राप्ती होते, ज्ञानातून स्फूर्ती मिळते, स्फूर्तीतून जागृती होते, जागृतीतून चेतना निर्माण होते, चेतना निर्माण झाल्यामुळे समाज गतीशील बनतो, समाज गतीशील बनल्यामुळे क्रांती होते. कुठलीही क्रांती करायची असेल तर विचार परिवर्तन फार गरजेचे आहे. म्हणूनच मेश्रामसाहेबांनी कार्यक्रम दिला. कुठला कार्यक्रम परिवर्तन यात्रेचा. अखंड ४२ दिवस महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात हा परिवर्तनाचा जागर. हा परिवर्तचा जागर घेऊन आपल्या बहुजन समाजासाठी उन्हा-तान्हात झटणारा मेश्रामसाहेबांसारखा माणूस विरळाच...! 


बामसेफने आपल्या महापुरूषांच्या विचारांचीच ज्योत प्रज्वलित ठेवली आहे, म्हणून आज जागरूकता वाढत आहे. केवळ एससीच नव्हे तर एसटी, ओबीसी, एनटी, डीनटी, व्हीजेएनटी, धर्मपरावर्तीत असलेले मुस्लिम, जैन, बुध्दीस्ट, ख्रिश्‍चन, शीख, इसाई, लिंगायत या सर्व जातीसमूहांना घेऊन काम केले जात आहे. त्यांना त्यांचा खरा असणारा जाज्वल्य इतिहास सांगितला जात आहे. त्यामुळे मनात एक कुठेतरी सकारात्मक विचारांचा अंकुर फुटून प्रत्येक जाती समूहातील लोक या आंदोलनात सहभागी होत आहेत हेच बामसेफचे लखलखीत असे यश आहे. मित्र आणि शत्रूची ओळख करून दिली जात आहे. 


तथागत गौतम बुध्दांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय असा क्रांतीचा संदेश देत ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या वर्णव्यवस्थेविरोधात लढा दिला. रक्ताचा एकही थेंब न सांडता बुध्दांनी क्रांती केली. त्याच्यापुढे जाऊन संत नामदेव व संत तुकाराम यांनी क्रांतीला वारकरी असे नाव दिले. जो अन्यायाविरोधात वार करतो वारकरी. परंतु आजचा वारकरी हा केवळ पायी वारी करण्यापुरता शिल्लक राहिला आहे. त्याला कारण वारकरी संप्रदायात भागवत धर्माच्या नावाने ब्राम्हणांनी केलेला शिरकाव. त्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील लोकांना घेऊन मावळा अशी ओळख दिली. वार करणार्‍या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या पेशवा ब्राम्हणाला उभा कापला तो शिवरायांनी. हीदेखील शिवरायांची क्रांतीच. आधुनिक भारतात राष्ट्रपिता जोतिराव फुले यांची सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलेली जागृती तसेच शिक्षणाचा पाया रचणारी क्रांतीच.


 छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानात पर्याप्त प्रतिनिधीत्व (आरक्षण) लागू करून बहुजनांना सत्तेत वाटा देणे हीसुध्दा क्रांतीच आणि या सर्वांचा आदर्श मानून ज्यांनी या देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित २६ नोव्हेंबर १९५० रोजी संविधान दिले. या संविधानात सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला, ब्राम्हणांनी जरी अन्याय केला असला तरी त्यांनासुध्दा न्याय दिला गेला. या संविधानाचे निर्माते, आधुनिक भारताचे युगपुरूष विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतामूलक असे संविधान दिले ही तर महाक्रांतीच. एससी,एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, धर्मपरावर्तीत अशी सर्वांना त्यांनी संविधानिक ओळख निर्माण करून दिली. नंतर कांशीरामसाहेबांनी बहुजन या ओळखीखाली सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला.


हीदेखील मोठी क्रांतीच आणि मूलनिवासी या संकल्पनेखाली सर्व बहुजन बांधवांना बामसेफने दिलेली ओळख हीसुध्दा मोठी क्रांतीच आहे. त्यामुळे मूलनिवासी या ओळखीखाली अनेक जातीसमूहांना जोडण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. परिणामी देशात आज होणारे स्थितंतर फार मोठे आहे. प्रत्येक जातीसमूह जागा होताना दिसत आहे. त्याचाच परिपाक १ जानेवारी २०१८ ला भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले सर्व जातीसमूह. भीमा-कोरेगाव येथील इतिहास हा नागवंशीय ५०० लोकांचा आहे. हा इतिहास सांगण्याचे काम व जनजागृती केल्यामुळेच हे शक्य झाले. हे सर्व वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बामसेफने केले. त्याचे श्रेय कुणालाही लाटता येणार नाही.


आपल्या पराक्रमाचा इतिहास सर्व बहुजन समाजाला समाजावा म्हणून परिवर्तन यात्रा काढून जागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. परंतु या परिवर्तन यात्रेला ब्रेक लावण्याचे काम पेशवा ब्राम्हण फडणवीसाने केला. ब्रेक लावला म्हणून कोणी थांबलेले नाही. क्रांती करत असताना अशा प्रकारे ब्राम्हणी लांडग्यांचे अडथळे येणारच. त्यामुळे त्यातून तावून सुलाखून निघावेच लागते. ब्रेक लावणार्‍यांना आम्ही सांगत आहोत, हा वारसा ५०० नागवंशीय शूरवीरांचा आहे, त्या शूरवीरांनी काय केले हा इतिहास जगजाहीर आहे, त्यामुळे पेशवा ब्राम्हणांनी आपली ताकद ओळखूनच रहावे, नाहीतर जेलभरो आंदोलनान बामसेफची ताकद दिसलीच. हेच खरे आंदोलन, हाच खरा शांततापूर्ण पध्दतीने केलेला विरोध. त्याला कारण नेतृत्व सक्षम असावे लागते. ते मेश्राम साहेबांच्या माध्यमातून वैचारिक नेतृत्व लाभल्यामुळे प्रत्येक लढा यशस्वी होत आहे. आगामी काळात होणार्‍या जनआंदोलनाचा पाया या जेलभरोे आंदोलनातून घातला गेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उच्च न्यायालयाचा सरकारला दणका
बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह ६ जणांना आजन्म तुरुंगवा
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटींचे बक्
गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणार्‍यांकडून काय अपेक्षा
‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच हादरे
मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळीत मोठी वाढ
राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती
महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होण्याची चिन्हे!
बालकांची तस्करी करणार्‍या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
१.५ वर्षात १ हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत
जगाच्या एक तृतीयांश दृष्टिहीन लोक भारतात
मराठा क्रांती मोर्चाचा २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव!
मुलायम सिंहांच्या कुटुंबाला फुटीचे ग्रहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याच
‘वाडा कोलम’ वाचवा, उत्पादक शेतकर्‍यांची हाक
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची लूटमार
सरकारकडून ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रचार, प्रसार नाह
पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर उद्या श्रमिक महासंघाचा
संघाच्या अवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे?
दसर्‍यापर्यंत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा अन्यथा आंदोल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper