×

भाजपची हवा गूल

Published On :    31 May 2018
शेयर करा:


-



देशातल्या ११ राज्यांमध्ये चार लोकसभा आणि १० विधानसभांच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी पोटनिवडणुकांऐवजी राज्यातील निवडणुका जिंकणे महत्त्वाचे असल्याचे अमित शहा म्हणाले होते. परंतु पोटनिवडणुकीतून सत्ताधारी पक्षाची ताकद दिसत असते. या वर्षी मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपाला मोठा धक्का बसला होता. याचा अर्थ भाजपचा फुगा फुटला असून हवा गुल झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रभाग गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या अलाहाबाद इथल्या फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपाला बिहारच्या अररिया लोकसभा निवडणुकीतही पराभव स्वीकारावा लागला होता. 


या जागेवर आरजेडीला पुन्हा एकदा विजय मिळाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतल्या ऐतिहासिक विजयानंतर चार वर्षांत भाजपाच्या कामगिरी खालावत चालली आहे. भाजपाला २०१४ पासून मार्च २०१४पर्यंत २३ लोकसभा निवडणुकीतल्या फक्त चार जागांवर विजय मिळवणे शक्य झाले आहे.२०१४ पासून झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाला आतापर्यंत ५ जागांवर विजय मिळाला आहे. कॉंग्रेसने अमृतसर लोकसभा निवडणुकीत भाजपाला टक्कर देत घवघवीत मतांनी विजय मिळवला होता. गेल्या चार वर्षांत झालेल्या पोटनिवडणुकांत इतर पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेसला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला आहे. कॉंग्रेसपाठोपाठ भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेसचा नंबर लागतो. या दोन्ही पक्षांनी गेल्या चार वर्षांतील पोटनिवडणुकांत चार-चार जागांवर विजय मिळवला आहे. 


२०१४ पासून ज्या २३ लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणुका घेण्यात आल्या, त्यातील १० जागा भाजपाकडे आधीपासून होत्या. त्या १० जागांपैकी ६ जागांवर भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर ४ जागांवर विजय मिळवणं भाजपाला शक्य झाले होते.२०१५, २०१७ आणि मार्च २०१८ मध्ये झालेल्या एकाही पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळवता आलेला नव्हता. परंतु मे २०१८ मध्ये झालेल्या महाराष्ट्रातल्या पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आहे. भाजपानं बीड लोकसभा पोटनिवडणूक आणि गुजरातमधल्या वडोदराची जागा जिंकली होती. बीजेडीने ओडिशातल्या कंधमालमधली जागा जिंकली होती. तर एसपीने यूपीच्या मैनपुरी जागा स्वतःकडे ठेवली होती. टीआरएसने आंध्र प्रदेशमधल्या मेढक जागेवर कब्जा मिळवला होता. कैराना लोकसभा निवडणुकीत आरएलडीच्या उमेदवार तबस्सूम हुसन यांनी भाजपच्या उमेदवार मृंगांका सिंह यांच्यावर जवळजवळ ५० हजार मतांनी मात केली. गोरखपूर, फुलपूर आणि आता कैराना पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात त्यांची हवा गुल झाली आहे. 


कारण वर्षभरात लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल आणि पुन्हा एकदा निवडणुकीचा आखाडा निर्माण होईल. उत्तर प्रदेशमधून लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्यासाठी उत्तर प्रदेश हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. जो उत्तर प्रदेशवर राज्य करतो तो देशावर राज्य करतो असा इतिहास आहे. त्यामुळेच गतनिवडणुकीत भाजपने एकमापी ७४ जागा जिंकून देशाची सत्ता काबीज केली होती. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावीत विजयी झाले आहेत. तर उत्तर प्रदेश नुरपूर विधानसभा क्षेत्रात समाजवादी पार्टीच्या पार्टीचे नईम हसन, केरळ चेंगन्नूर विधानसभा क्षेत्रातून सीपीएमचे साजी चेरियन, बिहारमधील जोकीहाट विधानसभा क्षेत्रातून आरजेडीचे शहनवाज, मेघालयातील अंपती विधानसभा क्षेत्रातून कॉंग्रेसचे मियानी शिरा, झारखंडच्या गोमियातून झारखंड मुक्ती मोर्चाच्या सीमादेवी, कर्नाटक राजराजेश्‍वरी नगरमधून कॉंग्रेसचे मुनीरत्न, पश्‍चिम बंगालमधून तृणमूल कॉंग्रेसचे दुलाल चंद्र दास, उत्तराखंडमधील थरालीमधून भाजपच्या मुन्नी देवी शाह, पंजाब शाहकोटमधून कॉंग्रेसचे हरदेव सिंह लाडी, महाराष्ट्राच्या पलूस कडेगावमधून कॉंग्रेसचे विश्‍वजित कदम, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे मधूकर कुकडे आघाडीवर होते. तेच जिंकण्याची शक्यता आहे. 


हे सर्व निकाल पाहता पालघर वगळता सर्वच लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी धोबीपछाड दिला आहे. तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकात भाजपचे कमळ काही फुललेले दिसत नाही. त्यामुळे २०१९ ची लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण मोदी सरकारला सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश कारणीभूत आहे. फक्त फेकामफेकी करण्यात मोदी मश्गूल राहिले. त्यामुळेच भाजपला पराभवाचा सामना करावा लागत आहे. 
संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट -डॉ.राजू वाघमारे यां
बालाघाट जिल्ह्यात किडनी चोरीची अफवा, मुलांना शाळेत पाठव
निकालाच्या १५ दिवसानंतरही विद्यार्थी गुणपत्रिकेपासून
उद्या संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर सुनावणी
जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिका
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षक, मुख्या
माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूसं
मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची जाण नाह
आजपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू
बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी
अनुसूचित जातीतील शेतकर्‍यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले
पोलिसांचा ससेमिरा वाचविण्यासाठी विक्रम कोठारीची रुग्ण
२०१४ च्या धुंदीतून बाहेर पडा, ही २०१९ ची निवडणूक आहे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper