×

शेतकर्‍यांच्या समस्यांचे मूळ ब्राह्मणवाद

Published On :    1 Jun 2018
शेयर करा:


-



देशातील २२ राज्यात आजपासून शेतकर्‍यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. हे आंदोलन दहा दिवस चालणार आहे. या देशातला शेतकरी हा भूमिपुत्र असूनही त्याला आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागते. याचा अर्थ शेतकरी हा देशोधडीला लागला आहे. शेतकर्‍यांच्या समस्यांचे मूळ ब्राह्मणवाद आहे. हा ब्राह्मणवाद गाडल्याशिवाय कुठल्याच समस्या सुटू शकणार नाहीत. 


भारत देश हा कृषीप्रधान आहे. कृषी म्हणजे शेतीप्रधान. शेतीशी निगडीत भारतीय अर्थव्यवस्था आहे. म्हणून येथील शेतकरी जगला पाहिजे. तरच देशाची विकासाची गती पुढे जाईल. परंतु तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर सत्तेवर आलेल्या ब्राह्मणी पक्षांनी शेतकर्‍यांना देशोधडीला लावून स्वतः मात्र ऐश आरामाचे जीवन जगत आहेत. म्हणूनच अनेक समस्या आज निर्माण झाल्या आहेत. शेतकर्‍यांनी केलेले हे आंदोलन उग्ररुप धारण करु शकते. कारण शेतीला भाव नाही. परिणामी केलेले उत्पादन कवडीमोलाने द्यावे लागत आहे. शेतीसाठी काढण्यात आलेले कर्ज फेडतानाही शेतकर्‍याला नाकीनऊ येत आहेत. म्हणून नाईलाजाने शेतकरी आत्महत्यांचा गळफास लावताना दिसत आहे. यावर सरकार कुठलीही पावले उचलताना दिसत नाही. शेतकर्‍यांमार्फत सुरु असलेले आंदोलन हे शेतमाल आणि दुध न पाठविता केले जाणार आहे. 


शेती व कुकुटपालन, ठिबकसिंचन, ग्रीनहाऊसला पुरक व्यावसायाची सरसकट कर्जमाफी हवी, शेतीमाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमीभाव आधारित कायद्याने बाजारभावाची हमी देणे, शेतकर्‍यांच्या पत्नीसह निवृत्तीवेतना कायदा करुन देणे, दुधाला हमीभाव हा कमीत कमी ५० देण्याचा कायदा करणे, बैलगाडी शर्यत व तत्सम स्पर्धांना कायदेशीर मान्यता देणे या विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले आहे. शेतकर्‍याला आंदोलन का पुकारावे लागते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.  ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो ही म्हण नेहमीच शेतकर्‍यांसदर्भात वापरली जाते. बळी राजा म्हणजे शेतकर्‍यांचा राजा. सम्राट बळीराजांच्या कालखंडात या देशात सुख आणि समृद्धी होती. म्हणूनच कुठल्याही प्रकारे शेतकर्‍यांना प्रश्‍न निर्माण झाला नाही. म्हणून आजही बळीराजाची आठवण काढली जाते. परंतु याच बळीराजाला पाताळी घालण्याचे काम कपटी वामन नावाच्या ब्राह्मणाने केले. ही कुटनीती आजही ब्राह्मणांची सुरु आहे. म्हणूनच शेतकर्‍यांच्या समस्या दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहेत. 


रयतेचे राजे छत्रपती शिवरायांना शेतीविषयक फार मोठी जाणीव होती. म्हणूनच शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे फर्मान शिवरायांनी सोडले होते. एवढे नीतीवान आणि गुणवान असे शिवराय. त्यांच्या कालखंडात अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले होते. जेणेकरुन शेतकर्‍यांना पाण्याची कमतरता भासू नये. परंतु शिवरायांच्याच नावावर सत्ता उपभोगणार्‍या या सरकारला शिवरायांच्या कृषी विषयक नीतीचा काहीच अभ्यास नाही. केवळ शिवरायांचे नाव वापरुन त्यांची बदनामी करण्याचे हे ब्राह्मणी षड्यंत्र आहे. कृषीप्रधान असलेल्या या देशात शेतीला भाव मिळत नाही. उत्पादित माल रस्त्यावर फेकावा लागतो. त्यातच साखरेचं मोठ्या प्रमाणात भारतामध्ये उत्पादन होत असूनही पाकिस्तानमधून साखर आयात केली गेली. म्हणजेच साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात वाढविला गेला. 


परिणामी तेथील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या साखरेला भाव मिळेनासा झाला. कृषी अथवा शेतीविषयक व्यवसाय करताना शेतकर्‍यांना कर्ज काढावे लागते. कर्ज काढून उत्पादन घ्यावे लागते. मात्र सरकारच्या या कृषी विरोधी धोरणांचा फटका शेतकर्‍यांना बसतो आणि परिणामी कर्ज फेडता न आल्यामुळे शेवटी गळफास घेतल्याशिवाय पर्याय नसतो. याला कारण केवळ ब्राह्मणवाद आहे. मुद्दामहून शेतीचे भाव पाडले जातात. म्हणून या शेतकर्‍यांच्या आत्महत्या नसून ब्राह्मणांनी केलेल्या त्या हत्याच आहेत, असा आरोप महाराष्ट्रात काढण्यात येत असलेल्या परिवर्तन यात्रेत जामखेड येथे बोलताना बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम केला. हा त्यांचा आरोप निश्‍चितच बरोबर आहे. कारण देशातील सर्वच क्षेत्रावर ब्राह्मणतंत्र असेल तर याच ब्राह्मणांनी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निर्णय घ्यायला हवेत. परंतु निर्णय राहिले बाजूला शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते. 


ब्राह्मणवादामुळेच या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या निपटून काढण्यासाठी देशातील सर्व शेतकर्‍यांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. तरच या देशातील शेतकर्‍यांच्या समस्या सुटतील. त्यासाठी शेतकर्‍यांनी बंड करण्याची तयारी ठेवा, असे आम्ही आवाहन करत आहोत. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उच्च न्यायालयाचा सरकारला दणका
बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह ६ जणांना आजन्म तुरुंगवा
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटींचे बक्
गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणार्‍यांकडून काय अपेक्षा
‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच हादरे
मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळीत मोठी वाढ
राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती
महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होण्याची चिन्हे!
बालकांची तस्करी करणार्‍या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
१.५ वर्षात १ हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत
जगाच्या एक तृतीयांश दृष्टिहीन लोक भारतात
मराठा क्रांती मोर्चाचा २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव!
मुलायम सिंहांच्या कुटुंबाला फुटीचे ग्रहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याच
‘वाडा कोलम’ वाचवा, उत्पादक शेतकर्‍यांची हाक
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची लूटमार
सरकारकडून ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रचार, प्रसार नाह
पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर उद्या श्रमिक महासंघाचा
संघाच्या अवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे?
दसर्‍यापर्यंत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा अन्यथा आंदोल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper