×

परिवर्तन यात्रेचा वणवा पेटला.....!

Published On :    3 Jun 2018
शेयर करा:


-




बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रात २४ एप्रिलपासून वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली परिवर्तन यात्रेचा समारोप आज रविवारी पुणे येथे होत आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत, ३६७ तालुक्यात या परिवर्तन यात्रेने महाराष्ट्राचा कानाकोपरा कानाकोपरा ढवळून काढण्यात आला. मूलनिवासी बहुजन समाजाला ब्राम्हणांच्या गुलामगिरीतून बाहेर काढणे हा प्रमुख हेतू या परिवर्तन यात्रेमागे होता. त्यामुळे गेली ४२ दिवस अखंडपणे फुले-शाहू-आंबेडकरी विचारप्रवाहाची वीण अधिक घट्ट करण्यात आली. 


१ जानेवारी १८१८ मध्ये भीमा-कोरेगाव येथे झालेल्या रणसंग्रामात २८ हजार पेशवा ब्राह्मणांचा पराभव करुन ५०० मूलनिवासी नागवंशीय शुरविरांनी विजय प्राप्त केला होता. पेशवाईला गाडून पुन्हा एकदा आपल्या महापुरुषांचा तेजस्वी इतिहास जागा केला होता. हा तेजस्वी आणि क्रांतीकारी इतिहास पोहोचविण्याचे काम देशभरात भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामुळे देशातील अनेक जाती समूह जागृत झाले. जागृती झाल्यामुळेच ब्राह्मणांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी भीमा-कोरेगावच्या द्विशाताब्दी कार्यक्रमात दंगल घडवून आणली. खरा इतिहास मूलनिवासी बहुजनांना कळू नये म्हणून ब्राह्मणांचे हे कारस्थान होेते. आजही पेशवाई डोके वर काढून आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. नुकताच २० मार्च २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात दिलेला निकाल हा पेशवाई बळकट करण्याची पायरी आहे. त्यामुळे या पेशवाईचे षड्यंत्र उघडे करायला हवे. यासाठीच या परिवर्तन यात्रेचा उद्देश होता. मूलनिवासी बहुजन समाजातील अनु.जाती, जमाती, भटके विमुक्त, मराठा, ओबीसी, बलुतेदार, एसबीसी, मुस्लीम, ख्रिश्‍चन, बौद्ध, लिंगायत, शिख, जैन, धर्मपरिवर्तीत या सर्वांच्या हक्क व अधिकारावर गदा आणण्यात आलेली आहे. परिणामी या देशाचा मूलनिवासी बहुजन बांधव देशोधडीला लागला आहे.


न्यायपालिका, कार्यपालिका, संसद आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांवर आज पेशवा ब्राह्मणांचे निरंकुश वर्चस्व आहे. त्यामुळे देशात लोकतंत्र नसून ब्राम्हणतंत्र असल्याचे वामन मेश्राम साहेबांनी आपल्या ठिकठिकणच्या भाषणात सांगितले होते. ही ब्राह्मणी व्यवस्था कायम उखडून फेकण्यासाठी, सन्मानाने जीवन जगण्यासाठी व माणुसकीची आणि समतेची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी ब्राम्हणांनी विभाजित केलेल्या जातींना जोडावे लागेल. त्यांना जागृत करावे लागेल. जागवलेल्या लोकांना जोडावे लागेल. जोडून शक्ती निर्माण करायला हवी. संघटित शक्तीच्या आधारे लढाई लढायला हवी आणि त्या शक्तीचा विवेकपूर्ण पध्दतीने उपयोग करायला हवा. संघटित होऊन आपण धनदांडगे असलेल्या ब्राम्हणांचा मुकाबला करू शकतो असा आत्मविश्‍वास मेश्राम साहेबांनी जागविला.


या परिवर्तन यात्रेत आपल्या महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला गेला. त्याचबरोबर विविध मागण्याही करण्यात आल्या. त्यातील भीमा-कोरेगाव दंगलीचा सूत्रधार मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे या दोघांना फाशी झाली पाहिजे, ऍट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा यासाठी स्वतंत्र न्यायालय व स्वतंत्र यंत्रणा करावी. ब.मो.पुरंदरेचा महाराष्ट्र भूषण काढून घ्यावा, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यात यावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, महिलांवरील वाढता अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, मुस्लीम समुदायाला सच्चर कमिशनच्या शिफरशी लागू कराव्यात. यासारख्या प्रमुख मागण्या परिवर्तन यात्रेत करण्यात आल्या. महाराष्ट्रातील परिवर्तन यात्रेत अनेक मुद्यांना स्पर्श केला गेला. त्यात भिडे आणि एकबोटेद्वारा भीमा-कोरेगावचा जो चुकीचा इतिहास सांगितला जात आहे त्याची सत्य बाजू मांडण्याचे काम करण्यात आले. शूरवीर नागवंशीयांच्या जाज्वल्य असा इतिहास सांगितला गेला. त्यातच रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक  छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची पेशवा ब्राम्हणांनी कशी हत्या केली यावर पुराव्यानिशी प्रकाशझोत टाकण्यात आला. महाराष्ट्रापुरतीच परिवर्तन यात्रा मर्यादित नसून ही यात्रा संपूर्ण देशभरात काढली जाणार आहे. पुढची यात्रा ही सहा महिन्यांची आहे. कारण केवळ महाराष्ट्रात परिवर्तन करून चालणार नाही तर देशात परिवर्तन करणे गरजेचे आहे. उभा महाराष्ट्र परिवर्तन यात्रेच्या ठिणगीने पेटला, त्या ठिणगीचा आता सार्‍या भारतभर वणवा हाईल, या वणव्यात ब्राम्हणी विषमतावादी विचारधारा जळून खाक होईल यात शंका नाही. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
धनगर आरक्षणाची वाट बिकटच
‘सनातन’वर बंदी?
दूध उद्योग सापडला संकटात
‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’
भांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा
कथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..
वेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी
योगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा
मुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा!
हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य
लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली?
शरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार
एससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही
भगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही !
११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत
टीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड
संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी
मराठवाड्यावर गडद दुष्काळछाया !
भाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू
योजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper